Sunday, December 31, 2023

सिक्रेट एजंट नूर इनायत खान

- ऋतुपर्ण

मुळची भारतीय असलेली ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान, हिची ओळख एक सिक्रेट एजेंट म्हणून होती. नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान, जे एक भारतीय होते तर आई ओरा बेकर अमेरिकन होती. इनायत खान टिपू सुलतानचा पणतू होते. इनायतचा जन्म २४ जानेवारी १९१४ रोजी झाला होता. तिने दुसऱ्या महायुद्‌धाच्या दरम्यान मित्र देशांसाठी हेरगिरी केली होती. एक भारतीय राजकुमारी ही ब्रिटनची स्पेशल सिक्रेट एजंट म्हणून नाझींविरोधात लढली. गुप्तहेर म्हणून तिची साधीसुधी ओळख नव्हती तर प्राणाची बाजी लावून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेरगिरी करण्यासाठी तिला फ्रान्समध्ये पाठवण्यात आले होते. तिच्या साहसी कथा हे सिद्ध करतात की, अनेक दशकांनंतरही तिला वीरचा दर्जा का दिला जातो? हेरगिरी करताना नाझीच्या सैनिकांकडून पकडली गेलेली नूरला तिच्याच सहकाऱ्यांनी धोका दिला होता. तिच्या सहकाऱ्याने अशी कोणती गुप्त माहिती नाझीच्या सैन्यांना सांगितली, ज्यामुळे नूरचे सर्व रहस्य उजागर झाले आणि तिला कैद करण्यात आले. तुरुंगात तिचा इतका छळ झाला तरी करण्यात आला की ...
म्हैसूरच्या टिपू सुल्तानाचा वंशज म्हणून इनायत खान यांची ओळख होती. ते सूफी उपदेशक होते. सुफीचा प्रसार व्हावा म्हणून इनायत खान यांची मुलगी नूर हिनेही वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. खान परिवार आधी रशियाला गेले. नंतर ब्रिटन मग फ्रान्सला गेले. नूर एक बुद्धिमान तरुणी होती. ती फ्रेंच भाषा बोलू शकत होती. शिवाय पियानो आणि हापर् देखील तिला वाजवता यायचे. याशिवाय तिला अनेक भाषा अवगत होत्या. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ती केवळ २५ वर्षांची होती. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वजण इंग्लंडला गेले. नंतर १९२० मध्ये पॅरिसला गेले. १९२७ मध्ये मध्ये भारत यात्रेदरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू  झाला. त्यावेळी ती १३ वर्षांची होती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्व जबाबदारी नूरवर आली. वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत नूर आपल्या तीन लहान भाऊ-बहिणीसोबत राहिली.
नूर इनायतवर पुस्तक लिहिणारी श्रावणी बसू यांच्या द स्पाय प्रिन्सेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान पुस्तकात नूरचे वर्णन असे करण्यात आले आहे - नूर खूप शांत स्वभावाची होती. तिला वाचन- लिहिण्याची आवड होती. तिला संगीतदेखील आवडत असे. ती वीणावादन देखील करत असे. वयाच्या २५ व्या वर्षी तिने आप‌ले पहिले पुस्तक छापले होते. ती बुद्धजातक कथांशी प्रेरित होऊन मुलांसाठी त्याच्या कथांचे पुस्तक छापले होते. ती अनेक मासिकांमध्ये लिहायची.
१९४० मध्ये नाझींनी फ्रान्सवर ताबा मिळवला. त्यावेळी नूर फ्रेंच लोकांसोबत ब्रिटनला येथे गेली. तिथे पोहोचताच युद्धाच्या तयारीत -त्यागली. येथे ती नोराह बेकर (Narab Baker) नावाने वुमेन्स ऑग्जिलरी एअरफोर्स मध्ये दाखल झाली. एक वायरलेस ऑपरेटर म्हणून तिने प्रशिक्षण घेतले. त्यावेळी एक महिला म्हणून हे काम खूप जिकरीचे होते. तिला अवगत असणाऱ्या भाषा आणि हे तंत्रज्ञानाचे कौशल्य इथे उपयोगी पडले होते. १९४३ मध्ये स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तिला फ्रान्स सेक्शनमध्ये काम करावे लागले होते. नूर ही पहिली रेडिओ ऑपरेटर होती, जिला नाझी व्याप्त फ्रान्समध्ये पाठवण्यात झाले होते.
ज्यावेळी ती लंडनमध्ये गेली होती, तेव्हा ब्रिटिश लष्कराचे मोठे-मोठे फलक लावण्यात आले होते. यावर लिहिले होते की - लष्कराला लोकांची खूप आवश्यकता आहे. नूरने ब्रिटिश सैन्यात नोकरीसाठी अर्ज केला. पण, लष्कराकडून जे उत्तर आले होत ते, धक्कादायक होते.
नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान होते, जे सफी प्रसारक, भारतीय होते. ते इंग्रजांविरुद्ध लढणारे टीपू सुलतानचे पणतू होते. नूरदेखील मॉस्कोमध्ये जन्मली होती आणि फ्रेंच नागरिक होती. काही कालावधी आधीच फ्रान्समधून परतली होती. अशा  परिस्थितीत ब्रिटिश लष्कराकडून तिची निवड केली जाणे अशक्यप्रायच. त्यावेळी तिचा अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. पण, नूर गप्प बसणारी नव्हती. तिने हिंमत न हारता ब्रिटिश लष्कराला पत्र लिहिलं. तिने या पत्रात म्हटले होते की - तिची आई एक 'ब्रिटिश नागरिक आहे. ती स्वतः ब्रिटनमध्ये ब्रिटिश प्रोटेक्टिव्ह पासपोटर्  घेऊन राहत आहे, त्यामुळे तीदेखील ब्रिटिश झाली. त्यानंतर लष्कर अधिकाऱ्यांनी तिला मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, महात्मा गांधी यांच्याविषयी तिचे काय विचार आहेत?
तिने उत्तरादाखल सांगितले- महात्मा गांधी भारतात जे करत आहेत, त्याने ती प्रभावित झालीय. द स्पाय प्रिंसेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान' पुस्तकात म्हटले आहे-
लाकरी अधिकाऱ्यांनी तिला दुसरा प्रश्न उपस्थित केला की, ती भारताच्या त्या नेत्यांना पाठिंबा देईल का, जे ब्रिटिश सरकार विरोधात लढत आहेत? यावर नूर म्हणाली, सध्या फॅसिझम विरोधात युद्ध सुरू आहे आणि माझं कर्तव्य आहे की, ब्रिटनला पूणर्पणे पाठिंबा देणं. परंतु, हे युद्ध संपताच भारतात स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा देईन.
या उत्तराने ब्रिटिश अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला. नोव्हेंबर १९४० मध्ये तिला ब्रिटिश लष्करात एअर फोर्समध्ये सेकंड क्लास ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. तब्बल दीड वर्षांनंतर तिला स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्हच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. फ्रेंच भाषेवर तिची मजबूत पकड होती. ही एक सिक्रेट ब्रिटिश फोर्स होती, जी युरोपमध्ये नाझींविरोधात स्थानिक विद्रोहात मदतीसाठी गुप्तहेर पाठवले जायचे. या कामात सामान्य वेतन मिळायचे. पण जीवावर बेतणारे काम होते पण, हे धाडस नूर करायला तयार झाली. कधी कधी वायरलेस ऑपरेशनच्या प्रशिक्षणावेळी नूर घाबरायची. सर्व अधिकाऱ्यांना वाटायचे की, नूर एक गुप्तहेर म्हणून काम करू शकत नाही. पण, फ्रेंच भाषेचे कौशल्य आणि संदेश तत्काळ कोड-डीकोड करणे हे पाहून नूर इनायत खान हेरगिरी करण्यासाठी रेडिओ ऑपरेटर बनवून ला १९४३ मध्ये फ्रान्समध्ये पाठवण्यात आले. तिचे कोड नाव होते- 'मेडेलिज:
वायरलेस ऑपरेटर जीवावर बेतणारे काम होते. हे काम आधी पुरुषच करायचे. जर्मन सीक्रेट पोलिस 'गेस्टापो' ऑपरेटरचे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच ओळखून गुप्तहेरना सहजपणे पकडू शकत होते. आणि लवकरच झालेही तसेच. जर्मनीने सर्व ऑपरेटर्सना पकडले. तेव्हा एकच ट्रान्समीटर शिल्लक राहिले होते - ते होते नूर इनायत खान. ब्रिटिश सैन्यानी नूरला माघारी बोलावलं. पण नूरने परत येण्यास नकार दिला. पुढील काही महिने नूर एकटीच फील्ड ऑपरेटर म्हणून काम करत राहिली. त्यावेळी ती आपल्या मिशनपासून मागे हरली नाही. तिला माहिती होतं की, तिने एका जागेवरून जर १५ मिनिटांपर्यंत मेसेज पाठवला तर जर्मन सैन्यांना तिचा ठावठिकाणा समजेल. त्यामुळे ती नेहमी संदेश पाठवल्यानंतर पार्कमध्ये जायची. एक दिवया ती आपल्या ट्रान्समिशन मशीन सोबत पार्कमध्ये होती. तेव्हा जर्मन सैन्यांनी रोखून विचारलं होतं की, तिच्या ब्रीफकेस मध्ये काय आहे? नूर म्हणाली-सिनेमा दाखवायची मशीन आहे. अशा प्रकारे जर्मन सैन्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ती फरार होत राहिली. पण तिचा चेहरा शत्रूला ओळखता गेला होता. त्यामुळे प्रत्येक दिवशी तिला आपलं बाह्यरूप बदलाव लागत असे. ती बराच काळ अनेक ठिकाणे आणि पोशाख बदलत राहिली.
त्यावेळी नाझी जर्मनीने एक सीक्रेट पोलिस दलाची निर्मिती केली होती. नाव होतं- गेस्टापो. ऑक्टोबर १९४३ मध्ये गेस्टापोने तिला पकडलं. एका माहितीनुसार, एका अपार्टमेंटमधून केवळ पाच सहा सैन्यांनी तिला घेरलं. तिच्या सहकाऱ्यांनीच पैशांसाठी तिला पकडून दिले होते, असे म्हटले जात होते. सहकाऱ्यांनी तिची सर्व गुपिते उघड केली. तिला पकडून जर्मनीला नेलं. जर्मन अधिकाऱ्यांसाठी नूर खूप धोकादायक कैदी होती. तिचा तुरुंगात इतका छळ करण्यात आला. पण, नूरने न आपल्या स्वत:बद्दल सांगितले न ब्रिटन लष्कराविषयी. तिला इतक्या यातना दिल्या तरीही जर्मनीला तिने कुठलीही गोपनीय माहिती दिली नाही. तिने दोनवेळा तुरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. पलायनावेळी दोन्ही वेळा ती पकडली गेली. जर्मन सैन्याने तिच्याकडून ब्रिटिश लष्कराबद्दल माहिती काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण, नूरचे खरे नावदेखील ते माहिती करू शकले नाहीत, असे म्हटले जाते.
अखेर २७ नोव्हेंबर, १९४३ रोजी नूर इनायत खानला पॅरिसहून जर्मनीला नेण्यात आले. जवळपास नऊ ते दहा महिने त्रास देऊन तिच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होत राहिला. तरीही, जर्मन सैन्यांना एका अक्षराचादेखील थांगपत्ता तिने लागू दिला नाही. नूरला पासून सर्व जमर्न सैन्य आश्चर्यचकित होत असे.
सप्टेंबर, १९४४ मध्ये नूर इनायतला एका कँपमध्ये नेण्यात आले. १३ सप्टेंबर. १९४४ रोजी तिला गोळी मारण्यात आली. मृत्यूसमयी ती ३० वर्षांची होती. तिच्यावर गोळी झाडल्यानंतर शेवटचा शब्द तिच्या तोंडातून निघाला तो म्हणजे 'लिबेरेते. हा एक फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ 'स्वातंत्र्य' असा होतो. जेव्हा जेव्हा मोठ्या गुप्तहेरांबददल चर्चा होते, तेव्हा नूर इनायत खानचे नाव समोर येते. पण दुसऱ्या बाजुला आपला मागमूसही लागू न देणारी गुप्तहेर इनायत खान सैन्यांच्या ताब्यात सहजपणे कशी आली? हा प्रश्न आपसूक पडतोच!

ब्रिटिश गुप्तहेर नूरची चित्तथरारक गोष्ट

- ऋतुपर्ण

मूळ भारतीय वंशाची असलेली ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान, हिची एक बुद्धिमान, चतुर, सुंदर गुप्तहेर  म्हणून ओळख होती. नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान, जे एक भारतीय होते तर आई ओरा बेकर अमेरिकन होती. इनायत खान हे टिपू सुलतानचे पणतू होते. इनायतचा जन्म 24 जानेवारी 1914 रोजी झाला होता. तिने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यातून मित्र राष्ट्रांसाठी हेरगिरी केली होती. एक भारतीय राजकुमारी ही ब्रिटनची ‘स्पेशल सिक्रेट एजंट’ म्हणून नाझींविरोधात लढली. गुप्तहेर म्हणून तिची  साधीसुधी ओळख नव्हती, तर प्राणांची बाजी लावून दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हेरगिरी करण्यासाठी तिला फ्रान्समध्ये पाठवण्यात आले होते.  तिच्या मृत्यूनंतर अनेक दशकांनंतरही गुप्तहेरांच्या जगात एका तिला साहसी वीरांगनेचा दर्जा का दिला जातो? हे तिच्या साहसकथा  वाचताना कळते. तिचे वडील इनायत खान हेे सूफी उपदेशक होते.सूफी तत्त्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून नूर हिनेही हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. खान परिवार आधी रशियाला गेला. नंतर ब्रिटनला, मग फ्रान्सला! नूर एक बुद्धिमान तरुणी होती. ती फ्रेंच भाषा बोलू शकत होती. याशिवायही अनेक भाषा तिला अवगत होत्या शिवाय पियानो ती छान वाजवायची. पियानोच्या सुरांवर सूफी संगीताचा ती प्रसार करायची. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ती केवळ 25 वर्षांची होती. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वजण इंग्लंडला गेले. नंतर 1920 मध्ये पॅरिसला गेले. 1927 मध्ये मध्ये भारत यात्रेच्या दरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू  झाला. त्यावेळी ती 13 वर्षांची होती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्व जबाबदारी नूरवर आली. वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत नूर आपल्या लहान भावा- बहिणींसोबत राहिली.
नूर इनायतवर पुस्तक लिहिणारी श्रावणी बसू यांच्या ‘द स्पाय प्रिन्सेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान’ पुस्तकात नूरचे वर्णन असे करण्यात आले आहे, ‘नूर खूप शांत स्वभावाची होती. तिला वाचन- लिहिण्याची आवड होती. तिला संगीतदेखील आवडत असे. ती पियानोसह वीणावादन देखील करत असे. वयाच्या 25 व्या वर्षी तिने आपले पहिले पुस्तक छापले होते. ती बुद्धाच्या जातक कथांनी प्रेरित होऊन तिने मुलांसाठी कथांचे पुस्तक छापले होते. ती अनेक मासिकांमध्ये लिहायची.’
1940 मध्ये नाझींनी फ्रान्सवर ताबा मिळवला. त्यावेळी नूर फ्रेंच लोकांसोबत ब्रिटनला गेली. तिथे पोहोचताच युद्धात सहभागी होण्याच्या तयारीला लागली. ज्यावेळी ती लंडनमध्ये गेली होती, तेव्हा ब्रिटिश लष्कराचे मोठे-मोठे फलक लावण्यात आले होते. ‘लष्कराला मनुष्यबळाची अतिशय आवश्यकता आहे,’ असे त्यावर लिहिले होते. नूरने ब्रिटिश सैन्यात नोकरीसाठी अर्ज केला. पण, लष्कराकडून तिला नकार कळवण्यात आला. नूरचे वडील सूफी प्रसारक होते, भारतीय होते. ते इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या टिपू सुलतानचे पणतू होते. नूरदेखील मॉस्कोमध्ये जन्मली होती आणि फ्रेंच नागरिक होती. काही नुकतीच फ्रान्समधून परतली होती. अशा  परिस्थितीत ब्रिटिश लष्कराकडून तिची निवड केली जाणे अशक्यप्रायच. त्यावेळी तिचा अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. पण, नूर गप्प बसणारी नव्हती. तिने हिंमत न हारता ब्रिटिश लष्कराला पत्र लिहिलं. तिने या पत्रात म्हटले होते की, तिची आई एक ब्रिटिश नागरिक आहे. ती स्वतः ब्रिटनमध्ये ब्रिटिश प्रोटेक्टिव्ह पासपोर्ट  घेऊन राहत आहे, त्यामुळे तीदेखील ब्रिटिशच आहे. त्यानंतर लष्कर अधिकार्‍यांनी तिला मुलाखतीसाठी बोलावले.
तिच्या चरित्रात दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलाखतीत अतिशय खोचक प्रश्न विचारण्यात आले.  
पहिला प्रश्न असा होता, “महात्मा गांधी यांच्याविषयी तुझे काय विचार आहेत?”
तिने उत्तरादाखल सांगितले, “महात्मा गांधी भारतात जे करत आहेत, त्यमुळे मी  प्रभावित झालेले आहे.”
 लष्करी अधिकार्‍यांनी तिला दुसरा प्रश्न उपस्थित केला,  
 “ जे ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढत आहेत, त्या भारतीय  नेत्यांना तू पाठिंबा देशील का?”
 यावर नूर म्हणाली, “सध्या फॅसिझमच्या विरोधात युद्ध सुरू आहे आणि ब्रिटनला पूणर्पणे पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे . परंतु, हे युद्ध संपताच मी भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा देईन.”
या उत्तराने ब्रिटिश अधिकार्‍यांवर प्रभाव पडला. त्यानंतर तिची निवड झाली. नोव्हेंबर 1940 मध्ये तिला ब्रिटिश लष्करात एअर फोर्समध्ये सेकंड क्लास ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. ती नोराह बेकर नावाने वुमेन्स ऑग्जिलरी एअरफोर्स मध्ये दाखल झाली. एक वायरलेस ऑपरेटर म्हणून तिने प्रशिक्षण घेतले. त्यावेळी एक महिला म्हणून हे काम खूप जिकीरीचे होते. तिला अवगत असणार्‍या भाषा आणि हे तंत्रज्ञानाचे कौशल्य इथे उपयोगी पडले होते. 1943 मध्ये स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तिला फ्रान्स सेक्शनमध्ये काम करावे लागले होते. नूर ही पहिली रेडिओ ऑपरेटर होती, जिला नाझी व्याप्त फ्रान्समध्ये पाठवण्यात झाले होते.
तब्बल दीड वर्षांनंतर तिला स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्हच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. फ्रेंच भाषेवर तिची मजबूत पकड होती. ही एक सिक्रेट ब्रिटिश फोर्स होती, जी युरोपमध्ये नाझींविरोधात स्थानिक विद्रोहात मदतीसाठी गुप्तहेर पाठवले जायचे. या कामात सामान्य वेतन मिळायचे. जीवावर बेतणारे काम होते पण, हे धाडस नूर करायला तयार झाली. कधी कधी वायरलेस ऑपरेशनच्या प्रशिक्षणावेळी नूर घाबरायची. सर्व अधिकार्‍यांना वाटायचे की, नूर एक गुप्तहेर म्हणून काम करू शकत नाही. पण, फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व आणि संदेश तत्काळ कोड-डीकोड करणे हे पाहून नूरला हेरगिरी करण्यासाठी रेडिओ ऑपरेटर बनवून ला 1943 मध्ये फ्रान्समध्ये पाठवण्यात आले. तिचे कोड नाव होते- ममेडेलिज:
हे काम आधी पुरुषच करायचे. जर्मन सीक्रेट पोलिस ‘गेस्टापो’ ऑपरेटरचे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच गुप्तहेरांना ओळखून सहजपणे पकडू शकत होते. आणि लवकरच झालेही तसेच. जर्मनीने सर्व ऑपरेटर्सना पकडले. तेव्हा एकच ट्रान्समीटर शिल्लक राहिले होते - ते होते नूर इनायत खान. ब्रिटिश सैन्याने नूरला माघारी बोलावलं. पण नूरने परत येण्यास नकार दिला. पुढील काही महिने नूर एकटीच फील्ड ऑपरेटर म्हणून काम करत राहिली. त्यावेळी ती आपल्या मिशनपासून मागे हटली नाही. तिला माहिती होतं की, तिने एकाच जागेवरून जर 15 मिनिटांपर्यंत मेसेज पाठवला तर जर्मन सैन्याला तिचा ठावठिकाणा समजेल. त्यामुळे ती नेहमी संदेश पाठवल्यानंतर पार्कमध्ये जायची. एक दिवया ती आपल्या ट्रान्समिशन मशीनसोबत पार्कमध्ये होती. तेव्हा जर्मन सैनिकांनी तिला अडवून तिची चौकशी केली.
“तुझ्या ब्रीफकेस मध्ये काय आहे?”
 नूर म्हणाली, “सिनेमा दाखवायची मशीन आहे.”
 अशा प्रकारे जर्मन सैन्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ती फरार होत राहिली. पण तिचा चेहरा शत्रूने ओळखला  होता. त्यामुळे प्रत्येक दिवशी तिला आपलं बाह्यरूप बदलावं लागत असे. ती बराच काळ अनेक ठिकाणे आणि पोशाख बदलत राहिली.
त्यावेळी नाझी जर्मनीने एक सीक्रेट पोलिस दलाची निर्मिती केली होती. नाव होतं- गेस्टापो.  हेरगिरी करताना नाझी सैनिकांकडून पकडल्या गेलेल्या नूरला तिच्याच सहकार्‍यांनी धोका दिला होता. पैशाच्या लोभाने तिच्या जवळच्या सहकार्‍याने तिच्याविषयीची सगळी गुप्त माहिती नाझी सैन्यांना सांगितली. यामुळे नूरचे सर्व रहस्य उघड झाले आणि ऑक्टोबर 1943 मध्ये गेस्टापोने तिला पकडलेे. तुरुंगात तिचा अतोनात छळ करण्यात आला. एका अपार्टमेंटमधून केवळ पाच सहा सैनिकांनी तिला घेरलं. विश्वासू सहकार्‍यांनीच विश्वासघात करून  तिची सर्व गुपिते उघड केली होते. गेस्टापोंनी तिला पकडून जर्मनीला नेलं. जर्मन अधिकार्‍यांसाठी नूर खूप धोकादायक कैदी होती. तुरुंगात इतका छळ होऊनही नूरने ना आपल्या स्वत:बद्दल काही सांगितले, ना ब्रिटन लष्कराविषयी. जर्मनीला तिने कुठलीही गोपनीय माहिती दिली नाही. तिने दोनवेळा तुरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. पलायनावेळी दोन्ही वेळा ती पकडली गेली. जर्मन सैन्याने तिच्याकडून ब्रिटिश लष्कराबद्दल माहिती काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, नूरचे खरे नावदेखील ते माहिती करू शकले नाहीत, असे म्हटले जाते.
अखेर 27 नोव्हेंबर, 1943 रोजी नूर इनायत खानला पॅरिसहून जर्मनीला नेण्यात आले. जवळपास नऊ ते दहा महिने त्रास देऊन तिच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होत राहिला. तरीही, जर्मन सैन्याला एका अक्षराचादेखील थांगपत्ता तिने लागू दिला नाही. सप्टेंबर, 1944 मध्ये नूर इनायतला एका कँपमध्ये नेण्यात आले. 13 सप्टेंबर. 1944 रोजी तिला गोळी मारण्यात आली. मृत्यूसमयी ती 30 वर्षांची होती. तिच्यावर गोळी झाडल्यानंतर शेवटचा शब्द तिच्या तोंडातून निघाला तो म्हणजे मलिबेरेते. हा एक फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ ‘स्वातंत्र्य’ असा होतो. जेव्हा जेव्हा जगभरातल्या मोठमोठ्या गुप्तहेरांबद्दल चर्चा होते, तेव्हा नूर इनायत खानचे आदराने घेतले जाते.

मादुकरी ते यशस्वी उद्योजक मधवा आचार्य यांचा अथांग प्रवास

एखादा उद्योजक जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा त्यामागे प्रचंड मेहनतच तर असतेच शिवाय सहनशीलताही खूप महत्त्वाची असते. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. तोंडात साखर असेल तर ध्येय गाठणारी माणसे शून्यातून विश्व निमार्ण करतात. अशाच एका यशस्वी उद्योजक म्हणून बेळगावातील मधवा आचार्य या मेहनती माणसाची कहाणी. एक मादुकरी ते उद्योजक म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटवलेल्या मधवा यांनी मजल दरमजल करत  उद्योग विश्वात जी उंची गाठलीय, ती वाखाणण्याजोगे आहे. उद्योग जगतात धाडसाने उचलेल्या पावलांमुळेच आज त्यांच्या उद्योगाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.


उद्योग विश्वातील एक हुशार उद्योजक म्हणून मधवा नरसिंह आचार्य यांना ओळखले जाते. मधवा आचार्य हे कर्नाटकातील प्रसिध्द उद्योजक आहेत. त्यांच्या हाताखाली सध्या सातशे कामगार कार्यरत आहेत. एका छोट्या इंडस्ट्रीचे रुपांतर आता ५ वेगवेगळ्या प्लँटमध्ये झाले आहे.
 
नरसिंह कृष्णा आचार्य हे त्यांचे वडील होते. तेही एका राईस मिलचे मालक होते. पण, एका व्यक्तीकडून त्यांची फसवणूक झाली. मधवा यांच्या वडिलांनी न खचता आपल्या मुलांचे संगोपन केले. राईस मिल हातातून गेली आणि तेथून सुरु झाला आयुष्याचा खडतर प्रवास.    

मधवा यांचा जन्म अथणी येथे झाला. सध्या ते बेळगाव येथे स्थायिक आहेत. मुळचे गाव धारवाड जिल्ह्यातील आहे. मधवा यांनी वयाच्या ९ व्या वर्षांपासून वेद शिकायला सुरुवात केली होती. मधवा यांचे दहावीपर्यंत शिक्षण अथणीमध्ये झाले.  पुढे बीएससीचे शिक्षण बेळगावात झाले.

 पदवीनंतर नोकरी न करता त्यांनी उद्योग करायचे ठरवले. हातात फारसे भांडवल नव्हते. १९८० मध्ये त्यांच्या भावाने मदत केल्यानंतर १९८१ मध्ये एखादा उद्योग सुरू करावा असा विचार मधवा यांना आला. त्यांनी आतापर्यंत फौंड्री, मशीनिंग (सीएनसी), हिट ट्रीटमेंट असे कारखाने उभारले आहेत.
 
*मादुकरी ते उद्योजक अथांग प्रवास*

सुरुवातीला माधव मादुकरी होते. (मादुकरी म्हणजे-मुंज झाल्यानंतर ब्राह्मणांच्या घरी जाऊन ओम भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागायची असते) जिऑलाजीमध्ये बीएससी केल्यानंतर भावाने उद्योग सुरू करण्यासाठी दिलेल्या २५ हजार रुपयांतून त्यांनी लेथ मशीन खरेदी केली. पण या उद्योगात काही नफा, प्रगती नाही, हे समजल्यावर फौंड्री सुरू केली. भाड्याने फौंड्री घेऊन काही कामगार हाताखाली घेतले. पुढे मधवा यांनी स्वत:ची फौंड्री घेतली.

अभिषेक अलाॅईज प्रायव्हेट लिमिटेड नावाने मधवा यांचा उद्योग आहे. सध्यस्थितीत फौंड्रीत वेगवेगळे पाच युनिट आहेत. या युनिटमध्ये शेल मोल्डींग प्लॅन्ट, हिट ट्रीटमेंट प्लॅन्ट, मशिनिंग फॅसिलिटी, शेल प्लॅन्ट, हिट ट्रिटमेंट प्लॅन्टचा समावेश आहे.  

मधवा यांनी फौंड्रीसाठी लागणारे नवे तंत्रज्ञान आत्मसात करत सीएनसी मशीन घेऊन काम सुरू केले होते. बेळगावला फौंड्री उद्योग सुरू केला. आता या फौंड्रीमध्ये साडे सहाशेहून अधिक कामगार आहेत. चाळीस वर्षांच्या प्रदिघर् खडतर प्रवासानंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून मधवा आचार्य नावारुपास आले.

*साऊथ आफ्रिकेत निर्यात*

प्रत्येक वर्षी जसे झेपेल तशी जमीन घेतली. सुरुवातीला साडेचार एकर आणि नंतर साडेपाच एकर जागा घेऊन प्लँटसाठी जमीन घेण्यात आली. जर पुढच्या भविष्य काळात जर प्रगती झाली, तर तेथे नवा प्लँट उभा करण्याचा मानस आहे. काही उत्पादने साऊथ आफ्रिकेतील कंपनीला निर्यात होतात. तर बेंगलोरमधील बॉश, क  मिन्स लोकल कंपन्या आहेत, त्यांच्याकडेही उत्पादने निर्यात होतात. bosch, cummins, forbes marshall, poclain hydraulics, howden, pragati, rexrorth, polyhydron यासारख्या कंपन्यांना कच्चा मालाचा पुरवठा केला जातो. यामध्ये आॅटोमोटिव्ह, हायड्राॅलिक्स, टूल बिल्डसर्, ट्रॅक्टर, रेल्वे आणि कन्स्ट्रक्शन इक्वीपमेंटसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा समावेश आहे.
 
आता उद्योगात इतकी पारदर्शकता, नियमितता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि परफेक्शन आलं आहे की, गेलेला माल कधीच परत येत नाही. मालाची गुणवत्ता इतकी चांगली आहे की, कुठल्याही कंपनीने माल परत पाठवलेला  नाही. त्याचबरोबर मधवा यांची विश्वासर्हता उत्तम ठरलीय. उद्योग नेटाने पुढे नेण्यासाठी प्रत्येक वर्षी उद्योगात नाविन्यता आणली जाते.

'नवंनवं तंत्रज्ञान आत्मसात केलं जातं. मी धाडसाने निर्णय घेतो. मी स्वत: या कंपनीचं नेतृत्व करत असल्यामुळे मला घाबरून चालत नाही. कारण या कंपनीवर अवलंबून अनेक कामगार, स्टाफ आहे. मी जर घाबरलो तर कंपनी ढासळेल,' असे मधवा म्हणतात.

*कोरोना काळात तग धरून राहिले*

कोरोना महामारीच्या काळात मधवा यांचे नियोजन इतकं उत्तम होतं की, सर्व कामगारांचे पूर्ण पगार देण्यात आले. कोरोना काळातही कंपनी तग धरून राहण्यासाठी आधीपासूनचं केलेलं नेटनेटकं नियोजन महामारीच्या काळात उपयोगी ठरलं.  कोरोना सारख्या आपत्ती आली तर कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मधवा हे महिन्या-महिन्याला पैशांचं नियोजन करत राहतात. जर उद्या कंपनीची बिल आले नाहीत किंवा कामगारांनी काम बंद केलं तर पडत्या काळात पैसे येणार कुठून यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून उत्तमपणे नियोजन केले जाते.

*कामगारांना सुविधा*

कामगारांना कोड, ईएसआय, ग्रॅच्युईटी, बोनस, पीएफ, सेफ्टी ईअर बड्स, मास्क, हेल्मेट, दोन वेळेचा चहा हे मधवा यांच्या कंपनीकडून दिले जाते.

*अन् सरकारकडून सन्मान*

मादुकरीपासून ते मारुती कार अशा मथळ्याखाली कर्नाटकाच्या एका वृत्तपत्रातून मधवा यांच्याविषयी अनेक लेख प्रसिद्ध झाले होते. गोकूळ नावाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने हे लेख वाचून मधवा यांच्या कारखान्याला भेट दिली. गोकूळ यांनी त्यांच्या कार्याची दखल सरकारपर्यंत पोहोचवली. यशस्वी उद्योजक म्हणून सरकारकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी मधवा हे वडिलांसोबत विज्ञान भवन, दिल्ली येथे गेले. त्यावेळी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा होते.

एखादा उद्योग उभा करायचं म्हटलं की, आर्थिक भांडवल प्राधान्याने येते. त्यामुळे नव्या उद्योजकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि सहनशीलता ठेवण्याची फार गरज असल्याचे मधवा आचार्य मौलिक सल्ला देतात. 

छोटेखानी दुकान मालक ते मशिनरी शोरुम्स मालक - प्रशांत कुलकणीर् यांचा यशदायी प्रवास

बाबांनी सायकलीला अडकवलेल्या छोट्याशा पिशवीत काहीतरी खाऊ असणार, असे गृहित धरून मोठी स्वप्ने पाहणारे आणि ते सत्यात उतरवणारे कोल्हापूरचे उद्योजक प्रशांत कुलकर्णी. त्यांची यशोगाथा सांगणे, हे उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण पर्वणीच आहे. छोट्याशा दुकानापासून सुरु झालेला कुलकर्णी यांचा प्रवास कारखान्याचे मालक, उद्योजक आणि उद्यम मागर्दशर्क म्हणून सुरु आहे. वेगवेगळ्या यंत्र विक्रीचे छोटेसे दुकान सुरु करताना ग्राहकांकडून होत असलेली नानाविध यंत्रांची मागणीच प्रशांत यांना पुढे घेऊन गेली अन्  मोठ्या इंडस्ट्रीचे मालक अशी ओळख बनली.

प्रशांत मदनराव कुलकर्णी हे मुळचे कोल्हापूरमधील शिरोळ गावचे. गोखले विद्यालय, तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल आणि त्यानंतर काॅलेज ऑफ कॉमर्स येथून बी कॉमची पदवी पूर्ण केली. कोल्हापुरातील शाहुपुरी येथे वडील मदनराव कुलकर्णी  महिलांना गृहद्योगाला लागणारी यंत्रे विक्रीची कामे करायचे. हे छोटेखानी दुकान होते.
१९८० पासून प्रशांत यांनी दुकानाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. या व्यवसायात खूप नुकसान सहन करावं लागलं एकतर घरची परिस्थिती बिकट होती. सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या परिस्थितीत प्रशांत यांना आपल्या दैनंदिन गरजा देखील भागवू शकत नाही, अशी जाणीव झाली. चैनी वगैरे या वस्तू तर लांबचं पण वह्या-पुस्तके खरेदी करणेही दुरापास्त झाले. शाळेचे शिक्षण ईबीसीवर झाले. अंगावर कपडेदेखील नीटसे नसायचे. काही नातेवाईक कपडे द्यायचे. पायात चप्पलदेखील नसायची. त्याकाळी गरीब परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण होऊ लागली.
एकेकाळी वडील मदनराव कुलकर्णी यांनी संपन्नता खूप भोगलेली होती. पण, नंतरच्या काळात उद्योगधंद्यातील अडचणी आणि मंदीमुळे यंत्रे विक्रीचे दुकान डबघाईला आले होते. वडिल मोडकी सायकल घेऊन  आपल्या दुकानात जायचे. मात्र जेव्हा ते घर परतायचे, तेव्हा प्रशांत आशा लावून बसायचे की, बाबांनी पिशवीतून काहीतरी खाऊ आणले आहे काय? या आशाळभूत नजरेने जीवनाचे चक्र सुरु राहिले.
याचवेळी लहान वयात असतानाच प्रशांत यांना जबाबदारीची जाणीव झाली. आपल्याकडे चार पैसे आले पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. यावेळी सिनेमा लाईनमधून खूप पैसे मिळतात म्हणून त्या क्षेत्राचीदेखील वाट धरली. पण लक्षात आले की, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही. तेव्हा सिनेमा लाईन सोडली.
प्रशांत यांनी १९८१ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांच्या दुकानाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. काही ग्राहकांना हवा असलेला माल दुकानात उपलब्ध नसायचा. मग पटकन प्रशांत हे सायकल घेऊन दुसरीकडून माल आणून द्यायचे. त्यात १०-१५-२० रुपये नफा व्हायचा. ही छोटी गोष्टदेखील प्रशांत यांच्यासाठी गगनात आनंद न मावणारी होती.
वयाच्या १६ व्या वर्षांपासून प्रशांत यांनी या उद्योगात लक्ष घातले. हळूहळू छोट्या एजन्सी घेतल्या. स्वत:कडे वाहन नव्हते, टेलिफोन नव्हता. दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात ग्राहकांचे फोन यायचे, त्यांची मागणी पूर्ण  करण्यासाठी पायी धावाधाव करायचे. असे सुरु असतानाच प्रशांत यांना लक्षात आले की, गृहद्योग संबंधित यंत्रे असल्यामुळे केवळ त्याची विक्री करणेच नाही तर त्या महिलांना यंत्राची ओळख करून देणे गरजेचे होते. मग प्रशांत ती यंत्रे हाताळायची कशी, याचे प्रशिक्षण गावोगावी जाऊन देऊ लागले. रात्रंदिवस खेडोपाडी फिरून महिला काम कशा करतात, मग ते मिरची कांडायचे काम असो वा पापड बनवाायचे, याकडे लक्ष दिले. हळूहळू एखादे यंत्र विकल्यानंतर त्या महिलेला प्रशिक्षण दिलं गेले पाहिजे, त्यांच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, असे लक्षात आले. दरम्यान, पाच ते सात वर्षांत चांगल्या एजन्सी मिळत गेल्या. व्यवसाय वाढवण्यात त्यांना यश मिळाले. साधारणत:  १९९७ पर्यंत प्रशांत यांनी उद्योगाचे बस्तान बसवले. मोठा ग्राहक वर्ग निमार्ण झाला. यंत्रांची मुबलकताही झाली.
१९९७ मध्ये प्रशांत यांना लक्षात आले की, खूप अशी यंत्रसामुग्री आपण बाहेरच्या व्यापारांकडून आणून ती विकतो. मग आपण स्वत: का नाही ही यंत्रे बनवत? आपण जी यंत्रे विकतो ती आपल्याकडेच तयार व्हावीत, या हेतूने त्यांनी टोप संभापूर (कोल्हापूर) एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. यामध्ये मिरची कांडप यंत्र, शेवई तयार करण्याचे यंत्र, पिठाच्या गिरण्या, मिरची दळण्याचे यंत्र, भाताला पॉलिश करण्याची यंत्रांचे उत्पादन  सुरू झाले. यामुळे क्वालिटी कंट्रोलमध्ये ठेवणे आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा कायम ठेवण्यात प्रशांत यांना यश मिळाले. बालाजी इंजिनिअरिंग वर्क्स नावाने फॅक्टरी कायर्रत झाली.  
आता रत्नागिरीतील साखरपा येथे बालाजी अँड हाडवर्क्स नावाने शोरुम्स उभारले आहेत. यामध्ये शेवई यंत्र, पापड यंत्र, मिरची मसाले दळण्याचे यंत्र, मिरची कांडप यंत्र, भाताची हॉलोअर्स, राईस पॉलिश यंत्र, सर्व प्रकारच्या पिठाच्या गिरण्या, कापूर मशीन अशा अनेक प्रकारच्या यंत्रांची उत्पादने आहेत.  ५०-६० लाखांचा टर्न ओव्हर असलेली इंडस्ट्री जोमाने सुरु आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध जिल्हा परिषदांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आल्या. त्यावेळी ही यंत्रसामुग्री दाखवून टेंडर मिळवले आणि तसा यंत्रांचा पुरवठा करण्यात आला. प्रचंड यश तर मिळत गेलंच. पण इथंवर प्रशांत थांबले नाहीत. त्यांनी शासनाकडे जाऊन आपले म्हणणे पटवून दिले की, यंत्रांची विक्री होतेय, आपणास बिलेदेखील मिळतात. पण, जी यंत्रे लाभार्थींना मिळत आहेत, ती चालवायची कशी हे प्रशिक्षण महिलांना देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक तात्विक जबाबदारी म्हणून प्रशांत यांनी स्वत: ग्रामीण भागात जाऊन मोफतपणे महिलांना यंत्रे कशी चालवायची? याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. महिला स्वावलंबी व्हाव्यात, हाही या मागील एक हेतू होता. अशा प्रकारे तांत्रिक प्रशिक्षण देणारे सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील पहिले उद्योजक म्हणून प्रशांत यांची ओळख झाली.
त्यांनी अनेक वर्ष समाजकल्याण तसेच महिला कल्याण विभागाच्या माध्यमातून योजना राबवल्या. सोबतच यंत्रांचा खपही वाढला. त्याचबरोबर, यंत्रांची रिटेल विक्री केली जायची, तिथेही खेडोपाडी जाऊन तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, महिला बचत गटाची चळवळ कोल्हापूर जिल्ह्यात रुजू होतेय. अनेक संस्था, कर्ज देण्यासाठी बँक आहेत. पण कोणत्या उद्योगासाठी बँकेतून कर्ज मिळते याची माहिती महिलांना नव्हती. दुसरीकडे बँकेच्या मॅनेजरला उद्योग कजार्बद्दलची अधिक माहिती नसायची. या दोन गटात संवाद आणि समन्वय घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
२००७ नंतर लक्षात आले की, महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे वुमेन्स डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन वेलफेअर फाऊंडेशन नवाचा कोल्हापुरात चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला. ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायाभिमुख तांत्रिक ज्ञान देणं, हा या ट्रस्टमागील उद्देश होता. या प्रशिक्षण शिबिरातून माध्यमातून लाखो महिलांना लाभ झाला. ग्रामीण अथर्व्यवस्था बळकट करायची असेल तर ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत, असा प्रशांत यांचा अट्टाहास आहे.    
४३ वर्षांच्या कारकीदीर्तील कष्टाचे फलित म्हणून चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यातील शिखर संस्थेकडून दोन वेळा उत्कृष्ट उद्योजक म्हणून प्रशांत यांना पुरस्कार मिळाले. अन्य अनेक पुरस्कारांचे मानकरीदेखील ठरले. अनेक बड्या यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या त्यांनी आपल्या यशगंध या पुस्तकातून समाजासमोर आणल्या. त्यांना स्वत:ला शाळेत जायला सायकल मिळाली नाही याची जाण ठेवत मुलांना मोफत सायकल, कपडे वाटप केले. बचतगटांना मदत केली. तसेच शेतकरी महिला, पतीने आत्महत्या केल्यानंतर विधवांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना घरगुती उद्योगधंदे सुरु करून दिले. महिलांसाठी आत्मसन्मान योजना आणली. 

टोरेडचा तो रहस्यमयी माणूस कोण

- ऋतुपर्ण

काही वर्ष आधी जपानच्या विमानतळावर एक रहस्यमयी व्यक्ती होता. जो अचानक गायब झाला होता. तो कुठून आला, कशासाठी आला, कुठे गेला काहीचं थांगपत्ता लागला नाही...तो रहस्यमयी व्यक्ती होता तरी कोण?
असं म्हटलं जातं की, संपूर्ण जग रहस्याने भरलेलं आहे. काही रहस्य छुपे आहेत तर काही डोळ्यांदेखत घडलेले आहे. पण काही रहस्य आपल्याला समजणे अशक्यप्राय आहे. कधी कधी अशा घटना घडतात की, ज्यावर विश्वास करणे कठिणचं नाही तर अशक्यचं आहे. अशा काही घटना आहेत, ज्या आजही प्रचलित आहेत. अनेकांनी विवध रहस्य उलघडण्याचा प्रयत्न केला पण, ते सहजासहजी कुणालाही शक्य झालं नाही. काही जणांनी रहस्याचा शोध घेतला तर काहींना त्याचे खूप विचित्र अनुभव आले.  त्यामुळे ते अखेरपर्यंत रहस्यच बनून राहिले.
अनेक ठिकाणी चित्र-विचित्र घटना घडतात अन् त्या नंतर इतक्या चचेर्त राहतात की, वर्षानुवर्ष त्याची कहाणी सांगितली जाते. अशाच एका रहस्यमयी माणसाची कथा, ज्याची आजही चचार् होते. मात्र, तो कोण होता, कोणत्या देशातून आला होता, कशासाठी आला होता, हे मात्र शेवटपर्यंतसमजले नाही.
तो माणूस जो स्वत: ला टोरेड देशातून आल्याचे सांगत होता, तो देश मुळात पृथ्वीवर अस्तित्वातचं नाही. मग हे टॉरेड प्रकरण आहे तरी काय? टॉरेडचे रहस्य आजही कुणी उलगडू शकले नाही वा त्या व्यक्तीबद्दलचं सत्य बाहेर येऊ शकले नाही.
जपानच्या विमानतळावर घडलेली घटना, जी आजही प्रचलित आहे. ही घटना जुलै, १९५४ ची घटना आहे. दुपारी साडेबारा वाजले होते. एक युरोपीयन विमान टोकियोतील  हेनेडा विमानतळावर उतरले. विमानातील सर्व प्रवासी खाली उतरले. सवर्च प्रवासी चेक आऊट काऊंटरकडे गेले. विमानतळावर बसलेले अधिकारी सवर्च प्रवाशांचे पासपोर्ट तपासत होते. तेव्हा त्यांना असा एक प्रवासी भेटला, ज्याचा पासपोर्ट पाहून ते चिंतेत राहिले.
टोरेड एक प्रवासी होता, जो जपानमध्ये एका कामासाठी आला होता. त्याच्या पासपोर्टवर ‘टोरेड’ नावाच्या देशाचे नाव होते. पण टोरेड हा देश आहे तरी कुठे?
विमानतळावरील तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वी अशा कोणत्याही देशाचे नाव ऐकले नव्हते वा कुणाच्या पासपोटर्वरही पाहिले नव्हते. विमानतळावरील अधिकाऱ्यांना तो प्रवासी संशयास्पद वाटला. म्हणून त्यांनी सुरक्षा अधिकार्‍यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला चौकशीसाठी नेले. एका वेगळ्या खोलीत नेऊन त्याची चौकशी केली.  अधिकाऱ्यांनी त्याला आधी जपानला येण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले की, मी एक व्यापारी असून केवळ व्यवसायानिमित्त येथे आलो आहे. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
सुरक्षा अधिकारी त्या रहस्यमय प्रवाशाच्या पासपोर्टची तपासणी करतात की, त्याचा देश "टोरेड" जगाच्या नकाशात आहे तरी कुठे?  खरंच असा काही देश आहे का, याचा शोध ते घेऊ लागले. पण, आश्चयार्ची गोष्ट म्हणजे. अधिकार्‍यांनी विचारले असता त्याने सांगितले की, जपानला येणे हा त्याचा पहिला प्रवास नाही. या पासपोर्टवर त्याने युरोपमधील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. त्याचे बोलणे ऐकून अधिकारीही संभ्रमात पडले. कारण त्याच्या पासपोर्टवर इतर देशांचे शिक्के होते. तो प्रवासी ज्या देशातून आला होता ते ठिकाण प्रत्यक्षात पृथ्वीवर कुठेतरी आहे, हे अधिकारी मान्य करण्यास तयार नव्हते. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांनी त्याला नकाशा दाखवत त्याचा देश नकाशात दाखवण्यास सांगितले. यावर त्याने ‘अंडोरा’ नावाच्या देशावर बोट ठेवत हा आपला देश असल्याचे सांगितले. मात्र येथे ‘टोरेड’ ऐवजी अंडोरा असे का लिहिले आहे, हे समजत नाही. ही व्यक्ती स्वत:ला ‘काल्पनिक’ देशातून का सांगत आहे हे ऐकून अधिकाऱ्यांना आणखी आश्चर्य वाटले. पण त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे पाहता तो खरे बोलतोय, असेही वाटले. आता तो गूढ प्रवासी खरे बोलतोय की खोटे हे कळण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे तो ज्याला व्यवसायानिमित्त भेटायला आला होता.
अधिकार्‍यांनी त्याला विचारले असता की, तू कुणाला भेटायला आला, कुठे जायचे आहे? तेव्हा त्याने कंपनीचे नाव सांगितले. तसेच त्याला कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे होते तेही त्याने सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनी आणि हॉटेलशी संपर्क साधला. मात्र त्यांनी अशी कोणतीही व्यक्ती ओळखत नसल्याचे सांगितले. आता तपास अधिकार्‍यांना वाटले की, कदाचित हा कोणीतरी लबाड गुन्हेगार आहे, जो आपली ओळख लपवून काही घटना घडवण्यासाठी येथे आला आहे.
संशय आणखी बळावताच अधिकाऱ्यांनी त्याचे सर्व साहित्य जप्त केले आणि कडक पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला हॉटेलच्या खोलीत बंद केले.
दुसऱ्या दिवशी खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीत कोणीच नसल्याचे पाहून पोलिसांना धक्काच बसला. खोलीच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता आणि खोलीच्या सर्व खिडक्या आधीच सील केलेल्या होत्या. विमानतळावर जप्त केलेला त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रेही गायब असल्याचे समजल्याने पोलिसांना आणखी आश्चर्य वाटले. आता हे सगळं कसं झालं हे कोणालाच समजत नव्हतं. या घटनेचे अनेक किस्से चांगलेच चचिर्ले गेले आहेत. काहीजण म्हणतात की रहस्यमय व्यक्ती दुसऱ्या जगातून आली आहे. तर काही म्हणतात की, तो टाईम मशीनद्वारे चुकून येथे आला असावा आणि त्याचे रहस्य उलगडणार असल्याचे पाहून तो कुठेतरी गायब झाला. आता हे खरे आहे की खोटे हे कोणालाच माहीत नाही, परंतु या रहस्यमय घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यापैकी एक "डायरेक्टरी ऑफ पॉसिबिलिटीज" आहे.
जग अनेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. इतिहासात अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही. कधी कधी इतक्या अनाकलनीय गोष्टी होतात की, त्या शेवटपर्यंत उलगडत नाहीत. शिवाय इतरही काही रोचक गोष्टी ज्या मिस्ट्री बनून राहतात. त्यापैकी एक टोरेड होय. 

शांग्रीलाचा गूढ प्रदेश

 ऋतुपर्ण


              
आपण ज्या जगात राहतो, ते विविध  रहस्यमय आणि वैचित्र्यपूर्ण गोष्टीनी भरलेलं आहे आहे. आता हेच पहा ना, कधीही न बुडणारे भव्य जहाज अशी ज्याची मोठी जाहिरात  केली होती, ते टायटॅनिक हे 1912 मध्ये तयार झालेलं जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात दोन तुकडे होऊन समुद्राच्या तळाशी गेलं. जगात अशी अनेक जहाजं बुडतात, फुटतात. विमानांना अपघात होतो, ती कोसळतात इत्यादी. असं असलं, तरी ही जहाजं आणि विमानं यांचे अवशेष हे कुठं ना कुठंतरी सापडतातच. त्यांच्या अपघाताची ठोस कारणंसुद्धा सापडतात. पण जगात एक ठिकाण असं आहे की, समुद्रावरून जाणार जहाजं असो, की, आकाशातून उडणारं विमान असो, त्या विशिष्ट क्षेत्रात गेलं रे गेलं, की ते तात्काळ नाहीसं होतं. त्यांचं काय झालं, ती कुठं आणि कशी अदृश्य झाली हे काही काही समजत नाही, की, त्यांचा एखादाही अवशेष कुठंही सापडत नाही. त्या क्षेत्राला, बर्म्युडा त्रिभुज- बर्म्युडा अँगल असं म्हणतात. गेल्या अनेक वर्षांत जगभरच्या शास्त्रज्ञांनी सातत्यानं शोध घेऊनसुद्धा बर्म्युडा त्रिभुजाच्या रहस्याचा शोध ते घेऊ शकलेले नाहीत.
बर्म्युडा त्रिभुजप्रमाणेच पर्वतशिखरावरील असंच एक रहस्यमय ठिकाण आहे- शांग्रीला घाटी ही घाटी तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमांच्या दरम्यान आहे. असं मानलं जातं की, हा दुसर्‍या जगात जाण्याचा मार्ग आहे. कारण शांग्रीलावर जो कोणी मनुष्य गेला, तो कधीही परत आलेला नाही. शांग्रीलावर अनेक रहस्यं दडलेली आहेत, असं म्हणतात. त्यातल्या काही रहस्यांचा उलगडा झालेला आहे आणि इतर बर्‍याच रहस्यांचा उलगडा झालेला नाही. ह्या घाटीला शंभाला आणि सिद्धाश्रम असंही म्हणतात. या प्रदेशात ज्ञानगंज मठ,  सिद्ध विज्ञान आश्रम आणि  योग सिद्धाश्रम अशी तीन साधना केंद्रं आहेत असंम्हणतात. अनेक दिग्गज लेखकांनी शांग्रीलाविषयी लिहिलेलं आहे. जेम्स हिल्टन यांच्या ‘द लॉस्ट होरायझन’ नामक कादंबरीत शांग्रीलाच्या रहस्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच अरुण शर्मा यांनी ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’ ह्या पुस्तकातही शांग्रीलाच्या रहस्याविषयी लिहिलेलं आहे. वायुमंडलाच्या चौथ्या आयामाने ही घाटी प्रभावित आहे, असं वर्मा लिहितात. शांग्रीला हा प्रदेश काळाच्या प्रभावाखाली येत नाही, तो कालातीत आहे किंवा काळ इथे थांबलेलाच असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं मन, प्राण आणि विचारांचं सामर्थ्य अत्युच्च पातळीला जाऊन पोहोचतं, असंही म्हटलं जातं. याउलट कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीवित प्राणी शांग्रीलावर पोहोचला, तर त्याचं अस्तित्व शिल्लकच रहात नाही, असंही म्हटलं जातं. चीनच्या सेनेनं हे रहस्य शोधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण त्या सेनेला त्यात यश मिळालं नाही. त्यांना तिथं काहीही आढळून आलं नाही. कारण ही सेना तिथपर्यंत पोहोचू शकली नाही.
 आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही शांग्रीलाचे आकर्षण वाटत असते. रामायण, महाभारतात आणि वेद- उपनिषदांत उल्लेख असलेल्या ह्या प्रदेशाला पृथ्वीवरचं महत्त्वाचं आध्यात्मिक आणि मंत्र- तंत्राचं केंद्र मानलं जातं.  ज्यांनी आद्य शंकराचार्यांना दीक्षा दिली, ते महावतार बाबा हे इथल्या सिद्धाश्रमात अजून साधना करत आहेत, असं आसपासचे लोक म्हणतात. महावतार बाब हे ख्यातनाम योगी श्यामचरण लाहिरी यांचेही गुरू आहेत. ह्या घाटीविषयी ‘काल विज्ञान’ नामक ग्रंथात साद्यंत माहिती आहे, असं सांगितलं जातं. हा ग्रंथ तिबेटच्या तवांग मठाच्या ग्रंथालयात ठेवलेला आहे. हे एक काल्पनिक ठिकाण आहे, असं जेम्स हिल्टन यांचं म्हणणं आहे. अनेकविध पुस्तकांत वाचून जगभरातील अनेक उत्सुक पर्यटक आणि संशोधकांनी शांग्रीलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आलं. कुणीही काही ठोसपणे शांग्रलाविषयी सांगू शकलेलं नाही. पण इतक्या सगळ्या पुस्तकांमध्ये शांग्रीला घाटीविषयी लिहिलं गेलेलं आहे, ते कसं काय? हा प्रश्न उरतोच.
हा प्रदेश अंतराळवासीयांशी संबंधित आहे, असं तिबेटी विद्वान युत्सुंग यांचं मत आहे. आपण स्वतः तिथं जाऊन आलो आहोत, असं युत्सुंग यांनी नोंदवलेलं आहे. युत्सुंग हे एक बौद्ध साधक आहेत. शांग्रीलावर सूर्यप्रकाश नाही आणि तिथून चंद्र- तारे दिसत नाहीत, तिथं दुधाळी रंगाचा प्रकाश पसरलेला असतो, असं युत्सुंग म्हणतात. ह्या ठिकाणाला पंगासाऊ असंही म्हणतात. इथून जवळच म्यानमारची सीमा लागते. या प्रदेशात दीड कि. मी. लांबीचं एक अतिशय शुद्ध पाण्याचं सरोवर आहे. त्याची रुंदी एक किलोमीटर आहे. प्राचीन काळी हे सरोवर आता आहे त्यापेक्षा  मोठं होतं. हे सरोवर भूचुंबकीय लहरींनी वेढलेलं आहे. त्यामुळं त्याची छायाचित्रं काढता येत नाहीत, असं म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात एक अमेरिकन विमान आपत्कालीन परिस्थितीत शांग्रीलाच्या सपाट जागेवर  उतरवण्यात आलं, पण विमानातले सगळे हवाई सैनिक मृत्युमुखी पडले, अशी एक दुर्घटना सांगितली जाते. शांग्रीलाच्या परिसरात तंगसा ही आदिवासी जमात वास्तव्य करते. त्यांना मध्यरात्रीच्या वेळी इथून अनेक रहस्यमय आवाज ऐकायला येतात,

गिरनार पर्वतावरील पायर्‍यांचं रहस्य

- ऋतुपर्ण

जूनागढची गोष्ट जेव्हा समोर येते, तेव्हा गिरनार नक्की डोळ्यासमोर येते. गिरनार सर्वांसाठी आस्थेचे प्रतीक आहे. १०,००० पायऱ्या चढून जायच्या म्हणजे खरंच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी लागते. कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य आहे. प्रत्येक वर्षी लाखों भक्त गिरनारवर चढून जातात. गिरनारच्या पायऱ्या खरंच खूप अवघड आहे, एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल, पायऱ्या कोणी आणि कशा तयार केल्या असतील, हे आश्चयर्जनकच आहे.
गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे.  जुनागडमध्येच गिरनारचा उंच डोंगर आहे, तिथे दत्तात्रेय मंदिर आहे. येथे हिंदू धर्माचीच नव्हे तर जैन धर्माचीही अनेक मंदिरे आहेत. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशीही सापडतात. सम्राट अशोकाच्या पूर्वीचे ही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैन धमीयांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे.
येथे इसवी सन पूर्व २५० मधील सम्राट अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. ‘रा’ खेंगार आणि चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेषही गिरनारवर सापडतात.
पाच हजार पायऱ्या चढल्यानंतर तेथे अंबामातेचे एक मंदिर आहे. देवी  पार्वतीने अंबामातेनच्या रुपात गिरनार पवर्तावर वास केला म्हणून हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यापुढे पाचशे पायऱ्या चढल्या की गोरक्षनाथांचे मंदिर आहे. पुढे पंधराशे पायऱ्या संपल्या की, भैरवनाथाचे मंदिर आहे. ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच ठिकाणी गुरु दत्तात्रेयांनी १२ हजार वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. २२५० पायऱ्यांनंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांची गुंफा लागते. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, अशी लहान लहान मंदिरे आहेत.
बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. पुढे भगवान नेमिनाथ चे मंदिर आहे. भवनाथांसह अनेक मंदिरे येथे आढळतात. इतक्या पायऱ्या चढून जाणे ही एक परीक्षाच आहे. शिवाय हिंदू आणि जैन धमिर्यांची एकत्र मंदिरे असणे हे या गिरनार पवर्ताचे सर्वांत खास वैशिष्ट्ये म्हणता येईल. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची यात्रा भरते.
जुनागढपासून आठ किमीवरील गिरनारला जाण्यास अनेक वाहने आणि वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. तसेच रोप वे देखील आहे. पण भक्त पायऱ्या चढून जातात.
गिरनारच्या निमिर्ती आणि त्याच्या पायऱ्यांशी संबंधित एक महान इतिहास जोडला गेला आहे. गिरनार गुजरात सवार्त उंच पर्वत आहे. लोक येथे वषर्भर तीर्थयात्रा करण्यासाठी येतात. देवदिवाळीच्या वेळी लोक लीली परिक्रमाचे आनंद देखील घ्यायला येतात. गुजरातच्या जुनागढची आणि गिरनार पवर्ताचा इतिहास अचंबित करणारा आहे.
या इतिहासाबाबत सांगितले जाते की, १८५७ च्या क्रांतीला ३२ वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी ब्रिटीशांनी जवळजवळ संपूर्ण भारत काबीज केला होता आणि अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात आली होती. जुनागढही गुजरातमधील एक संस्थान होते. या संस्थानाचा नब बहादूर खान होता. यावेळी जुनागढच्या नवाबाचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई आणि नवाबाचे पर्सनल असिस्टेंट पुरुषोत्तमराज झाला यांनी एक दिवस मिळून नवाबसमोर एक मत मांडले. ते म्हणाले की, हिंदू आणि जैन बांधवांना गिरनारवर जाण्यासाठी खूप कठिण जाते. अनेक भक्त तर मृत्यूमुखी पडतात. आपण पायऱ्या निर्माण केल्या तर? वर जाण्यासाठी पायऱ्या बनवण्याची विनंती त्यांनी नवाबाकडे केली.
नवाबाने एका ब्रिटिश इंजिनिअरला अहमदाबादहून येण्याचं आमंत्रण दिलं. त्या इंजिनिअरने निरीक्षण करून सांगितलं की, गिरनारच्या टोकाला पोहोचण्यापर्यंतचा पायऱ्यांचा एकूण खर्च एक लाख तीस हजार रुपये येईल.
१८८९ में १ लाख ३० हजार रुपये ही मोठी रक्कम ऐकून नवाबला धक्का बसला आणि त्याने नकार दिला. तेव्हा हरिदास देसाई आणि पुरुषोत्तमराज झाला म्हणाले की, नवाबसाहेब, सरकारी तिजोरीतून पैसे देऊ नका, आम्ही लॉटरीचे तिकीट काढू. लॉटरीमध्ये आकर्षक बक्षिसे असतील. आम्ही त्या लॉटरीची किंमत एक रुपया ठेवतो. म्हणजे लोक लॉटरी खरेदी करतील. त्याच पैशातून आम्ही ही शिडीची निमिर्ती करू. आम्ही लिहू की, ही लॉटरी कोणत्या उद्देशाने काढत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू आणि जैन लोक ही लॉटरी खरेदी करतीत. झाला आणि देशाई यांचे म्हणणे ऐकून यावर संमती दिली.
त्यानंतर या कामासाठी १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. बेचारदास बिहारी दास हे या समितीचे प्रमुख होते. १ ऑक्टोबर, १८८९ रोजी एक रुपयाची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीच्या पहिल्या बक्षीसाची रक्कम ४० हजार होती.  नंतर ती दहा हजार करण्यात आली. सर्वात कमी पक्षीस ५ रुपयाचे होते. त्यानंतर या लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आणि त्यात संपूर्ण योजना लिहिली गेली. या लॉटरीच्या तिकिटाच्या उत्पन्नातून एक शिडी होईल असे वर लिहिले गेले. हिंदू आणि जैन भाविकांना गिरनार टेकडीवर जाण्यासाठी ही शिडी बनवली जाईल, असा मजकूर त्यात होता.  
तिकिटामध्ये एक अतिशय आकर्षक योजना ठेवण्यात आली होती, जसे की १२ तिकिटे एकत्र खरेदी केले तर एक तिकीट मोफत, १०० तिकिटे विकणाऱ्याला १५ टक्के कमिशन मिळेल. जर तिकिटींची विक्री नाही झाली तर तुम्ही तिकिटे परत देऊ शकता. त्यानंतर अनेकांनी लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ब्रिटिशांनीही लॉटरीची तिकिटे खरेदी केली.
१५ मे, १८९२ रोजीचा तो दिवस उजाडला. लॉटरीचे बक्षीस काढण्याचे ठरले. हजारे लोक जुनागढ पोहोचले. जुनागड येथील फराज खान यांच्या घरी लॉटरीचे तिकीट ठेवण्यात आले होते. तब्बल १२८६६३ तिकिटे विकली गेली. पहिले १० हजार रुपयांचे बक्षीस मुंबईच्या रहिवासी सविताबेन दह्याभाई खांडवाला यांना देण्यात आले. ज्यांनी गिरनारचा जिना बांधण्यासाठी हे दहा हजार रुपयांचे बक्षीस अपर्ण केले.
१८९२ मध्ये, दहा हजार म्हणजे आजची कोट्यवधीमध्ये रक्कम असेल. दोन लोकांना दोन हजार पाचशे रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले. पंजाबमधील खुदा बक्श आणि लालचंद यांना ते मिळाले. नवसारीच्या बळवंतराय यांना तिसरे बक्षीस दिड हजार रपयांचे मिळाले होते. असा प्रकारे लॉटरी विकून जवळपास १ लाख तीस रुपये जमा झाले.
ब्रिटीश इंजिनिअरच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर काम सुरु झाले. यासाठी एकूण १९ वषार्ंचा कालावधी लागल्याचे. सांगितले जाते. १९ वषार्ंचा कालावधी म्हणजे हा मोठा काळ आहे. हे पायऱ्या निमिर्तीचे काम जितके अवघड तितकेच रहस्यमयदेखील आहे. इतक्या उंचावर बांधकामाचे साहित्य नेणे, मजुरांची दमछाक आणि उन वारा पाऊस सहन करत अगदी नेटनेटके पायऱ्यांची निमिर्ती करणे हेदेखील एक रहस्यच आहे.  

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...