Sunday, December 31, 2023

छोटेखानी दुकान मालक ते मशिनरी शोरुम्स मालक - प्रशांत कुलकणीर् यांचा यशदायी प्रवास

बाबांनी सायकलीला अडकवलेल्या छोट्याशा पिशवीत काहीतरी खाऊ असणार, असे गृहित धरून मोठी स्वप्ने पाहणारे आणि ते सत्यात उतरवणारे कोल्हापूरचे उद्योजक प्रशांत कुलकर्णी. त्यांची यशोगाथा सांगणे, हे उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण पर्वणीच आहे. छोट्याशा दुकानापासून सुरु झालेला कुलकर्णी यांचा प्रवास कारखान्याचे मालक, उद्योजक आणि उद्यम मागर्दशर्क म्हणून सुरु आहे. वेगवेगळ्या यंत्र विक्रीचे छोटेसे दुकान सुरु करताना ग्राहकांकडून होत असलेली नानाविध यंत्रांची मागणीच प्रशांत यांना पुढे घेऊन गेली अन्  मोठ्या इंडस्ट्रीचे मालक अशी ओळख बनली.

प्रशांत मदनराव कुलकर्णी हे मुळचे कोल्हापूरमधील शिरोळ गावचे. गोखले विद्यालय, तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल आणि त्यानंतर काॅलेज ऑफ कॉमर्स येथून बी कॉमची पदवी पूर्ण केली. कोल्हापुरातील शाहुपुरी येथे वडील मदनराव कुलकर्णी  महिलांना गृहद्योगाला लागणारी यंत्रे विक्रीची कामे करायचे. हे छोटेखानी दुकान होते.
१९८० पासून प्रशांत यांनी दुकानाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. या व्यवसायात खूप नुकसान सहन करावं लागलं एकतर घरची परिस्थिती बिकट होती. सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या परिस्थितीत प्रशांत यांना आपल्या दैनंदिन गरजा देखील भागवू शकत नाही, अशी जाणीव झाली. चैनी वगैरे या वस्तू तर लांबचं पण वह्या-पुस्तके खरेदी करणेही दुरापास्त झाले. शाळेचे शिक्षण ईबीसीवर झाले. अंगावर कपडेदेखील नीटसे नसायचे. काही नातेवाईक कपडे द्यायचे. पायात चप्पलदेखील नसायची. त्याकाळी गरीब परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण होऊ लागली.
एकेकाळी वडील मदनराव कुलकर्णी यांनी संपन्नता खूप भोगलेली होती. पण, नंतरच्या काळात उद्योगधंद्यातील अडचणी आणि मंदीमुळे यंत्रे विक्रीचे दुकान डबघाईला आले होते. वडिल मोडकी सायकल घेऊन  आपल्या दुकानात जायचे. मात्र जेव्हा ते घर परतायचे, तेव्हा प्रशांत आशा लावून बसायचे की, बाबांनी पिशवीतून काहीतरी खाऊ आणले आहे काय? या आशाळभूत नजरेने जीवनाचे चक्र सुरु राहिले.
याचवेळी लहान वयात असतानाच प्रशांत यांना जबाबदारीची जाणीव झाली. आपल्याकडे चार पैसे आले पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. यावेळी सिनेमा लाईनमधून खूप पैसे मिळतात म्हणून त्या क्षेत्राचीदेखील वाट धरली. पण लक्षात आले की, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही. तेव्हा सिनेमा लाईन सोडली.
प्रशांत यांनी १९८१ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांच्या दुकानाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. काही ग्राहकांना हवा असलेला माल दुकानात उपलब्ध नसायचा. मग पटकन प्रशांत हे सायकल घेऊन दुसरीकडून माल आणून द्यायचे. त्यात १०-१५-२० रुपये नफा व्हायचा. ही छोटी गोष्टदेखील प्रशांत यांच्यासाठी गगनात आनंद न मावणारी होती.
वयाच्या १६ व्या वर्षांपासून प्रशांत यांनी या उद्योगात लक्ष घातले. हळूहळू छोट्या एजन्सी घेतल्या. स्वत:कडे वाहन नव्हते, टेलिफोन नव्हता. दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात ग्राहकांचे फोन यायचे, त्यांची मागणी पूर्ण  करण्यासाठी पायी धावाधाव करायचे. असे सुरु असतानाच प्रशांत यांना लक्षात आले की, गृहद्योग संबंधित यंत्रे असल्यामुळे केवळ त्याची विक्री करणेच नाही तर त्या महिलांना यंत्राची ओळख करून देणे गरजेचे होते. मग प्रशांत ती यंत्रे हाताळायची कशी, याचे प्रशिक्षण गावोगावी जाऊन देऊ लागले. रात्रंदिवस खेडोपाडी फिरून महिला काम कशा करतात, मग ते मिरची कांडायचे काम असो वा पापड बनवाायचे, याकडे लक्ष दिले. हळूहळू एखादे यंत्र विकल्यानंतर त्या महिलेला प्रशिक्षण दिलं गेले पाहिजे, त्यांच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, असे लक्षात आले. दरम्यान, पाच ते सात वर्षांत चांगल्या एजन्सी मिळत गेल्या. व्यवसाय वाढवण्यात त्यांना यश मिळाले. साधारणत:  १९९७ पर्यंत प्रशांत यांनी उद्योगाचे बस्तान बसवले. मोठा ग्राहक वर्ग निमार्ण झाला. यंत्रांची मुबलकताही झाली.
१९९७ मध्ये प्रशांत यांना लक्षात आले की, खूप अशी यंत्रसामुग्री आपण बाहेरच्या व्यापारांकडून आणून ती विकतो. मग आपण स्वत: का नाही ही यंत्रे बनवत? आपण जी यंत्रे विकतो ती आपल्याकडेच तयार व्हावीत, या हेतूने त्यांनी टोप संभापूर (कोल्हापूर) एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. यामध्ये मिरची कांडप यंत्र, शेवई तयार करण्याचे यंत्र, पिठाच्या गिरण्या, मिरची दळण्याचे यंत्र, भाताला पॉलिश करण्याची यंत्रांचे उत्पादन  सुरू झाले. यामुळे क्वालिटी कंट्रोलमध्ये ठेवणे आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा कायम ठेवण्यात प्रशांत यांना यश मिळाले. बालाजी इंजिनिअरिंग वर्क्स नावाने फॅक्टरी कायर्रत झाली.  
आता रत्नागिरीतील साखरपा येथे बालाजी अँड हाडवर्क्स नावाने शोरुम्स उभारले आहेत. यामध्ये शेवई यंत्र, पापड यंत्र, मिरची मसाले दळण्याचे यंत्र, मिरची कांडप यंत्र, भाताची हॉलोअर्स, राईस पॉलिश यंत्र, सर्व प्रकारच्या पिठाच्या गिरण्या, कापूर मशीन अशा अनेक प्रकारच्या यंत्रांची उत्पादने आहेत.  ५०-६० लाखांचा टर्न ओव्हर असलेली इंडस्ट्री जोमाने सुरु आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध जिल्हा परिषदांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आल्या. त्यावेळी ही यंत्रसामुग्री दाखवून टेंडर मिळवले आणि तसा यंत्रांचा पुरवठा करण्यात आला. प्रचंड यश तर मिळत गेलंच. पण इथंवर प्रशांत थांबले नाहीत. त्यांनी शासनाकडे जाऊन आपले म्हणणे पटवून दिले की, यंत्रांची विक्री होतेय, आपणास बिलेदेखील मिळतात. पण, जी यंत्रे लाभार्थींना मिळत आहेत, ती चालवायची कशी हे प्रशिक्षण महिलांना देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक तात्विक जबाबदारी म्हणून प्रशांत यांनी स्वत: ग्रामीण भागात जाऊन मोफतपणे महिलांना यंत्रे कशी चालवायची? याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. महिला स्वावलंबी व्हाव्यात, हाही या मागील एक हेतू होता. अशा प्रकारे तांत्रिक प्रशिक्षण देणारे सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील पहिले उद्योजक म्हणून प्रशांत यांची ओळख झाली.
त्यांनी अनेक वर्ष समाजकल्याण तसेच महिला कल्याण विभागाच्या माध्यमातून योजना राबवल्या. सोबतच यंत्रांचा खपही वाढला. त्याचबरोबर, यंत्रांची रिटेल विक्री केली जायची, तिथेही खेडोपाडी जाऊन तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, महिला बचत गटाची चळवळ कोल्हापूर जिल्ह्यात रुजू होतेय. अनेक संस्था, कर्ज देण्यासाठी बँक आहेत. पण कोणत्या उद्योगासाठी बँकेतून कर्ज मिळते याची माहिती महिलांना नव्हती. दुसरीकडे बँकेच्या मॅनेजरला उद्योग कजार्बद्दलची अधिक माहिती नसायची. या दोन गटात संवाद आणि समन्वय घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
२००७ नंतर लक्षात आले की, महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे वुमेन्स डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन वेलफेअर फाऊंडेशन नवाचा कोल्हापुरात चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला. ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायाभिमुख तांत्रिक ज्ञान देणं, हा या ट्रस्टमागील उद्देश होता. या प्रशिक्षण शिबिरातून माध्यमातून लाखो महिलांना लाभ झाला. ग्रामीण अथर्व्यवस्था बळकट करायची असेल तर ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत, असा प्रशांत यांचा अट्टाहास आहे.    
४३ वर्षांच्या कारकीदीर्तील कष्टाचे फलित म्हणून चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यातील शिखर संस्थेकडून दोन वेळा उत्कृष्ट उद्योजक म्हणून प्रशांत यांना पुरस्कार मिळाले. अन्य अनेक पुरस्कारांचे मानकरीदेखील ठरले. अनेक बड्या यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या त्यांनी आपल्या यशगंध या पुस्तकातून समाजासमोर आणल्या. त्यांना स्वत:ला शाळेत जायला सायकल मिळाली नाही याची जाण ठेवत मुलांना मोफत सायकल, कपडे वाटप केले. बचतगटांना मदत केली. तसेच शेतकरी महिला, पतीने आत्महत्या केल्यानंतर विधवांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना घरगुती उद्योगधंदे सुरु करून दिले. महिलांसाठी आत्मसन्मान योजना आणली. 

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...