- ऋतुपर्ण
काही वर्ष आधी जपानच्या विमानतळावर एक रहस्यमयी व्यक्ती होता. जो अचानक गायब झाला होता. तो कुठून आला, कशासाठी आला, कुठे गेला काहीचं थांगपत्ता लागला नाही...तो रहस्यमयी व्यक्ती होता तरी कोण?असं म्हटलं जातं की, संपूर्ण जग रहस्याने भरलेलं आहे. काही रहस्य छुपे आहेत तर काही डोळ्यांदेखत घडलेले आहे. पण काही रहस्य आपल्याला समजणे अशक्यप्राय आहे. कधी कधी अशा घटना घडतात की, ज्यावर विश्वास करणे कठिणचं नाही तर अशक्यचं आहे. अशा काही घटना आहेत, ज्या आजही प्रचलित आहेत. अनेकांनी विवध रहस्य उलघडण्याचा प्रयत्न केला पण, ते सहजासहजी कुणालाही शक्य झालं नाही. काही जणांनी रहस्याचा शोध घेतला तर काहींना त्याचे खूप विचित्र अनुभव आले. त्यामुळे ते अखेरपर्यंत रहस्यच बनून राहिले.
अनेक ठिकाणी चित्र-विचित्र घटना घडतात अन् त्या नंतर इतक्या चचेर्त राहतात की, वर्षानुवर्ष त्याची कहाणी सांगितली जाते. अशाच एका रहस्यमयी माणसाची कथा, ज्याची आजही चचार् होते. मात्र, तो कोण होता, कोणत्या देशातून आला होता, कशासाठी आला होता, हे मात्र शेवटपर्यंतसमजले नाही.
तो माणूस जो स्वत: ला टोरेड देशातून आल्याचे सांगत होता, तो देश मुळात पृथ्वीवर अस्तित्वातचं नाही. मग हे टॉरेड प्रकरण आहे तरी काय? टॉरेडचे रहस्य आजही कुणी उलगडू शकले नाही वा त्या व्यक्तीबद्दलचं सत्य बाहेर येऊ शकले नाही.
जपानच्या विमानतळावर घडलेली घटना, जी आजही प्रचलित आहे. ही घटना जुलै, १९५४ ची घटना आहे. दुपारी साडेबारा वाजले होते. एक युरोपीयन विमान टोकियोतील हेनेडा विमानतळावर उतरले. विमानातील सर्व प्रवासी खाली उतरले. सवर्च प्रवासी चेक आऊट काऊंटरकडे गेले. विमानतळावर बसलेले अधिकारी सवर्च प्रवाशांचे पासपोर्ट तपासत होते. तेव्हा त्यांना असा एक प्रवासी भेटला, ज्याचा पासपोर्ट पाहून ते चिंतेत राहिले.
टोरेड एक प्रवासी होता, जो जपानमध्ये एका कामासाठी आला होता. त्याच्या पासपोर्टवर ‘टोरेड’ नावाच्या देशाचे नाव होते. पण टोरेड हा देश आहे तरी कुठे?
विमानतळावरील तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वी अशा कोणत्याही देशाचे नाव ऐकले नव्हते वा कुणाच्या पासपोटर्वरही पाहिले नव्हते. विमानतळावरील अधिकाऱ्यांना तो प्रवासी संशयास्पद वाटला. म्हणून त्यांनी सुरक्षा अधिकार्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला चौकशीसाठी नेले. एका वेगळ्या खोलीत नेऊन त्याची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी त्याला आधी जपानला येण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले की, मी एक व्यापारी असून केवळ व्यवसायानिमित्त येथे आलो आहे. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
सुरक्षा अधिकारी त्या रहस्यमय प्रवाशाच्या पासपोर्टची तपासणी करतात की, त्याचा देश "टोरेड" जगाच्या नकाशात आहे तरी कुठे? खरंच असा काही देश आहे का, याचा शोध ते घेऊ लागले. पण, आश्चयार्ची गोष्ट म्हणजे. अधिकार्यांनी विचारले असता त्याने सांगितले की, जपानला येणे हा त्याचा पहिला प्रवास नाही. या पासपोर्टवर त्याने युरोपमधील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. त्याचे बोलणे ऐकून अधिकारीही संभ्रमात पडले. कारण त्याच्या पासपोर्टवर इतर देशांचे शिक्के होते. तो प्रवासी ज्या देशातून आला होता ते ठिकाण प्रत्यक्षात पृथ्वीवर कुठेतरी आहे, हे अधिकारी मान्य करण्यास तयार नव्हते. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांनी त्याला नकाशा दाखवत त्याचा देश नकाशात दाखवण्यास सांगितले. यावर त्याने ‘अंडोरा’ नावाच्या देशावर बोट ठेवत हा आपला देश असल्याचे सांगितले. मात्र येथे ‘टोरेड’ ऐवजी अंडोरा असे का लिहिले आहे, हे समजत नाही. ही व्यक्ती स्वत:ला ‘काल्पनिक’ देशातून का सांगत आहे हे ऐकून अधिकाऱ्यांना आणखी आश्चर्य वाटले. पण त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे पाहता तो खरे बोलतोय, असेही वाटले. आता तो गूढ प्रवासी खरे बोलतोय की खोटे हे कळण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे तो ज्याला व्यवसायानिमित्त भेटायला आला होता.
अधिकार्यांनी त्याला विचारले असता की, तू कुणाला भेटायला आला, कुठे जायचे आहे? तेव्हा त्याने कंपनीचे नाव सांगितले. तसेच त्याला कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे होते तेही त्याने सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनी आणि हॉटेलशी संपर्क साधला. मात्र त्यांनी अशी कोणतीही व्यक्ती ओळखत नसल्याचे सांगितले. आता तपास अधिकार्यांना वाटले की, कदाचित हा कोणीतरी लबाड गुन्हेगार आहे, जो आपली ओळख लपवून काही घटना घडवण्यासाठी येथे आला आहे.
संशय आणखी बळावताच अधिकाऱ्यांनी त्याचे सर्व साहित्य जप्त केले आणि कडक पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला हॉटेलच्या खोलीत बंद केले.
दुसऱ्या दिवशी खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीत कोणीच नसल्याचे पाहून पोलिसांना धक्काच बसला. खोलीच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता आणि खोलीच्या सर्व खिडक्या आधीच सील केलेल्या होत्या. विमानतळावर जप्त केलेला त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रेही गायब असल्याचे समजल्याने पोलिसांना आणखी आश्चर्य वाटले. आता हे सगळं कसं झालं हे कोणालाच समजत नव्हतं. या घटनेचे अनेक किस्से चांगलेच चचिर्ले गेले आहेत. काहीजण म्हणतात की रहस्यमय व्यक्ती दुसऱ्या जगातून आली आहे. तर काही म्हणतात की, तो टाईम मशीनद्वारे चुकून येथे आला असावा आणि त्याचे रहस्य उलगडणार असल्याचे पाहून तो कुठेतरी गायब झाला. आता हे खरे आहे की खोटे हे कोणालाच माहीत नाही, परंतु या रहस्यमय घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यापैकी एक "डायरेक्टरी ऑफ पॉसिबिलिटीज" आहे.
जग अनेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. इतिहासात अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही. कधी कधी इतक्या अनाकलनीय गोष्टी होतात की, त्या शेवटपर्यंत उलगडत नाहीत. शिवाय इतरही काही रोचक गोष्टी ज्या मिस्ट्री बनून राहतात. त्यापैकी एक टोरेड होय.
No comments:
Post a Comment