Sunday, December 31, 2023

सिक्रेट एजंट नूर इनायत खान

- ऋतुपर्ण

मुळची भारतीय असलेली ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान, हिची ओळख एक सिक्रेट एजेंट म्हणून होती. नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान, जे एक भारतीय होते तर आई ओरा बेकर अमेरिकन होती. इनायत खान टिपू सुलतानचा पणतू होते. इनायतचा जन्म २४ जानेवारी १९१४ रोजी झाला होता. तिने दुसऱ्या महायुद्‌धाच्या दरम्यान मित्र देशांसाठी हेरगिरी केली होती. एक भारतीय राजकुमारी ही ब्रिटनची स्पेशल सिक्रेट एजंट म्हणून नाझींविरोधात लढली. गुप्तहेर म्हणून तिची साधीसुधी ओळख नव्हती तर प्राणाची बाजी लावून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेरगिरी करण्यासाठी तिला फ्रान्समध्ये पाठवण्यात आले होते. तिच्या साहसी कथा हे सिद्ध करतात की, अनेक दशकांनंतरही तिला वीरचा दर्जा का दिला जातो? हेरगिरी करताना नाझीच्या सैनिकांकडून पकडली गेलेली नूरला तिच्याच सहकाऱ्यांनी धोका दिला होता. तिच्या सहकाऱ्याने अशी कोणती गुप्त माहिती नाझीच्या सैन्यांना सांगितली, ज्यामुळे नूरचे सर्व रहस्य उजागर झाले आणि तिला कैद करण्यात आले. तुरुंगात तिचा इतका छळ झाला तरी करण्यात आला की ...
म्हैसूरच्या टिपू सुल्तानाचा वंशज म्हणून इनायत खान यांची ओळख होती. ते सूफी उपदेशक होते. सुफीचा प्रसार व्हावा म्हणून इनायत खान यांची मुलगी नूर हिनेही वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. खान परिवार आधी रशियाला गेले. नंतर ब्रिटन मग फ्रान्सला गेले. नूर एक बुद्धिमान तरुणी होती. ती फ्रेंच भाषा बोलू शकत होती. शिवाय पियानो आणि हापर् देखील तिला वाजवता यायचे. याशिवाय तिला अनेक भाषा अवगत होत्या. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ती केवळ २५ वर्षांची होती. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वजण इंग्लंडला गेले. नंतर १९२० मध्ये पॅरिसला गेले. १९२७ मध्ये मध्ये भारत यात्रेदरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू  झाला. त्यावेळी ती १३ वर्षांची होती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्व जबाबदारी नूरवर आली. वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत नूर आपल्या तीन लहान भाऊ-बहिणीसोबत राहिली.
नूर इनायतवर पुस्तक लिहिणारी श्रावणी बसू यांच्या द स्पाय प्रिन्सेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान पुस्तकात नूरचे वर्णन असे करण्यात आले आहे - नूर खूप शांत स्वभावाची होती. तिला वाचन- लिहिण्याची आवड होती. तिला संगीतदेखील आवडत असे. ती वीणावादन देखील करत असे. वयाच्या २५ व्या वर्षी तिने आप‌ले पहिले पुस्तक छापले होते. ती बुद्धजातक कथांशी प्रेरित होऊन मुलांसाठी त्याच्या कथांचे पुस्तक छापले होते. ती अनेक मासिकांमध्ये लिहायची.
१९४० मध्ये नाझींनी फ्रान्सवर ताबा मिळवला. त्यावेळी नूर फ्रेंच लोकांसोबत ब्रिटनला येथे गेली. तिथे पोहोचताच युद्धाच्या तयारीत -त्यागली. येथे ती नोराह बेकर (Narab Baker) नावाने वुमेन्स ऑग्जिलरी एअरफोर्स मध्ये दाखल झाली. एक वायरलेस ऑपरेटर म्हणून तिने प्रशिक्षण घेतले. त्यावेळी एक महिला म्हणून हे काम खूप जिकरीचे होते. तिला अवगत असणाऱ्या भाषा आणि हे तंत्रज्ञानाचे कौशल्य इथे उपयोगी पडले होते. १९४३ मध्ये स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तिला फ्रान्स सेक्शनमध्ये काम करावे लागले होते. नूर ही पहिली रेडिओ ऑपरेटर होती, जिला नाझी व्याप्त फ्रान्समध्ये पाठवण्यात झाले होते.
ज्यावेळी ती लंडनमध्ये गेली होती, तेव्हा ब्रिटिश लष्कराचे मोठे-मोठे फलक लावण्यात आले होते. यावर लिहिले होते की - लष्कराला लोकांची खूप आवश्यकता आहे. नूरने ब्रिटिश सैन्यात नोकरीसाठी अर्ज केला. पण, लष्कराकडून जे उत्तर आले होत ते, धक्कादायक होते.
नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान होते, जे सफी प्रसारक, भारतीय होते. ते इंग्रजांविरुद्ध लढणारे टीपू सुलतानचे पणतू होते. नूरदेखील मॉस्कोमध्ये जन्मली होती आणि फ्रेंच नागरिक होती. काही कालावधी आधीच फ्रान्समधून परतली होती. अशा  परिस्थितीत ब्रिटिश लष्कराकडून तिची निवड केली जाणे अशक्यप्रायच. त्यावेळी तिचा अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. पण, नूर गप्प बसणारी नव्हती. तिने हिंमत न हारता ब्रिटिश लष्कराला पत्र लिहिलं. तिने या पत्रात म्हटले होते की - तिची आई एक 'ब्रिटिश नागरिक आहे. ती स्वतः ब्रिटनमध्ये ब्रिटिश प्रोटेक्टिव्ह पासपोटर्  घेऊन राहत आहे, त्यामुळे तीदेखील ब्रिटिश झाली. त्यानंतर लष्कर अधिकाऱ्यांनी तिला मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, महात्मा गांधी यांच्याविषयी तिचे काय विचार आहेत?
तिने उत्तरादाखल सांगितले- महात्मा गांधी भारतात जे करत आहेत, त्याने ती प्रभावित झालीय. द स्पाय प्रिंसेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान' पुस्तकात म्हटले आहे-
लाकरी अधिकाऱ्यांनी तिला दुसरा प्रश्न उपस्थित केला की, ती भारताच्या त्या नेत्यांना पाठिंबा देईल का, जे ब्रिटिश सरकार विरोधात लढत आहेत? यावर नूर म्हणाली, सध्या फॅसिझम विरोधात युद्ध सुरू आहे आणि माझं कर्तव्य आहे की, ब्रिटनला पूणर्पणे पाठिंबा देणं. परंतु, हे युद्ध संपताच भारतात स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा देईन.
या उत्तराने ब्रिटिश अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला. नोव्हेंबर १९४० मध्ये तिला ब्रिटिश लष्करात एअर फोर्समध्ये सेकंड क्लास ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. तब्बल दीड वर्षांनंतर तिला स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्हच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. फ्रेंच भाषेवर तिची मजबूत पकड होती. ही एक सिक्रेट ब्रिटिश फोर्स होती, जी युरोपमध्ये नाझींविरोधात स्थानिक विद्रोहात मदतीसाठी गुप्तहेर पाठवले जायचे. या कामात सामान्य वेतन मिळायचे. पण जीवावर बेतणारे काम होते पण, हे धाडस नूर करायला तयार झाली. कधी कधी वायरलेस ऑपरेशनच्या प्रशिक्षणावेळी नूर घाबरायची. सर्व अधिकाऱ्यांना वाटायचे की, नूर एक गुप्तहेर म्हणून काम करू शकत नाही. पण, फ्रेंच भाषेचे कौशल्य आणि संदेश तत्काळ कोड-डीकोड करणे हे पाहून नूर इनायत खान हेरगिरी करण्यासाठी रेडिओ ऑपरेटर बनवून ला १९४३ मध्ये फ्रान्समध्ये पाठवण्यात आले. तिचे कोड नाव होते- 'मेडेलिज:
वायरलेस ऑपरेटर जीवावर बेतणारे काम होते. हे काम आधी पुरुषच करायचे. जर्मन सीक्रेट पोलिस 'गेस्टापो' ऑपरेटरचे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच ओळखून गुप्तहेरना सहजपणे पकडू शकत होते. आणि लवकरच झालेही तसेच. जर्मनीने सर्व ऑपरेटर्सना पकडले. तेव्हा एकच ट्रान्समीटर शिल्लक राहिले होते - ते होते नूर इनायत खान. ब्रिटिश सैन्यानी नूरला माघारी बोलावलं. पण नूरने परत येण्यास नकार दिला. पुढील काही महिने नूर एकटीच फील्ड ऑपरेटर म्हणून काम करत राहिली. त्यावेळी ती आपल्या मिशनपासून मागे हरली नाही. तिला माहिती होतं की, तिने एका जागेवरून जर १५ मिनिटांपर्यंत मेसेज पाठवला तर जर्मन सैन्यांना तिचा ठावठिकाणा समजेल. त्यामुळे ती नेहमी संदेश पाठवल्यानंतर पार्कमध्ये जायची. एक दिवया ती आपल्या ट्रान्समिशन मशीन सोबत पार्कमध्ये होती. तेव्हा जर्मन सैन्यांनी रोखून विचारलं होतं की, तिच्या ब्रीफकेस मध्ये काय आहे? नूर म्हणाली-सिनेमा दाखवायची मशीन आहे. अशा प्रकारे जर्मन सैन्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ती फरार होत राहिली. पण तिचा चेहरा शत्रूला ओळखता गेला होता. त्यामुळे प्रत्येक दिवशी तिला आपलं बाह्यरूप बदलाव लागत असे. ती बराच काळ अनेक ठिकाणे आणि पोशाख बदलत राहिली.
त्यावेळी नाझी जर्मनीने एक सीक्रेट पोलिस दलाची निर्मिती केली होती. नाव होतं- गेस्टापो. ऑक्टोबर १९४३ मध्ये गेस्टापोने तिला पकडलं. एका माहितीनुसार, एका अपार्टमेंटमधून केवळ पाच सहा सैन्यांनी तिला घेरलं. तिच्या सहकाऱ्यांनीच पैशांसाठी तिला पकडून दिले होते, असे म्हटले जात होते. सहकाऱ्यांनी तिची सर्व गुपिते उघड केली. तिला पकडून जर्मनीला नेलं. जर्मन अधिकाऱ्यांसाठी नूर खूप धोकादायक कैदी होती. तिचा तुरुंगात इतका छळ करण्यात आला. पण, नूरने न आपल्या स्वत:बद्दल सांगितले न ब्रिटन लष्कराविषयी. तिला इतक्या यातना दिल्या तरीही जर्मनीला तिने कुठलीही गोपनीय माहिती दिली नाही. तिने दोनवेळा तुरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. पलायनावेळी दोन्ही वेळा ती पकडली गेली. जर्मन सैन्याने तिच्याकडून ब्रिटिश लष्कराबद्दल माहिती काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण, नूरचे खरे नावदेखील ते माहिती करू शकले नाहीत, असे म्हटले जाते.
अखेर २७ नोव्हेंबर, १९४३ रोजी नूर इनायत खानला पॅरिसहून जर्मनीला नेण्यात आले. जवळपास नऊ ते दहा महिने त्रास देऊन तिच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होत राहिला. तरीही, जर्मन सैन्यांना एका अक्षराचादेखील थांगपत्ता तिने लागू दिला नाही. नूरला पासून सर्व जमर्न सैन्य आश्चर्यचकित होत असे.
सप्टेंबर, १९४४ मध्ये नूर इनायतला एका कँपमध्ये नेण्यात आले. १३ सप्टेंबर. १९४४ रोजी तिला गोळी मारण्यात आली. मृत्यूसमयी ती ३० वर्षांची होती. तिच्यावर गोळी झाडल्यानंतर शेवटचा शब्द तिच्या तोंडातून निघाला तो म्हणजे 'लिबेरेते. हा एक फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ 'स्वातंत्र्य' असा होतो. जेव्हा जेव्हा मोठ्या गुप्तहेरांबददल चर्चा होते, तेव्हा नूर इनायत खानचे नाव समोर येते. पण दुसऱ्या बाजुला आपला मागमूसही लागू न देणारी गुप्तहेर इनायत खान सैन्यांच्या ताब्यात सहजपणे कशी आली? हा प्रश्न आपसूक पडतोच!

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...