Monday, May 27, 2024

नूतन प्रशांत गायधने - धाड्‌साने सुरू केले चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप

नूतन प्रशांत गायधने या नव्या उद्योजक. मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राहणाऱ्या आहेत. सध्या त्या मुंबईमध्ये राहतात. वयाच्या २८ व्या वर्षी आपला संसार, नोकरी सांभाळत त्यांनी चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्ट अप सुरु केले. २ वर्षे या उद्‌योगात त्या असून नवनवीन प्रयोग करत हा व्यवसाय वाढवणे आणि त्याचा विस्तार करत स्टार्टअप यशस्वी करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. कमी शिक्षण असतानाही त्यांनी धाड्‌साने चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप सुरू केले.


अशी झाली सुरुवात

त्या सुरेश इंदू लेझर मॅन्युफॅक्चर या कंपनीत मार्केटिंग विभागात सेल्स एक्झीक्युटिव्ह काम करतात. नूतन यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेत‌ले आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. बारावी नंतर नोकरी करायचं ठरवलं. संगणकाचे ज्ञान घेत टॅली, एमएससीआयटीचे कोर्सेस पूर्ण केलं. छोटी-मोठी नोकरी करत त्यांनी अनुभवाच्या जोरावर चांगली नोकरी मिळ‌वली. तर त्यांचे पती प्रशांत गायधने ॲमेझॉनमध्ये डिलिवरी बॉय चे काम करायचे. पण पगार परवडत नसल्याने नूतन यांनी पतीला नोकरी सोडायला लावली. कोविड पर्यंत ही नोकरी सुरु होती. पण नंतर करायचं काय? असा प्रश्न समोर उभा होता. नूतन यांनी आपल्या संसारासोबतच नवीन स्टार्टअप करायचं ठरवलं. गायधने कुटुंब अंधेरीला शिफ्ट झाले. या परिसरात समुद्र आहे. मग ठरलं की. चहा आणि भेलपुरीचा व्यवसाय सुरू करायचा. त्याप्रमाणे प्रशांत यांनी समुद्रावर चहा आणि पुणेरी ओली भेळ विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, इतक्यात संसाराचा गाडा चालवणं, फार कठीण होतं.

दरम्यान, कोल्हापुरच्या दिग्विजय गायकवाड यांची जाहिरात टीव्ही‌ला पाहिली. त्यांच्याकडून बिस्किट चहा कप मागवले. त्याचा खप वाढला. म्ह...न चहा बिस्किट बनवारी १२ कपांची चार लाख रुपयांची चायनीज मशीन दिल्लीहून मागवली. चायनीज मशीन सारखी बंद पडायची. संपकर् केला तरी त्या कंपनीचे इंजिनिअर्स प्रतिसाद देन नसत. यामध्ये अपयश मिळाले. पुढे कोल्हापूरचे दिग्विजय गायकवाड यांनी स्वतः तयार केलेली ४९ कपांची चहा बिस्किट कप मशीन नूतन यांनी साडे सात लाख रुपयांना खरेदी केली.

सुरुवातीला या कपांचे मार्केटिंग आणि डिस्टीब्युशन मुंबई - सोलापूर- कोल्हापूरमध्ये स्वतः गाडीवरून फिरून केले. पुढे आर्थिक गणित कोलमडले. पण त्यांनी हार न मानता हे काम पुढे सुरू ठेवायचे ठरवलं. रात्री ऑर्डर आली की पहाटे ३-४ वाजेपर्यंत ऑर्डर तयार करून दिली जाते.

असे तयार होतात चहा बिस्किट कप

आरे कॉलनीत एका इमारतीत १० बाय १५ च्या रुममध्ये ही मशीन बसवली. एकावेळी हे कप बनवण्यासाठी ९ मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्येक दिवसाला ३० किलो मटेरियलमध्ये १२००-१५०० कप यार होतात. इलायची, कॉफी, वेनिला, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये हे कप बनवले जातात. चॉकलेटमध्ये कपावर चॉकलेटचे कोटिंग करून दिले जाते. यास मागणी अधिक आहे.  चहा बिस्कीट कप तयार करताना कोणतेही केमिकल मिसळले जात नाही. हे लिक्विड स्वरुपात पलेवर असतात. कस्टमरची मागणी असेल तर हे चहा बिस्किट कप स्ट्रॉबेरी फ्लेवर, बटरस्कॉच फ्लेवरमध्ये तयार करून दिले जातात.

अडचणींवर अशी केली मात

दिग्विजय यांनी मशीनचे प्रशिक्षण दिले. जेव्हा प्रत्य‌क्षात गायधने जोडप्याने काम सुरु केलं तेव्हा ते कप व्यवस्थित बनत नसत. कप तयार करायला तुटायचे. त्यामुळे संपूर्ण साहित्य वाया जायचे. पण वारंवार प्रयत्न करून शिकून किती साहित्य लागतं, प्रत्येक साहित्याचे प्रमाण कसे ठेवायचे याचा अभ्यास करून त्यांना अखेर कप बनवण्यात यश मिळाले. १० किलो मटेरिअलमध्ये कप बनवायाला अडीच तास लागतात. च्यासाठी फ्लेवर, बाजरी, नाचणी, मैदा, पाणी, कॉर्नफ्लॉवर, साखर असे साहित्य लागते. कोणतेही केमिकल नसल्यामुळे कपची गुणवत्तादेखील उत्तम राहते. तसेच  मशीनमध्ये कप बनून जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा शिल्लक राहिलेले पदार्थ वाया जात नाही. ते गाईला खायला दिलं जातं. त्यामुळे हे साहित्य वाया जात नाही.

राज्य आणि देशभरातून मागणी

हे कप फक्त चहासाठी नाही तर केकसाठी, कुल्हड पिझ्झा साठी, आईस्क्रीम साठी वापरता. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि राज्य, देशभरातून या कपांना वाढती मागणी आहे. लुधियाना, झारखंड, बिहार, इंदौर, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश नागपूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, नाशिक, परभणी या ठिकाणी ऑर्डर पाठवली जाते.  शिवाय लोकल मार्केट - अमृततुल्य चहासाठी, कोल्हापूर- श्रीमंत चहासाठी, मुंबईतील बारसाठी, मोठमोठे कॅफेमध्ये छोट्या-मोठ्या  हे बिस्किट कपांची मागणी आहे. नूतन हे मार्केटिंग पाहतात आणि प्रोडक्शन प्रशांत गायधने पाहतात.

कस्टमरची पसंती

सध्या बाजारात पेपरकपमधून जो चहा दि‌ला जातो, त्यात प्लास्टिकचे कण दिसतात.  ते आरोग्यास हानिकारक आहेत. हे लक्षात आल्यानंतर नूतन यांनी चहा बिस्किट कप बनवले, ज्यामधून चहा घेता येईल शिवाय बिस्किट पण खाता येईल. हे बिस्किट खारी सारखी चवीला वाटते. त्यामुळे जे जे कस्टमर हे कप वापरतात त्यांनी या कपांना खूप पसंती दर्शवलीय. तसेच पोट देखील भरतं. या बिस्किट कपांची क्रेझ देखील सध्या बाजारात मध्ये आहे.

आपला उद्योग सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्य़ांनी अविरतपणे काम सुरु ठेवले आहे. कस्टरमला जे प्रोडक्ट देणार ते उत्तम असले पाहिजे आणि कस्टमर आपल्या उद्योगाशी कायमचा जोडला गेला पाहिजे, असा प्रयत्न नूतन प्रशांत गायधने यांचा आहे.
 
स्टार्टअप करणाऱ्याचे नाव- नूतन प्रशांत गायधने
मोबाईल - 8208427443, 7900006588

Monday, May 20, 2024

मंजिरी कपडेकर : पाककला शिक्षणातून सुरु केला व्यवसाय

कोल्हापुरात पाककला क्षेत्रातील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे मंजिरी कपडेकर. केवळ पाककलेतील खवय्येगिरी नव्हे तर हजारो महिलांना, तरुण-तरुणींना पाककलेचे धडे देणाऱ्या 'सुगरण' अशी त्यांची ख्याती आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या,  सासर कोल्हापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूर-कर्नाटक आणि आजूबाजूच्या प्रदेशातील खाद्यसंस्कृती चांगली माहिती आहे. कोल्हापुरात आल्यानंतर इथली पाककला शिकून घेतली. या पाककला शिक्षणाचा उपयोग इतरांसाठी व्हावा, म्हणून त्यांनी क्लासेस सुरु केले.

गृहिणी घडवणे, ज्यांना बिझनेस सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी, ज्यांना कॅफे सुरु करायचा आहे किंवा फूड व्हॅन सुरु करायचा आहे, फूड स्टॉल करायचा आहे, त्यांच्यासाठी प्रोफेशनल शिक्षण देण्याचे काम मंजिरी कपडेकर करतात. कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे त्यांचे प्रशिक्षण देण्यासाठीचे ठिकाण असून एक वेगळा व्यवसाय त्यांनी हाती घेतला आहे.

अशी झाली सुरुवात

मंजिरी यांचे बी.कॉमपर्यंत झाले. बालपणापासूनच पाककलेत आवड असल्यामुळे त्यांनी पाककलेतून पुढे जाण्याचं ठरवलं. कपडेकर यांचे कुटुंबीय मोठे असल्यामुळे १००-१०० लोकांचे जेवण करणे, अनेक कार्यक्रमातून स्वयंपाक करणे, यामुळे त्यांचा पाककलेत हातखंडा आहे. शिवाय सासू यादेखील उत्तम सुगरण होत्या. त्यामुळे सासू-सून मिळून उत्तम स्वयंपाक बनवायच्या. सासूच्या हातचे अनेक चविष्ट पदार्थदेखील कपडेकर यांनी शिकून घेतले. अनेक हॉटेल्सना भेटी देऊन तिथे ग्रेव्ही, मसाले कशा पद्‌धतीने बनवून ठेवले जाते. ऑर्डर आली की लगेच कमी वेळेत पदार्थ कसे बनवावेत, हे शिकून घेतले. नाशिक, पुणे, कोल्हापूर, कर्नाटक अशी भारतभर भ्रमंती करून त्यांनी तेथील खाद्यपदार्थ शिकून घेतले. पुढे त्यांनी रत्नागिरी, गोवा, मिरज, सांगली, सोलापूर बेळ‌गाव, इचलकरंजी येथे जाऊन प्रशिक्षण दिले.

देश-विदेशात विद्यार्थी कार्यरत

मंजिरी हर्षराज कपडेकर कुकिंग क्लासेस या नावाने नावारूपाला आलेला एक वेगळा व्यवसाय, असंख्य महिलांना कुकिंगचे धडे देण्याचे काम मंजिरी यांनी केले आहे. यामध्ये तरुणदेखील मोठ्या उत्साहाने मंजिरी यांच्याकडे पाककलेचे धडे घेण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन चांगल्या पदापर्यंत पोहोचले आहेत. हे विद्यार्थी संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर आज विविध पदांवर कार्यरत आहेत. युएस, ऑस्ट्रेलिया याठिकाणी कपडेकर यांचे विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना कॉन्टेटल - मेक्सिकन, थाई, इटालियन पदार्थाचे ट्रेनिंग मंजिरी कपडेकर यांनी दिले आहे.

प्रोफेशनल प्रशिक्षण

प्रोफेशनल क्लासेस घेऊन त्यांनी आतापर्यंत अनेकांना कॅफे सुरु करण्यासाठी, हॉटेल वा नाश्ता सेंटरसाठी, खाद्य व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले आहे. कपडेकर यांच्या प्रशिक्षण  वर्गात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ जसे की, पिझ्झा, सँडविच, मॉकटेल, पुरीभाजी, शेकचे प्रकार, पास्ता, कुर्मापुरी, उपीट, शिरा, पोहे, साउथ इंडियन फूड, बर्गर, त्याचबरोवर कोल्हापुरी मटण थाळी, नॉनव्हेज स्टार्टर, डोसाचे विविध प्रकार, बिर्याणीचे प्रकार शिकवले जातात. त्यांच्याकडे कोल्हापूरसोबतच मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा येथून अनेक पाककला शिकण्यासाठी येतात.  खास म्हणजे, त्यांच्याच एका विद्यार्थ्याने नाशिकमध्ये खूप मोठे हॉटेल उघडले आहे. तिथे मिळणारे सर्व पदार्थ जसे की, कोल्हापुरी मटण थाळी, चिकन थाळी, बिर्याणीचे प्रकार या पदार्थांचे प्रशिक्षण त्या विद्यार्थ्याने कपडेकर यांच्याकडून घेतले आहे.

टीव्हीवर अनेक शो आणि कार्यक्रम

बहुतांश सर्व मराठी वाहिन्यांवर देशभरातील प्रसिद्ध शेफबरोबर पाककला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. मंजिरी कपडेकर यांचे टीव्हीवर अनेक शो होतात. बी चॅनेल, कलर्स मराठी, झी टीव्ही, साम टीव्ही, वर त्यांनी आपल्या मेजवानीचे सादरीकरण केले आहे. ई टीव्हीच्या त्या मेजवानी शोच्या वा विजेत्या देखील आहेत. महाराष्ट्र सुगरणमध्ये त्या रनरअप ठरल्या आहेत.

अनेक पुस्तके प्रकाशित

कपडेकर यांच्या पाककले‌ची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शाकाहारी-मांसाहारी, खाद्य पदार्थांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक प्रसारमाध्यमांमध्ये पाककला विषयक लेखन त्यांनी केलेलं आहे. खाद्यसंस्कृतीचा अभ्यास त्या करत असून आपली खाद्यसंस्कृती पोहोचली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, यासाठी  कपडेकर प्रयत्न करतात. आकाशवाणीवरूनदेखील त्यांनी आपल्या पाककला संस्कृतीबद्‌दलची व्याख्याने आणि मार्गदर्शन केले आहे. सणवार आणि खाद्यसंस्कृती यावर लेख आणि व्याख्याने प्रसिद्‌ध झाली आहे.

देश-विदेशातील फूड मशिन्सचे प्रशिक्षण

तरुण-तरुणींना तसेच गृ‌हिणी, नवविवाहितांना विविध प्रकारच्या उसळी, फळभाज्या, चपाती, भाकरी, पुलके पासून पिटलं भात, वरण भात, पंजाबी डिश, चायनीजचे प्रकार, आईस्क्रीम, मॉकटेल, कॉक्टेल्स शिकवले जाते. भारतात आणि परदेशात किचन इलेमेंट्समध्ये काही प्रमाणात वैविध्य असतं. त्यामध्ये परदेशातील मायक्रो ओव्हनमधील जेवण, फूड ‌प्रोसेसर मशीन, ओटीजी ओव्हन, ब्लेंडर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.

यामध्ये नामदेव शिंपी समाजाचे दोन पुरस्कार, रागिनी पुरस्कार, दामिनी, भगिनी पुरस्कार, कोल्हापूर सुगरण, अन्नपूर्णा पुरस्कार, उत्कृष्ट माता पुरस्कार, नवऊर्जा पुरस्कार, उत्कृष्ट संघ पुरस्कार मिळालेले अहित.

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...