- ऋतुपर्ण
जूनागढची गोष्ट जेव्हा समोर येते, तेव्हा गिरनार नक्की डोळ्यासमोर येते. गिरनार सर्वांसाठी आस्थेचे प्रतीक आहे. १०,००० पायऱ्या चढून जायच्या म्हणजे खरंच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी लागते. कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य आहे. प्रत्येक वर्षी लाखों भक्त गिरनारवर चढून जातात. गिरनारच्या पायऱ्या खरंच खूप अवघड आहे, एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल, पायऱ्या कोणी आणि कशा तयार केल्या असतील, हे आश्चयर्जनकच आहे.गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. जुनागडमध्येच गिरनारचा उंच डोंगर आहे, तिथे दत्तात्रेय मंदिर आहे. येथे हिंदू धर्माचीच नव्हे तर जैन धर्माचीही अनेक मंदिरे आहेत. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशीही सापडतात. सम्राट अशोकाच्या पूर्वीचे ही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैन धमीयांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे.
येथे इसवी सन पूर्व २५० मधील सम्राट अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. ‘रा’ खेंगार आणि चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेषही गिरनारवर सापडतात.
पाच हजार पायऱ्या चढल्यानंतर तेथे अंबामातेचे एक मंदिर आहे. देवी पार्वतीने अंबामातेनच्या रुपात गिरनार पवर्तावर वास केला म्हणून हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यापुढे पाचशे पायऱ्या चढल्या की गोरक्षनाथांचे मंदिर आहे. पुढे पंधराशे पायऱ्या संपल्या की, भैरवनाथाचे मंदिर आहे. ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच ठिकाणी गुरु दत्तात्रेयांनी १२ हजार वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. २२५० पायऱ्यांनंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांची गुंफा लागते. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, अशी लहान लहान मंदिरे आहेत.
बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. पुढे भगवान नेमिनाथ चे मंदिर आहे. भवनाथांसह अनेक मंदिरे येथे आढळतात. इतक्या पायऱ्या चढून जाणे ही एक परीक्षाच आहे. शिवाय हिंदू आणि जैन धमिर्यांची एकत्र मंदिरे असणे हे या गिरनार पवर्ताचे सर्वांत खास वैशिष्ट्ये म्हणता येईल. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची यात्रा भरते.
जुनागढपासून आठ किमीवरील गिरनारला जाण्यास अनेक वाहने आणि वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. तसेच रोप वे देखील आहे. पण भक्त पायऱ्या चढून जातात.
गिरनारच्या निमिर्ती आणि त्याच्या पायऱ्यांशी संबंधित एक महान इतिहास जोडला गेला आहे. गिरनार गुजरात सवार्त उंच पर्वत आहे. लोक येथे वषर्भर तीर्थयात्रा करण्यासाठी येतात. देवदिवाळीच्या वेळी लोक लीली परिक्रमाचे आनंद देखील घ्यायला येतात. गुजरातच्या जुनागढची आणि गिरनार पवर्ताचा इतिहास अचंबित करणारा आहे.
या इतिहासाबाबत सांगितले जाते की, १८५७ च्या क्रांतीला ३२ वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी ब्रिटीशांनी जवळजवळ संपूर्ण भारत काबीज केला होता आणि अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात आली होती. जुनागढही गुजरातमधील एक संस्थान होते. या संस्थानाचा नब बहादूर खान होता. यावेळी जुनागढच्या नवाबाचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई आणि नवाबाचे पर्सनल असिस्टेंट पुरुषोत्तमराज झाला यांनी एक दिवस मिळून नवाबसमोर एक मत मांडले. ते म्हणाले की, हिंदू आणि जैन बांधवांना गिरनारवर जाण्यासाठी खूप कठिण जाते. अनेक भक्त तर मृत्यूमुखी पडतात. आपण पायऱ्या निर्माण केल्या तर? वर जाण्यासाठी पायऱ्या बनवण्याची विनंती त्यांनी नवाबाकडे केली.
नवाबाने एका ब्रिटिश इंजिनिअरला अहमदाबादहून येण्याचं आमंत्रण दिलं. त्या इंजिनिअरने निरीक्षण करून सांगितलं की, गिरनारच्या टोकाला पोहोचण्यापर्यंतचा पायऱ्यांचा एकूण खर्च एक लाख तीस हजार रुपये येईल.
१८८९ में १ लाख ३० हजार रुपये ही मोठी रक्कम ऐकून नवाबला धक्का बसला आणि त्याने नकार दिला. तेव्हा हरिदास देसाई आणि पुरुषोत्तमराज झाला म्हणाले की, नवाबसाहेब, सरकारी तिजोरीतून पैसे देऊ नका, आम्ही लॉटरीचे तिकीट काढू. लॉटरीमध्ये आकर्षक बक्षिसे असतील. आम्ही त्या लॉटरीची किंमत एक रुपया ठेवतो. म्हणजे लोक लॉटरी खरेदी करतील. त्याच पैशातून आम्ही ही शिडीची निमिर्ती करू. आम्ही लिहू की, ही लॉटरी कोणत्या उद्देशाने काढत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू आणि जैन लोक ही लॉटरी खरेदी करतीत. झाला आणि देशाई यांचे म्हणणे ऐकून यावर संमती दिली.
त्यानंतर या कामासाठी १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. बेचारदास बिहारी दास हे या समितीचे प्रमुख होते. १ ऑक्टोबर, १८८९ रोजी एक रुपयाची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीच्या पहिल्या बक्षीसाची रक्कम ४० हजार होती. नंतर ती दहा हजार करण्यात आली. सर्वात कमी पक्षीस ५ रुपयाचे होते. त्यानंतर या लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आणि त्यात संपूर्ण योजना लिहिली गेली. या लॉटरीच्या तिकिटाच्या उत्पन्नातून एक शिडी होईल असे वर लिहिले गेले. हिंदू आणि जैन भाविकांना गिरनार टेकडीवर जाण्यासाठी ही शिडी बनवली जाईल, असा मजकूर त्यात होता.
तिकिटामध्ये एक अतिशय आकर्षक योजना ठेवण्यात आली होती, जसे की १२ तिकिटे एकत्र खरेदी केले तर एक तिकीट मोफत, १०० तिकिटे विकणाऱ्याला १५ टक्के कमिशन मिळेल. जर तिकिटींची विक्री नाही झाली तर तुम्ही तिकिटे परत देऊ शकता. त्यानंतर अनेकांनी लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ब्रिटिशांनीही लॉटरीची तिकिटे खरेदी केली.
१५ मे, १८९२ रोजीचा तो दिवस उजाडला. लॉटरीचे बक्षीस काढण्याचे ठरले. हजारे लोक जुनागढ पोहोचले. जुनागड येथील फराज खान यांच्या घरी लॉटरीचे तिकीट ठेवण्यात आले होते. तब्बल १२८६६३ तिकिटे विकली गेली. पहिले १० हजार रुपयांचे बक्षीस मुंबईच्या रहिवासी सविताबेन दह्याभाई खांडवाला यांना देण्यात आले. ज्यांनी गिरनारचा जिना बांधण्यासाठी हे दहा हजार रुपयांचे बक्षीस अपर्ण केले.
१८९२ मध्ये, दहा हजार म्हणजे आजची कोट्यवधीमध्ये रक्कम असेल. दोन लोकांना दोन हजार पाचशे रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले. पंजाबमधील खुदा बक्श आणि लालचंद यांना ते मिळाले. नवसारीच्या बळवंतराय यांना तिसरे बक्षीस दिड हजार रपयांचे मिळाले होते. असा प्रकारे लॉटरी विकून जवळपास १ लाख तीस रुपये जमा झाले.
ब्रिटीश इंजिनिअरच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर काम सुरु झाले. यासाठी एकूण १९ वषार्ंचा कालावधी लागल्याचे. सांगितले जाते. १९ वषार्ंचा कालावधी म्हणजे हा मोठा काळ आहे. हे पायऱ्या निमिर्तीचे काम जितके अवघड तितकेच रहस्यमयदेखील आहे. इतक्या उंचावर बांधकामाचे साहित्य नेणे, मजुरांची दमछाक आणि उन वारा पाऊस सहन करत अगदी नेटनेटके पायऱ्यांची निमिर्ती करणे हेदेखील एक रहस्यच आहे.
No comments:
Post a Comment