Starfish
Tuesday, July 7, 2026
सालिह
Friday, September 12, 2025
छंद-आवड बनला व्यवसाय, प्रोफेशनल भरतनाट्यम नृत्यांगना अपेक्षा निरंजन
प्रोफेशनल भरतनाट्यम नृत्यांगना ज्यांनी लहानपणापासूनच डान्स क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं होतं. आज त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. बी कॉममध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या अपेक्षा यांनी एमए भरतनाट्यम अलंकार ही मोठी पदवी मिळवली आणि सुरु झालं डान्सचे करिअर. आपली आवड, आपला छंद पुढे व्यवसाय म्हणून नावारुपास आला. जाणून घेऊया प्रोफेशन भरतनाट्यम डान्सर अपेक्षा निरंजन यांच्याविषयी.
वयाच्या ननव्या वर्षापासून त्यांनी कथ्थक शिकायला सुरुवात केली. इयत्ता चौथीत असताना कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केवी. पण भरतनाट्यम फार आवडायचे. त्यामुळे डॉ. अलका लाजमी (भरतनाट्य गुरु) यांच्याकडे भरतनात्यम शिकायला सुरुवात केली. गुरु डॉ. सुचिता चाफेकर यांच्याकडे एकूण १० वर्षे कोल्हापुरात भरतनात्यमचे प्रशिक्षण घेतले. विवाहानंतर २००३ रोजी मुंबईत शिफ्ट झाल्या. गांधर्व महाविद्यालयातून विशारदची पदवी मिळवली. नालंदा डान्स रिसर्च सेंटरमधून भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केला. भरतनाट्य़म शोज, वर्क्स, क्लास, परफॉर्मन्स अशा सर्व पातळ्यांवर अपेक्षा यांनी कलेचं सादरीकरण केलं आहे.
गुरु पंडित बद्रीनाथ कुलकर्णी (कोल्हापूर), आरती आगरकर (मुंबई), डॉ. अलका लाजमी, डॉ. सुचेता चाफेकर यांच्या प्रशिक्षणाखाली अपेक्षा यांनी भरतनाट्यम शिकले.
अशी उभारली नृत्यांजली संस्था
बहिण सानपाड्याला राहायची. आठवड्यातून एक दिवस दोघी भेटायच्या. भेटीतून डान्स कॅम्प घेण्याचा विचार आला आणि त्याला प्रतिसादही मिळाला. मुलांचे पालक म्हणाले की, डान्स क्लास का घेत नाही? मग सुरूवातीला शाळेच्या विद्यार्थींना शिकवलं गेलं. आणि हळूहळू हा छंद पुढे करिअर बनला. सध्या या संस्थेत १३० विद्यार्थीनी शिकत आहेत.
कोविडमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. परदेशातूनही विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत असतात. १) प्रारंभिक परीक्षा २) प्रवेशिका प्रथम ३) प्रवेशिका पूर्ण ४) मध्यमा प्रथम ५) मध्यमा पूर्ण ६) विशारद प्रथम ७) विशारद अशा ७ परीक्षा असतात. कमीत कमी ७ ते १० वर्षे सातत्याने प्रशिक्षण घेऊन या परीक्षा पूर्ण करता येतात. अडवू (बेसिक स्टेप्स शिकवल्या जातात.) वेगवेगळे अडवू कसे एकत्र आणायचे? अभिनय कसा करायचा, त्यानुसार व्यायाम करवून घेऊन शरीराची ठेवण घडवली जाते. सिंपल पदन्यास असतो आणि नंतर अभिनय शिकवला जातो. शास्त्रोक्त शिक्षण देणं ही त्यांची खासियत आहे. प्रत्येक डान्सच्या मागील कारण भाव समजावून सांगितला जातो.
२०१६ मध्ये Indian culture centre ने अपेक्षा यांना आमंत्रित केलं. ICCR ला कोलंबो, श्रीलंका येथे भरतनाट्यम शो केला. सर्वाधिक ३५ कार्यक्रम पोलंडमध्ये झाले. इतकचं नाही तर भारतीय शास्त्रीय नृत्य याचा प्रचार व प्रसार त्या भाषणातून करतात. इंडियन-पोलिश म्युझिकवर सादरीकरण करणाऱ्या अपेक्षा एकमेव आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच इटलीमध्ये dat festival सादरीकरण केलं. शिवाय तेथील बॅले विद्यार्थ्यांना भरतनाट्यम प्रशिक्षण दिलं आहे. फ्रान्स-पॅरिस, साऊथ कोरियामध्ये, थायलंडमध्ये भारतीय दुतावाससाठी सादरीकरण केलं. जॉर्जिया येथे Movement dance साठी परीक्षक म्हणून हजेरी लावली. physical and Theater dance International festival साठी सादरीकरण आणि वर्कशॉप घेतलं. इंडो-पोलंड रिलेशनशीप टूरच्या वेळीही सादरीकरण केलं.
विद्यार्थ्यांना विविध स्किल्सचे प्रशिक्षण
या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अपेक्षा Thematic सादरीकरण करतात. अनेक ठिकाणी स्पर्धेत वेगळेपण, स्किल दाखवतात. विविध विषय, संगीत, पारंपरिक थीम निवडून नाविन्यता आणली जाते.
नयनम - डोळ्यातून भावना कसा व्यक्त करायच्या? यामध्ये कृष्णा- शिवाच्या भीमवर, कृष्णानुबंध (सत्यभामा, यशोदा, राधा अशा पात्रांसोबत सादरीकरण कसं करायचं? तंजावरचे मराठेराजे ज्यांनी १६, १७, १८ व्या शतकात रचना लिहिल्या, त्यावर आधारित भरतनाट्यमचे सादरीकरण कसं करायंच? अभंगांवर प्रयोग करून विविध अभंग घेवून भाव, शृंगार, वात्सल्य, करूणा सादरीकरण कसं करायचं हे शिकवलं जातं.
परदेशातही नाविन्यता
परदेशात रोमन कॅथॉलिक गाणी वाजवली जातात, त्यावर सादरीकरण, फ्लेमेंको ह्या स्पॅनिश संगीतावर भरतनाट्यमचे सादरीकरण, ट्रॅडिशनल पोलिश फोक संगीतवर सादरीकरण तसेच २००-३०० वर्षापूर्वीच्या गाण्यावर भरतनाट्यमचे सादरीकरण केलं जातं. पोलिश रिफ्यूजी जेव्हा भारतात आले, त्यावेळी त्यांचा जीवनप्रवासदेखील भरतनाट्यम द्वारे सादर केला जातो.
१०० हून अधिक सादरीकरण
अपेक्षा निरंजन यांचे एकूण प्रयोग पाहता १०० हून अधिक आतापर्यंत त्यांनी सादरीकरण केलेले आहे. छंद, आवड हाच त्यांचा व्यवसाय बनला आहे. एक व्यावसायिक नृत्यांगना म्हणून त्यांनी २० वर्षे काम केलं आहे. परदेशात भारताची संस्कृती पोहोचावी, नृत्याचा वारसा अबाधित राहावा म्हणून त्यांचे अविरत काम सुरु आहे.
Wednesday, July 16, 2025
What is Reboot, Remake and Remakequel | रीबूट, रिवायव्हल, रिमेक/सिक्वेल झाले; आता 'रीबूटक्वेल', 'प्रीबूट' म्हणजे काय? जाणून घ्या
https://pudhari.news/soneri/reboot-remake-revival-remakequel-rebootquel-preboot-explained-in-marathi-ss88
आज आपण पाहतो की, चित्रपट असो वा टीव्ही मालिका, ज्याचे अनेक रिमेक किंवा सीक्वल येत आहेत. रीबूट, रिवायव्हल, रिमेक अथवा सिक्वेल यांची चलती सध्या कलाविश्वात अधिक असल्याचे दिसते. अनेक स्ट्रीमिंग शोच्या जुन्या कहाणींवर नवा दृष्टिकोन टाकून ते पुन्हा नव्याने प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. पण रीबूट, रिमेक किंवा सिक्वेल म्हमजे काय? आता यापुढे जाऊन रिमेक्वेल आणि रीबूटक्वेलचा जमाना आला आहे, नेमकी ही संकल्पना काय आहे, हे जाणून घेऊया.
ओरिजिल चित्रपटांच्या अनेक फ्रेंचायजी काढल्या जात आहे. अगदी चार-पाच भागापर्यंत चित्रपटाच्या फ्रेंचायजी चालवल्या जातात. डिज्नी स्टार वार्स प्रोडक्शन्स आणि त्यांचे क्लासिक एनिमेटेड चित्रपटांचे लाईव्ह-ॲक्शन रीमेक उदाहरण म्हणून सांगता येईल.
रीबूट म्हणजे काय?
मागील काही दशकांत चित्रपट किंवा शो च्या नव्या एडिशनचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला गेलाय. पण अनेक रीबूट आणि रिमेक या दोन्ही संकल्पना एकच असाव्यात, असेही म्हटले जाते. आता बरेच प्रेक्षक तो चित्रपटाच्या रीमेकिंगसाठी समानार्थी शब्द म्हणून देखील वापरतात. पण, रीबूट आणि रिमेक दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. "रीबूट" हा मूळतः जुन्या चित्रपटाची कहाणी पूर्णपणे रीसेट करणे होय. रीबूट सहसा एकाच चित्रपटाऐवजी फ्रँचायजीचा संदर्भ देते आणि त्यात अशी कथा असते जी मालिकेच्या मागील सर्व किंवा काही नोंदी पूर्णपणे बदलते. कथानकाचे मुद्दे, पात्रे किंवा ठिकाणे कथेच्या किंवा मालिकेच्या जुन्या आवृत्तीसारखे असू शकतात.
परंतु रीबूट केलेली आवृत्ती सहसा पूर्णपणे नवीन असते, ज्याचा पूर्वीच्या गोष्टींशी फारसा संबंध नसतो. २०११ मध्ये राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्सने सुरू झालेले प्लॅनेट ऑफ द एप्स चित्रपट आणि डार्क युनिव्हर्स फ्रँचायझी, द ममी (२०१७) असे काही उदाहरण म्हणून देता येतील.
रिव्हायव्हल म्हणजे काय?
चित्रपटासाठी हा शब्द कमी वापरला जातो. पण टेलिव्हिजन किंवा स्ट्रीमिंग मालिकांबद्दल रिव्हायव्हल शब्द अनेकदा आढळतो. हे रीबूटच्या अगदी विरूद्ध आहे. मागील कथेकडे दुर्लक्ष करून ती पुन्हा नव्याने सांगणे किंवा सादर करणे होय. प्रेक्षकांना माहिती असलेल्या कहाणीच्या घटनेनंतर तिचं कहाणी पुढे सुरू ठेवणे. रोझेन (Roseanne/द कॉनर्स, नेटफ्लिक्सची सीरीज फुलर, beloved sitcom Full House ही उत्तम उदाहरणे देता येईल.
रीमेकचा अर्थ काय होतो?
हॉलीवूडमध्ये फ्रेंचायजींना रीबूट करणे आणि टीव्ही सीरीज रिव्हायव्हल करण्याआधी ते क्लासिक चित्रपटांचे रीमेक बनावायचे. रिमेकचा सर्वात सोपा अर्थ आधी पासून दाखवण्यात आलेल्या कथेची नवी दुसरी आवृत्ती. रिमेकमध्ये पूर्णपणे नव्या गोष्टींचा समावेश करू शकतो. किंवा मूळ कहाणीच्या जवळपास गोष्टी दाखवू शकतात. हे सर्व स्टुडिओ आणि क्रिएटिव्ह टीमवर अवंलबून राहतं. रिमेकचे एक उत्तम उदाहरण म्हणजे-किंग कॉन्ग (१९३३). १९७० च्या दशकापासून कमीत कमी याचे दोन रीमेक बनले आहेत. प्रसिद्ध रीमेक डिज्नीची ॲनिमेटेड चित्रपटांचे लाईव-ॲक्शन ब्लॉकबस्टर ज्यामध्ये ब्युटी अँड द बीस्ट (२०१७), द लायन किंग (२०१९) आणि अन्य अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
सीक्वल म्हणजे काय?
सीक्वलचा अर्थ आहे एखादा चित्रपट, पुस्तक वा अन्य कुठल्याही कलाकृतीचा दुसरा भाग वा कडी, जे आधीपासून त्याच कहाणीवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कहाणीचा पुढील टप्पा होय.
मूळ फ्रँकेन्स्टाईन (१९३१) आणि जंगल क्रूझ (२०२१) सारख्या अलीकडील चित्रपटांचे सिक्वेल आले आहेत किंवा येतील. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्टार वॉर्स होय, ज्याने १९८० पासून कमीत कमी पाच एपिसोडिक सिक्वल आणि तीन प्रीक्वेल तयार केले आहेत.
नवीन चित्रपटांची रीबूट, रिमेक.. व्याख्या करणे कठीण
आता असे काही चित्रपट आले आहेत, ज्यांची रिबूट की रिमेक, ही व्याख्या स्पष्ट करणे कठीण गेलं आहे. कारण हॅलोविन (२०१८) सारखा चित्रपट सिक्वेल आणि रीबूट हे अस्पष्ट ठरले होते. तो तांत्रिकदृष्ट्या रीबूट आणि सिक्वेल दोन्हीही आहे. अशा चित्रपटांचे वर्णन करण्यासाठी "रीबूटक्वेल" सारखे शब्द येऊ लागले आहेत आणि २०११ मध्ये "राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स" च्या रिलीजसह "प्रीबूट" हा शब्द आता लोकप्रिय झालाय.
काय आहे legacy sequel?
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे "लेगसी सिक्वेल". यालाच "रीमेकक्वेल" असेही म्हणतात. मूळच्या फ्रँचायजींमध्ये आधीच सांगितलेल्या कथेचे रिव्हायव्हल करतात. याच उदाहरण म्हणजे स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स (स्टार वॉर्स: रिटर्न ऑफ द जेडीचा सिक्वेल, स्टार वॉर्स सीरीजचे रिव्हायव्हल. तथापि, स्टार्स वॉर्स अ न्यू होपच्या जवळपास जाणारा रिमेक) तसेच जुरासिक वर्ल्ड (जुरासिक पार्क III चा सिक्वेल, रिव्हायव्हल/रीबूट). अशा परिस्थितीत हॉलिवूडमधील आलेले कोणते सीरीज, कोणते चित्रपट, शोज, मालिका रीबूट केले गेले आहेत वा रिव्हायव्हल केले गेले आहेत किंवा रिमेक केले आहेत, ते परिभाषित करणे कठीण होत आहे.
Friday, May 9, 2025
कोल्हापूर समग्र दर्शन ओळख पुरेपूर कोल्हापूर
कोल्हापूर समग्र दर्शन ओळख पुरेपूर कोल्हापूर
*मुख्य परिचय (Introduction)*
⦁ कोल्हापूरचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व
⦁ दक्षिणेचे काशी म्हणून ओळख
⦁ पर्यटनासाठी महत्त्वाचे वैशिष्ट्ये (हेरिटेज, फूड, टेम्पल्स, निसर्ग)
*प्रमुख पर्यटन स्थळे (Top Tourist Attractions)*
*धार्मिक स्थळे*
⦁ श्री महालक्ष्मी मंदिर
⦁ ज्योतिबा मंदिर
⦁ नृसिंहवाडी
⦁ खिद्रापूर मंदिर
*ऐतिहासिक स्थळे*
⦁ कोल्हापूरचा राजवाडा
⦁ भूदरगड किल्ला
⦁ पन्हाळा किल्ला
⦁ विशाळगड
*निसर्ग पर्यटन*
⦁ रंकाळा तलाव
⦁ जोतिबा-पन्हाळा
⦁ राधानगरी दाजीपूर जंगल सफारी
⦁ गगनबावडा
⦁ सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
⦁ पावनखिंड
*कोल्हापुरी खाद्यसंस्कृती (Food & Cuisine)*
⦁ तांबडा-पांढरा रस्सा
⦁ कोल्हापुरी मिसळ
⦁ बुलेट थाळी
⦁ मसाले, कोल्हापुरी चटणी
*खरेदीसाठी खास ठिकाणे (Shopping & Souvenirs)श्*
⦁ कोल्हापुरी चप्पल
⦁ रंकाळा परिसरातील लोकल बाजार
⦁ मसाले, बांगड्या आणि साड्यांचे मार्केट
⦁ खास मोगरा, अबोली गजरा, फुलांचे मार्केट
⦁ गुजरी, सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी
⦁ हुपरी - चांदीचे माहेरघर
*इव्हेंट्स आणि सण (Festivals & Events)*
⦁ कोल्हापूर महोत्सव
⦁ नवरात्रोत्सव
⦁ लोकल जत्रा व यात्रा
⦁ चक्रेश्वरवाडी किरणोत्सव
⦁ खिद्रापूर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमा चंद्रदर्शन
⦁ बाळूमामा, आदमापूर यात्रा-भाकणूक
⦁ बिरदेव पट्टणकोडोली यात्रा
*हॉटेल्स व निवास पर्याय (Stay & Accommodation)*
⦁ बजेट हॉटेल्स
⦁ हेरिटेज होमस्टे
⦁ रिसॉर्ट्स
*प्रवास मार्गदर्शिका (Travel Guide)*
⦁ कोल्हापूरला कसे पोहोचावे? (रेल्वे, बस, विमानसेवा)
⦁ स्थानिक ट्रान्सपोर्ट
⦁ 2-3 दिवसांचा प्रवास आराखडा
*अन्य मंदिरे, पर्यटन स्थळे-
पंचगंगा नदी, गगनगिरी महाराज गगनबावडा, धबधबे-कासारवाडी, राऊतवाडी, पालेश्वर इतर.
ब्लॉग/लेख -
⦁ 'कोल्हापूर इन 2 मिनिट्स'
⦁ कोल्हापुरात २४ तासात काय पाहाल?
⦁ फॅमिली ट्रिपसाठी सर्वोत्तम ठिकाणं
⦁ फूड लव्हर्ससाठी कोल्हापूर खास! - खाऊ गल्ली
⦁ स्थानिक गाईड व टूर पॅकेजेस
-------------------------------------------------------------------
उदाहरणासाठी कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिराची थोडक्यात माहिती
कोल्हापूरचे अंबाबाई (श्री महालक्ष्मी मंदिर) हा एक प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळ आहे आणि यावर लेख लिहिताना श्रद्धा, इतिहास, वास्तुकला, स्थानिक भावना, आणि प्रवासी माहिती यांचा समावेश असेल.
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर – दक्षिण काशी
ओळख :
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागात वसलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रद्धास्थानांपैकी एक आहे. लाखो भक्त दररोज येथे येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
हे मंदिर 7 व्या - 8 व्या शतकात चालुक्य राजांनी बांधले असल्याचा इतिहास सांगतो. मंदिराच्या शिल्पकलेवर चालुक्य आणि कदंब राजवटीचा प्रभाव दिसतो, असे काही पुरावे मिळतात. विशेष म्हणजे, देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणात कोरलेली असून ती स्वयंभू मानली जाते. हे संपूर्ण शक्तीपीठ खूप महत्त्वाचे आहे
धार्मिक महत्त्व :
* देवी महालक्ष्मी ही शक्तीची सात रूपांपैकी एक आहे.
* देवीची मूर्ती शंख, चक्र, गदा, पानपात्र धारण केलेल्या स्वरूपात आहे.
*नवरात्रोत्सव, ललिता पंचमी, आणि किरणोत्सव हे इथले मुख्य सण.
*किरणोत्सवात वर्षातून दोन वेळा सूर्याचे किरण थेट देवीच्या चेहऱ्यावर पडतात – हा अद्वितीय खगोलशास्त्रीय योग आहे.
**तिरुपती आणि कोल्हापूर याचा संबंध
वास्तुशिल्प :
* दगडी रचनेतील भव्य गाभारा आणि कलाकुसर केलेले खांब.
* मंदिरात अनेक छोट्या उपमंदिरांचा समावेश – गणपती, काशी विश्वेश्वर, शिव, विष्णु.
* प्राचीन महाद्वार, दीपमाळ आणि सुंदर मंडप.
प्रवाशांसाठी उपयुक्त माहिती:
लोकेशन - महालक्ष्मी मंदिर रोड, कोल्हापूर – रेल्वे स्टेशनपासून 5-7 मिनिटांच्या अंतरावर.
प्रवेश शुल्क : नाही.
दर्शन वेळ : सकाळी 5:30 ते रात्री 10:00
सुविधा : प्रसाद केंद्र, वाहनतळ
अन्य :
*मंदिर परिसरात असलेले चहा, फरसाण, वडापाव, मिसळ विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
* अंबाबाई मंदिरात आणि परिसरात ज्वेलरीची असंख्य खरेदीसाठी दुकाने
स्थानिक दुकानांत देवीच्या मूर्ती, चांदीचे दागिने, कोल्हापुरी वस्त्रप्रकार सहज उपलब्ध होतात.
प्रवास टिप्स :
* सकाळच्या वेळी दर्शनासाठी गर्दी कमी असते.
* नवरात्रात अतिशय गर्दी असते – वेळेचे नियोजन आवश्यक.
* वाहनतळाची सुविधा मंदिराच्या मागील बाजूस उपलब्ध. (बिंदू चौक)
श्री महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक केंद्र नाही, तर कोल्हापूरच्या संस्कृतीचे हृदय आहे. येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला अध्यात्मिक समाधान मिळते. तुम्ही कोल्हापूरला जात असाल, तर इथले दर्शन हा प्रवासाचा अविभाज्य भाग असायलाच हवा!
------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्याची ओळख - थोडक्यात रुपरेषा
१)श्री अंबाबाई मंदिराला हजारो वर्षांच इतिहास. राजा कर्णदेवाने हे मंदिर बांधले.
२)त्याच्याही आधीपासून कोल्हापूर होते. प्राचीन काळी कोल्हापूरचा इटलीशी व्यापार होता.
३)ब्रह्मपुरी या ठिकाणी प्राचीन कोल्हापूरचे अवशेष सापडलेले आहेत.
४) श्री अंबाबाई मंदिराखेरीज कपिलेश्वर, कुक्कुटेश्वर, रावणेश्वर इत्यादी प्राचीन शिवमंदिरे आहेत.
५) श्रीविठ्ठल मंदिर, खिद्रापूरचे श्रीकोपेश्वर मंदिर प्राचीन आहेत.
६)पर्णाल तथा पन्हाळा यालाही प्राचीन इतिहास आहे. पन्हाळ्याची पराशर गुहा प्राचीन आहे.
७) रामलिंग मंदिर, कात्यायनी मंदिर ही मंदिरे प्राचीन आहेत.
८) जुना राजवाडा हाही ऐतिहासिक महत्त्व असलेला आहे.
९) कोल्हापूरचे पॉवर हाऊस
१०) कोल्हापूरची संगीत- गायन परंपरा अल्लादियाखॉंसाहेब, केशवराव भोसले, सुधीर फडके, गुलाबबाई कागलकर इत्यादी.
११) कोल्हापूरची चित्रकला- आबालाल रेहमान, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, जी. कांबळे, जयसिंगराव दळवी इत्यादी.
१२) शिल्पकला - बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, राम सुतार इत्यादी.
१३) मल्लविद्या - ऐतिहासिक परंपरा.
१४) चित्रपट निर्मिती - स्वतः कॅमेरा तयार करून चित्रपट काढणारे बाबुराव पेंटर तसेच मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत माने इत्यादी.
१५)शाहिरी परंपरा.
*********************************************************
हे विषय देखील महत्त्वाचे
सोन्याचे पाऊस पडणारे गाव - कसबा बीड, आरेतील प्राचीन महादेव मंदिर, सातेरी देवस्थान (सुंदर निसर्ग आणि मंदिर)
वळीवडे मिलिटरी कॅम्प आणि पोलंड
कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी साज
दुधकट्टा, म्हशींसाठी प्रसिद्ध
फुटबॉल प्रेमी कोल्हापूर
जुन्या वास्तू इमारती
टाऊन हॉल
कणेरी मठ
कोल्हापुरातील पुतळे (गांधी पुतळ्याची कथा)
लता मंगेशकर आणि कोल्हापूर
कोल्हापुरातील राजे
चंद्रकांत मांडरे, आशा काळे... कोल्हापूर मधील कलाकार आणि म्युझियम
वस्तुसंग्रहलये
नाट्यगृहे -केशवराव भोसले
शालिनी स्टुडिओ
चित्रपट गृहे
बाहुबली आणि जैन धर्मीय मंदिरे, जहाज मंदिर
जयप्रभा स्टुडिओ, चित्रनगरी
कोल्हापूरचा भूगोल - नद्या आणि डोंगर
राज कपूर पुतळा खासियत
कुस्ती पंढरी
कोल्हापूरचे उद्यमनगर- म्हादबा मेस्त्रींचे योगदान
शाहू महाराज आणि कोल्हापूर
साखर कारखाने
हातमाग उद्योग-इचलकरंजी
ऊस शेती
जिल्ह्यातील पठारे - मसाई, मोरजाई पठार
प्रयाग चिखली आणि नृसिंह वाडी संगम
महाद्वार रोड
बिंदू चौक ऐतिहासिक महत्व
सर्वात जुनी लक्ष्मीपुरी
तंबाखू उत्पादन जयसिंगपूर बाजार पेठ
महत्वाचे उद्योजक
जिल्ह्यातील किल्ले
थोरला दवाखाना cpr ची कहाणी
शिवाजी विद्यापीठ कसे स्थापन झाले
शिवाजी महाराज आणि पन्हाळा
ताराराणी आणि करवीर
कोंबड्याची पूजा करणार गाव, कबड्डीपटू, खेळाडू घडवणारे गाव वडणगे
मर्दानी खेळ आखाडे... तलवार बाजी... लाठी काठी
ठीकपूर्लीची बर्फी आणि चक्रेश्र्वर वाडी ऐतिहासिक-भौगोलिक महत्व
राधानगरी पर्यटन, पन्हाळा
सैनिकांचं गाव गिरगाव
---------------------------------
- वेब कंटेंट रायटर - स्वालिया न. शिकलगार, कोल्हापूर
kalyani chalukya shri dattatreya temple
https://www.google.com/search?q=kalyani+chalukya+shri+duttatrey+temple&oq=kalyani+chalukya+shri+duttatrey+temple&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOTIICAEQABgWGB4yDQgCEAAYhgMYgAQYigUyDQgDEAAYhgMYgAQYigUyDQgEEAAYhgMYgAQYigUyDQgFEAAYhgMYgAQYigUyDQgGEAAYhgMYgAQYigUyBwgHEAAY7wUyCggIEAAYgAQYogQyBwgJEAAY7wXSAQkxMTIxNGowajeoAgCwAgA&sourceid=chrome&ie=UTF-8#vhid=nsakXPgTGiXZrM&vssid=l
Friday, April 18, 2025
'हम करे सेंद्रिय क्रांती'तून उभारला अदिती टोपकर-कुलकर्णी यांचा सेंद्रिय खतांचा उद्योग
अदिती टोपकर-कुलकर्णी सध्या कोल्हापुरात आपल्या सेंद्रीय खतांच्या उद्योगात आहेत. बी.कॉम, एलएलबीमधून शिक्षण घेतलेल्या अदिती यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. आता त्या एमबीए देखील करत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या उद्योगातही करता आला. पुण्यात सीए करत असताना कोविड काळात त्या कोल्हापुरात परतल्या. त्याचवेळी सेंद्रीय खतांचे उत्पादन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या आई शैला शरद टोपकर सायकॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांसाठी रमाई एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून खतांचे उत्पादन करायच्या. त्यामुळे अदिती यांना खतांचे प्राथमिक ज्ञान आपल्या आईकडून मिळाले.
'रमाई ऑरगॅनिक्स'ची अशी झाली उभारणी
सुरुवातीला शेतकऱ्यांना खते पुरवठा केला जायचा. पुढे 'हम करे सेंद्रिय क्रांती' हा टॅग घेऊन Urban Line सुरु केली. त्यामध्ये फुलझाडे आणि फळबागांसाठी सेंद्रीय खते उपलब्ध करून देण्यात आली. (Land Scaping, Home gardening) यासाठी त्यांनी वेबसाईट सुरू केली. सोशल मीडिया टीम, मार्केटिंग टीम उभारली. सेंद्रीय खतांचे दोन प्लँट उभारण्यात आले. एक हमीदवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि दुसरा जयसिंगपूर (कोल्हापूर)
साडे तीन वर्ष ते या सेंद्रीय शेणखत उद्योगात आहेत. त्यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट (शिवाजी विद्यापीठ) येथून प्रशिक्षण घेतले आहे. फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर अंतर्गत शासनाचे लायसन (उत्पादनाचे) त्यांच्याकडे आहे. त्यांची उद्योगातील टीम देखील कुशल आणि चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अदिती यांच्याकडे १० फिक्स कामगार आहेत. प्रोडक्शन टीममध्ये पाच ते सहा लोक काम करत आहेत. दोन ऑफिस स्टाफ, एक टेक्निकल एक्सपर्ट आणि एक मार्केटिंग हेड असे लोक आहेत. मोठे ऑर्डर असेल तर अधिकचे कामगार डेली बेसिसवर घेतले जातात.
सेंद्रीय खतांच्या उद्योगासाठी सुरुवातीला पाच ते सात लाखांची गुंतवणूक करण्यात आली. अनेक ठिकाणी झाडांसाठी, फळांसाठी, बागांसाठी उपयुक्त सेंद्रीय खते वापरली जातात. सर्व प्रोडक्ट प्युअर देशी गाईच्या शेण आणि गोमूत्र पासून बनवले जो. घरातील ओल्या कचऱ्याचे खतांमध्ये रुपांतरण करण्यासाठी डिकंपोझिंग कल्चर सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
टोपकर यांच्या या उद्योगात एकूण सात प्रकारची उत्पादने आहेत. यामध्ये लिक्विड स्वरूपात ४ आहेत. गार्डन मॅन्युअर, enriched वर्मी कंपोस्ट आणि पॉट मिक्स असे इतर ३ उत्पादने आहेत. टोपकर यांची काही प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये जीवामृत लिक्विड टॉनिक, दशपर्णी अर्क, बायो ॲक्टिव्ह यांचा समावेश आहे.
जीवामृत -जीवामृत लिक्विड टॉनिकला चांगली मागणी आहे. झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी हे वापरतात. जीवामृत हे १५ ते १८ महिने कालावधीपर्यंत टिकतात. यामध्ये गोमूत्र, काळा गुळ वापरले जाते.
दशपर्णी अर्क- १० वनस्पतींपासून दशपर्णी अर्कहा बनवला जातो. ज्याचा उपयोग किडनाशक म्हणून केला जातो. हे लिक्विड दुर्मीळ उत्पादन आहे. झाडांना, प्राण्यांना यापासून कोणतीही हानी नाही. शिवाय घरातल्या मुलांना सुद्धा यापासून कोणतेही नुकसान नाही. गुलाब, जास्वंद झाडांसाठी बुरशी लागू नये म्हणून हे वापरले जाते.
बायो ॲक्टिव्ह- झाडांचे फळे उत्तम येण्यासाठी. बियांचे जर्मिनेशन पूर्ण होण्यासाठी वापर होतो. या प्रोडक्टलाही अधिक मागणी आहे.
ही खते तयार केली गेली की, ती लॅब टेस्टिंगसाठी पाठवले जातात. खतामध्ये एनपीकेचे (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश)प्रमाण किती आहे हे देखील तपासले जाते.
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी आहे. ही उत्पादने ॲमेझॉनवर देखील उपलब्ध असल्यामुळे भारतात सगळीकडे वितरण होतं. पुण्यात गिरमे फार्म, मगरपट्टा सिटी गार्डन, जगताप नर्सरी, कोल्हापुरातील शिवाजी युनिव्हर्सिटीला देखील खते पुरवली गेली आहेत. शिवाय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला सुद्धा खतांचा पुरवठा केला गेलाय. अनेक इंडस्ट्रीजना हा पुरवठा केला जातो. गोव्यातील २० ते ३० नर्सरीत खते पुरवली जातात. यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न २५ ते ५० लाखापर्यंत आहे.
गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं
गार्डन्स मेंटेनन्स अंतर्गत लँडस्केपिंगसाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा केला जातो. यामध्ये निश्चित स्थळी भेट दिली जाते. त्या-त्या ठिकाणी गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं. त्यामध्ये मातीचे परीक्षण केलं जातं, बुरशी आहे का, याची तपासणी केली जाते, झाडांची परिस्थिती पाहून त्यांना खते आणि इतर संबंधित गोष्टी पुरवल्या जातात.
गार्डन अंडर वन रूफ संकल्पना
गार्डन अंडर वन रूफ संकल्पना हा टोपकर यांचा आगामी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ॲग्री मॉल किंवा ॲग्री शॉपी सुरु केली जाणार असून त्यामध्ये झाडे, खुरपे, अवजारे, रोपे, कुंड्या मिळणार आहेत. शिवाय सेंद्रीय भाज्यांचा प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. त्याचबरोबर बुक कॅफे आणि गार्डन शॉपी असा एक प्लान्ट बेस्ड कॅफे असणार आहे. सध्या सांगली जत येथे सेंद्रीय आंबा शेतीसाठी काम सुरू आहे. एप्रिल मे च्या शेवटी ही लागवड केली जाणार आहे.
जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी भरमसाठ रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे सेंद्रिय खत वापरणं किती गरजेचे आहे, हे भविष्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने हे समोर येतं.
Friday, April 4, 2025
कल्पकतेतून बनले उद्योजक- कोल्हापूरचे सुदेश राजुरीकर
सुदेश राजुरीकर हे कोल्हापुरातील उद्योजक. बीकॉम पर्यंतचे पदवीचे शिक्षण घेतलेले राजुरीकर यांनी उद्योग करण्याचे ठरवले आणि कल्पना आली ती कोरुगेटेड बॉक्स बनवण्याची. बॉक्स बनवण्याच्या कलेला त्यांनी उद्योगात रूपांतर केले. विविध गिफ्ट देण्यासाठी गिफ्टची आयडिया त्यांना आली. आज 'बॉक्स फॅक्टरी' नावाने त्यांचा कारखान इचलकरंजीमध्ये दिमाखात उभा आहे.
Monday, March 24, 2025
एका वर्षात मोती पिकवणारे शिवाजी विद्यापीठ
केवळ अलंकारच म्हणून नव्हे तर औषध निर्मिती आणि सौंदर्य अंलकारमध्ये मोत्यांचे महत्त्व आहे. समुद्रातील शिंपल्यापासून मोती तयार होत असल्याचे सर्वश्रृत आहे. चीनमधील शांघायमध्ये गोड्या पाण्यातील शिपल्यांसह संवर्धित मोती तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. तेव्हापासून चीन जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मोती संवर्धक व उत्पादक देश बनलाय. चीनमध्ये दरवर्षी १५०० मे. टनांपेक्षा जास्त मोतींचे उत्पादन होते. आता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वय, प्राणी शास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे यांच्या सहकार्यातून गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी ठरलाय. आजही या प्रकल्पावर निरंतर अभ्यास आणि काम सुरु आहे.
*असे पिकवले गेले मोती*
भोगावती नदीतील १०० शिंपले जमा करण्यात आले. पाण्याच्या टाकीतील पाणी नदीसारखा प्रवाह निर्माण केला गेला. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कायम राखली. पाणी प्रदुषित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. पाण्याचा दर्जा योग्य राखण्यासाठी रोज निरीक्षण करण्यात आले. प्राण्याचे वय, वजन, त्याची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. त्यामध्ये पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्यूदर अवघा २० टक्के इतका आढळला. म्हणजे शंभरातील ८० शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यूदर हा ४० टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात यश आले. महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा करण्यात आला.
*कमी भांडवलात उत्तम व्यवसाय अन् रोजगार*
पारंपरिक शेतीला पर्याय आणि जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी आणि शेतकरी मोती व्यवसायाची निवड करू शकतात. मोत्यांची योग्य प्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. यासाठी फारसे भांडवल लागत नाही. योग्य जागा, कृत्रिम किंवा नैसर्गिक तलाव तसेच २५ ते ३० हजार गुंतवणुकीत मोत्यांच्या शेतीचा व्यवसाय करता येतो. १२ ते १८ महिन्य़ांच्या या कालावधीत ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार मोत्यांना मोठी मागणी आहे. आता हा प्रयोग अधिक व्यापक करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
Dr. Nitin Kamble +919850148586
सालिह
**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...
-
कोल्हापूर समग्र दर्शन ओळख पुरेपूर कोल्हापूर *मुख्य परिचय (Introduction)* ⦁ कोल्हापूरचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व ⦁ दक्षिणेच...
-
केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पूर्वाश्रमीचे पॅलेस थिएटर. शाहू महाराज १९०२ साली विलायतेस जागतिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमलाही...
-
Pudhari News Published on: 10 Mar 2021, 8:21 am ब्रेकअप झाल्यानंतरच्या अनेक विचित्र घटना आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. ब्रेकअपनंतर कुणी डिप...









%20(1).jpg)



