एखादा उद्योजक जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा त्यामागे प्रचंड मेहनतच तर असतेच शिवाय सहनशीलताही खूप महत्त्वाची असते. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. तोंडात साखर असेल तर ध्येय गाठणारी माणसे शून्यातून विश्व निमार्ण करतात. अशाच एका यशस्वी उद्योजक म्हणून बेळगावातील मधवा आचार्य या मेहनती माणसाची कहाणी. एक मादुकरी ते उद्योजक म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटवलेल्या मधवा यांनी मजल दरमजल करत उद्योग विश्वात जी उंची गाठलीय, ती वाखाणण्याजोगे आहे. उद्योग जगतात धाडसाने उचलेल्या पावलांमुळेच आज त्यांच्या उद्योगाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
उद्योग विश्वातील एक हुशार उद्योजक म्हणून मधवा नरसिंह आचार्य यांना ओळखले जाते. मधवा आचार्य हे कर्नाटकातील प्रसिध्द उद्योजक आहेत. त्यांच्या हाताखाली सध्या सातशे कामगार कार्यरत आहेत. एका छोट्या इंडस्ट्रीचे रुपांतर आता ५ वेगवेगळ्या प्लँटमध्ये झाले आहे.
नरसिंह कृष्णा आचार्य हे त्यांचे वडील होते. तेही एका राईस मिलचे मालक होते. पण, एका व्यक्तीकडून त्यांची फसवणूक झाली. मधवा यांच्या वडिलांनी न खचता आपल्या मुलांचे संगोपन केले. राईस मिल हातातून गेली आणि तेथून सुरु झाला आयुष्याचा खडतर प्रवास.
मधवा यांचा जन्म अथणी येथे झाला. सध्या ते बेळगाव येथे स्थायिक आहेत. मुळचे गाव धारवाड जिल्ह्यातील आहे. मधवा यांनी वयाच्या ९ व्या वर्षांपासून वेद शिकायला सुरुवात केली होती. मधवा यांचे दहावीपर्यंत शिक्षण अथणीमध्ये झाले. पुढे बीएससीचे शिक्षण बेळगावात झाले.
पदवीनंतर नोकरी न करता त्यांनी उद्योग करायचे ठरवले. हातात फारसे भांडवल नव्हते. १९८० मध्ये त्यांच्या भावाने मदत केल्यानंतर १९८१ मध्ये एखादा उद्योग सुरू करावा असा विचार मधवा यांना आला. त्यांनी आतापर्यंत फौंड्री, मशीनिंग (सीएनसी), हिट ट्रीटमेंट असे कारखाने उभारले आहेत.
*मादुकरी ते उद्योजक अथांग प्रवास*
सुरुवातीला माधव मादुकरी होते. (मादुकरी म्हणजे-मुंज झाल्यानंतर ब्राह्मणांच्या घरी जाऊन ओम भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागायची असते) जिऑलाजीमध्ये बीएससी केल्यानंतर भावाने उद्योग सुरू करण्यासाठी दिलेल्या २५ हजार रुपयांतून त्यांनी लेथ मशीन खरेदी केली. पण या उद्योगात काही नफा, प्रगती नाही, हे समजल्यावर फौंड्री सुरू केली. भाड्याने फौंड्री घेऊन काही कामगार हाताखाली घेतले. पुढे मधवा यांनी स्वत:ची फौंड्री घेतली.
अभिषेक अलाॅईज प्रायव्हेट लिमिटेड नावाने मधवा यांचा उद्योग आहे. सध्यस्थितीत फौंड्रीत वेगवेगळे पाच युनिट आहेत. या युनिटमध्ये शेल मोल्डींग प्लॅन्ट, हिट ट्रीटमेंट प्लॅन्ट, मशिनिंग फॅसिलिटी, शेल प्लॅन्ट, हिट ट्रिटमेंट प्लॅन्टचा समावेश आहे.
मधवा यांनी फौंड्रीसाठी लागणारे नवे तंत्रज्ञान आत्मसात करत सीएनसी मशीन घेऊन काम सुरू केले होते. बेळगावला फौंड्री उद्योग सुरू केला. आता या फौंड्रीमध्ये साडे सहाशेहून अधिक कामगार आहेत. चाळीस वर्षांच्या प्रदिघर् खडतर प्रवासानंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून मधवा आचार्य नावारुपास आले.
*साऊथ आफ्रिकेत निर्यात*
प्रत्येक वर्षी जसे झेपेल तशी जमीन घेतली. सुरुवातीला साडेचार एकर आणि नंतर साडेपाच एकर जागा घेऊन प्लँटसाठी जमीन घेण्यात आली. जर पुढच्या भविष्य काळात जर प्रगती झाली, तर तेथे नवा प्लँट उभा करण्याचा मानस आहे. काही उत्पादने साऊथ आफ्रिकेतील कंपनीला निर्यात होतात. तर बेंगलोरमधील बॉश, क मिन्स लोकल कंपन्या आहेत, त्यांच्याकडेही उत्पादने निर्यात होतात. bosch, cummins, forbes marshall, poclain hydraulics, howden, pragati, rexrorth, polyhydron यासारख्या कंपन्यांना कच्चा मालाचा पुरवठा केला जातो. यामध्ये आॅटोमोटिव्ह, हायड्राॅलिक्स, टूल बिल्डसर्, ट्रॅक्टर, रेल्वे आणि कन्स्ट्रक्शन इक्वीपमेंटसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा समावेश आहे.
आता उद्योगात इतकी पारदर्शकता, नियमितता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि परफेक्शन आलं आहे की, गेलेला माल कधीच परत येत नाही. मालाची गुणवत्ता इतकी चांगली आहे की, कुठल्याही कंपनीने माल परत पाठवलेला नाही. त्याचबरोबर मधवा यांची विश्वासर्हता उत्तम ठरलीय. उद्योग नेटाने पुढे नेण्यासाठी प्रत्येक वर्षी उद्योगात नाविन्यता आणली जाते.
'नवंनवं तंत्रज्ञान आत्मसात केलं जातं. मी धाडसाने निर्णय घेतो. मी स्वत: या कंपनीचं नेतृत्व करत असल्यामुळे मला घाबरून चालत नाही. कारण या कंपनीवर अवलंबून अनेक कामगार, स्टाफ आहे. मी जर घाबरलो तर कंपनी ढासळेल,' असे मधवा म्हणतात.
*कोरोना काळात तग धरून राहिले*
कोरोना महामारीच्या काळात मधवा यांचे नियोजन इतकं उत्तम होतं की, सर्व कामगारांचे पूर्ण पगार देण्यात आले. कोरोना काळातही कंपनी तग धरून राहण्यासाठी आधीपासूनचं केलेलं नेटनेटकं नियोजन महामारीच्या काळात उपयोगी ठरलं. कोरोना सारख्या आपत्ती आली तर कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मधवा हे महिन्या-महिन्याला पैशांचं नियोजन करत राहतात. जर उद्या कंपनीची बिल आले नाहीत किंवा कामगारांनी काम बंद केलं तर पडत्या काळात पैसे येणार कुठून यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून उत्तमपणे नियोजन केले जाते.
*कामगारांना सुविधा*
कामगारांना कोड, ईएसआय, ग्रॅच्युईटी, बोनस, पीएफ, सेफ्टी ईअर बड्स, मास्क, हेल्मेट, दोन वेळेचा चहा हे मधवा यांच्या कंपनीकडून दिले जाते.
*अन् सरकारकडून सन्मान*
मादुकरीपासून ते मारुती कार अशा मथळ्याखाली कर्नाटकाच्या एका वृत्तपत्रातून मधवा यांच्याविषयी अनेक लेख प्रसिद्ध झाले होते. गोकूळ नावाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने हे लेख वाचून मधवा यांच्या कारखान्याला भेट दिली. गोकूळ यांनी त्यांच्या कार्याची दखल सरकारपर्यंत पोहोचवली. यशस्वी उद्योजक म्हणून सरकारकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी मधवा हे वडिलांसोबत विज्ञान भवन, दिल्ली येथे गेले. त्यावेळी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा होते.
एखादा उद्योग उभा करायचं म्हटलं की, आर्थिक भांडवल प्राधान्याने येते. त्यामुळे नव्या उद्योजकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि सहनशीलता ठेवण्याची फार गरज असल्याचे मधवा आचार्य मौलिक सल्ला देतात.
No comments:
Post a Comment