समीर मोहिते हे कोल्हापूरचे उद्योजक. त्यांनी अस्मी (अस्मीचा अर्थ- लोकप्रियतेच्या वाटेवर स्वार होणे) नावाची कंपनी उभारली. अस्मी द नॅचरल अशी टॅगलाईन घेऊन ते बाजारात उतरले आणि अल्पावधीतच त्यांची ही कंपनी नावारुपास आली. ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, त्याचाच वापर करून उत्पादने मार्केटमध्ये आणायच्या, असे ठरवून डोळ्यापुढे उद्योजक होण्याचे ठरवले आणि ते पूणर्देखील करून दाखवले. १०० टक्के केमिकलमुक्त आणि नैसर्गिक उत्पादन हे या कंपनीचे वैशिष्ट्य होय.
१०० टक्के केमिकलमुक्त नैसर्गिक उत्पादने
समीर मोहिते यांनी २०२३ला गूळ पावडर बाजारात आणली. आणि नवा स्टार्टअप सुरु केला आणि अल्पावधीतच अस्मी कंपनीला आयएसओ मानांकन मिळालं. मग उद्योगाने भरारी घेतली. सुरुवातीला तीन उत्पादने बाजारामध्ये आणण्यात आली. त्यामध्ये फेस ऑईल, हेअर ऑईल, बॉडी आईल आणलं. ही कंपनी लॉन्च करण्यात आली. खूप कमी वेळेत कंपनीच्या उत्पादनांना कस्टमसर्ची पसंती मिळाली. हेअर कलर, सीरम, फेस पॅक, पौष्टिक न्याहरी, हेअर पॅक, हेअर ऑईल, गुळ, हळद आणि शेती संजीवनी नावाचे अशी उत्पादने मोहिते यांनी स्वत: तयार केली. या व्यतिरिक्त मोहिते यांच्या अस्मी कंपनीने रत्नागिरी ते गोव्यापर्यंत चहा लॉन्च केला आहे. गुळाचा चहा, सेंद्रिय गुळाची काफी, सेंद्रिय गुळाची कोल्ड कॉफी अशी १९ उत्पादने बाजारात आणली आहेत. लेमन टी ची मागणी अधिक असल्यामुळे अस्मीने बाजारात केमिकल मुक्त उत्पादन आणलं. समीर मोहिते हे मुळचे कोल्हापूरचे. त्यांचा हा व्यवसाय मुंबई, गोवा, कणकवली येथे अधिक चालतो.
समीर माधवराव मोहिते हे सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेत के डी वाय पाटील महाविद्यालयातून १९९२ ला पास झाले. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले. कॅनडा बेस विद्यापीठात नोकरी करत करत डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले. ७-८ महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी पुन्हा आयुष्यात नोकरी केली नाही. ते वळले उद्योगाकडे.
मुळात समीर यांनी आधीपासून ठरवलं होतं की, उद्योगच करायचा. असा ठाम निर्णय घेतल्यामुळे उद्योग क्षेत्रातच त्यांनी स्वत: ला झोकून दिलं. गो पालन, कलर एजन्सी, शेळीपालन, मेंढीपालन, दुग्धव्यवसायात देखील त्यांनी आपले नशीब आजमावले. अनेक उद्योगात आर्थिक तोटा सहन करावा लागला.
उद्योगांच्या अभ्यास दौरा
सन २०१५ च्या दरम्यान परदेशवारी केली. सुरुवातीला पयर्टन म्हणून आणि नंतर विविध उद्योगांचा अभ्यास म्हणून त्यांनी नेक देशांचा दौरा केला. परदेशात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तेथील लोकांनी स्वतःची एक संस्कृती जपली. शिवाय भारताची संस्कृती देखील त्यांना आवडते. मग कल्पना आली की, नैसगिक उत्पादनांचा व्यवसाय करायचा. आशिया खंडातील अनेक देशांचा दौरा समीर मोहित यांनी केला. नेपाळ, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, तुर्कस्तान असे परदेश दौरे केले. या दौऱ्यात आयात-निर्यात अभ्यास केला. समीर मोहिते यांनी अभ्यास केला की, आपल्या भारत देशातून परदेशात काय विकलं गेलं? आणि परदेशातून आपल्या भारतात कोत्या गोष्टी विकल्या गेल्या आहेत. मग सुरुवातीस समीर मोहिते यांनी परदेशात कपडे, मोबाईल निर्यात केले.
परदेशातील लोक आरोग्याबाबत जागरुक आहेत. त्या तुलनेत भारतातील लोक म्हणावे तसे आरोग्याबाबत जागरूक दिसून येत नाहीत. आपण आरोग्याबाबत काही तरी केलं पाहिजे, म्हणून समीर मोहिते यांना या उद्योगाची कल्पना सुचली. सुरुवातीला ऑईलची उत्पादने बनवली. सुरुवातीला हेअर बदाम तेल, एरंडेल तेल यांचे मिश्रण तयार करून हेअर ऑईल' बनवले. लाख-सव्वा लाखाचे ऑईल मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणले आणि त्यांनी आपल्या घरापासून या व्यवसायाची सुरुवात केली.
२०२२ ला "पहिल्यांदा बॉडी ऑईल, हेअर ऑईल आणि फेस ऑईल बाजारात आणलं. जवस, बदाम वापरून बाॅडी ऑईलची निर्मिती केली. २-३ महिने लोकांना, ट्रायल कंपन्यांना पावरण्यास दिलं. मेडिकल सेंटर, डॉक्टर्स, दुकानदारांना, औषध दुकानदारांच्या भेटी घेतल्या. आणि आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली. पुढे पुढे या उत्पादनांची मागणी वाढत गेली.
समीर मोहित यांच्या सहकारी आसिया मॅडम यांच्या सहाय्याने हेअर शॅम्पूची निर्मिती केली. हेअर पॅक, फेस पॅक, बिअर्ड ऑईल बाजारात आणलं. हळद उत्पादने, शेती संजीवनी, सेंद्रिय गुळाचा चहा, डाएट फूड, पौष्टिक न्याहरी, तीळ, जवस, बदामपासून उत्पादने तयार केली गेली.
स्पेशल हळद ...
सेंद्रिय हळद केवळ दवबिंदूवर येते. जी कोकणातील देवगड तालुक्यातून आणली जाते. गुळाची पावडर कोल्हापुरात बनवली जाते. लहान बाळालादेखील वापरता येईल, असे फेस ऑईल, बॉडी ऑईल उत्पादन देखील आहेत. कच्च्या मालासाठी बदाम, तीळ बाहेरून आणले जातात. कोल्हापुरातून सेंद्रिय गूळ, शिकाकाई - आंबा, विशाळगड, गगनबावडा (जि. कोल्हापूर), मुलतानी मिठ्ठी - राजस्थान येथून, हळद-देवगड (कोकण) येथून, सीरमसाठी आकोड-काश्मीर येथून आयात केल्या जातात.
वांग उठणे, त्वचेसाठी, केस गळणे, पोट सुटणे समस्या वाढत चालल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी - जवस, तीळ, बदाम वापरून एक उत्पादन आणण्यात आलं आहे. कोणतीही पीझरव्हेटिव्ह वापरले जात नाहीत. सगळी उत्पादने अद्ययावत मशीन्सवर तयार केली जातात. हेअर कलर पाऊच, इतर उत्पादने बाटलीमध्ये आणि सीरम काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केले जातात.
पत्नी डॉक्टर वृंदा मोहिते आणि सूर्यभान मुलगा प्रोडक्शन पाहतात. तर समीर हे माकेर्टिंग पाहतात. टेक्निकल टीममध्ये अजित चौगुले, ब्युटी उत्पादनासाठी आसिया काझी मदत करतात.
समीर यांना कोकणात या व्यवसायासाठी पदीप यशवंत तोडकर यांनी खूप मदत केली. गामसेवक युवराज बोराटे, प्रिया आयरेकर मॅडम ( प्रियदशिर्नी संस्था) यांनी बचतगटाचे मेळावे घेण्यासाठी मदत केली. अचर्ना चव्हाण (दिशा फौंडेशन), शिवम बोदे (लोगो स्टिकसर्साठी), बचत गटाच्या महिलांचीही मदत मिळाली.
मोहिते हे तयार पोळी लवकरच बाजारात आणणार आहेत.