-ऋतुपर्ण
एक सौंदर्यवती, उत्तम नृत्यांगना जिच्यावर दोन देशांची गुप्तहेर असल्याचा आरोप लागला होता. आपल्या सौंदयांचा शस्त्र म्हणून वापर करणारी मादक नृत्यांगना जिचा मृत्यू खांबाला बांधून गोळ्या झाडून करण्यात आला. अगदी शेवटपर्यंत तिच्यावर झालेले आरोप तिने कधीच मान्य केले नाहीत. पण, तिच्यावर आरोप सिद्ध झाले की तिने हेरगिरी करत देशाला धोका दिलाय. आणि त्यानंतर तिला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. पण, मुळात माताहीरी कुणासाठी काम करत होती, हे अगदी शेवटपयर्यंत समजले नाही. तिचा मृत्यू आणि हेरगिरी एक रहस्य बनून राहिले.
जगभरात अनेक गुप्तहेर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावलीय. त्या गुप्तहेरांनी अनेक महत्त्वपूर्ण माहिती आपापल्या देशांना पुरवली. अशाच गुप्तहेरांपैकी एक होती - माताहारी- माताहारी उर्फ मार्गारिटा गर्छुड हिचा जन्म १८७६ मध्ये एका डच कुटुंबात झाला होता. असे म्हटले जायचे की, ती गर्भ श्रीमंत होती. मोठ्या श्रीमतीत आणि चैनीमध्ये आपले बालपण तिने घालवले. नेदरलॅंडमध्ये जन्मलेल्या माताहारीने जर्मन आणि फ्रान्स अशा दोन्ही देशांसाठी डबल एजंट म्हणून काम केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. माताहारीला शाही थाटात राहणे आवडायचे. याचाच फायदा अनेकांनी घेतला. ती इतकी प्रसिद्ध होती की, सैन्य अधिकारी, मंत्री आणि अनेक राजेशाही मंडळीसोबत तिचे घनिष्ठ संबंध होत.
पुढे नेदरलँडच्या एका शाही सैन्यातील डच्च लष्करी अधिकाऱ्यासोबत तिचे लग्न झाले. तिचा पती इंडोनेशियात तैनात होता. तो तिला मारहाण करायचा. अखेर त्यांचं नात संपुष्टात आले आणि तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला. दोघेही त्यावेळी तत्कालीन डच ईस्ट इंडीजचा द्वीप जावा येथे राहत होते. घटस्फोटानंतर ती इंडोनेशियातील एका डान्स कंपनीत सहभागी झाली. आपलं नाव बदलून तिने माताहारी असं ठेवले. नेदरलँडमधून इंडोनेशियात परतल्यानंतर माताहारीने एक डान्सर म्हणून आपली ओळख निर्माण केली. एक व्यावसायिक नर्तकी म्हणून ती पॅरिसला निघून गेली. ती एक उत्तम नृत्यांगना म्हणून लोकप्रिय झाली. पहिल्या जागतिक युद्ध सुरु होण्यापर्यंत ती एक नर्तकी आणि स्ट्रिपर म्हणून प्रसिद्ध झाली. माताहारीचे नृत्य पाहण्यासाठी अनेक देशांतून राजेशाही लोक आणि मोठे मोठे सैन्य अधिकारी येत होते. तिने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि गोपनीय माहिती एका पक्षा कडून दुसऱ्या पक्षाकडे देऊ लागली. जर्मन आणि फ्रान्ससाठीही ती डबल एजेंट काम करू लागला,
खरंतर, ती खरोखरचं गुप्तहेर म्हणून या देशांसाठी काम करायची का? असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण, जीव असेपर्यंत तिने स्वीकारले नव्हते की, ती हेरगिरी करणारी आहे.
नृत्यांगना असताना आपल्या खास अंदाजामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. इतकेच नव्हे तर तिचे नृत्य पाहण्यासाठी तिकिटे लावली गेली. तिच्या सुंदर नृत्याचा प्रत्येक जण वेडा होता. आपल्या मादक अंदाजामुळे प्रेक्षकांना तिने मंत्रमुग्ध केले. पॅरिसमध्ये आपल्या मोहक अंदाजाने लोकांना मोहून टाकले. अनेक सैन्यातील वरीष्ठ अधिकारी, दिग्गज लोक, राजकारणातील मंडळी आणि इतर मोठमोठ्या लोकांशी तिचे संबंध राहिले. त्यापैकी एक जर्मन प्रिन्सदेखील होता. असे- म्हटले जाते.
माताहारीचा अर्थ 'सूर्य' असा सांगितला जातो. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले होते. रातोरात तिचे नाव कानाकोपयात पोहोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली सर्वात लोकप्रिय ठरली.
अनेकांना तिने आपल्याकडे आकर्षित केले. तिने पैशांसाठी हे केल्याचे म्हटले जाते. कारण तिने बालपणात भोगलेली श्रीमंती किशोरवयात राहिली नव्हती. जेव्हा तिचे लग्न अधिकारी कॅप्टन रूडोल्फ सोबत झाले, त्यानंतर या दाम्पत्याला दोन मुले झाली होती. त्यापैकी एक मुलगा होता. त्याचा मृत्यू त्याच्या आजीने त्याला विष दिल्यामुळे झाला, असे पटले गेले. १९०६ मध्ये रूडोल्फसोलत नाते संपुष्टात आले. त्यावेळी रूडोल्फले तिला आर्थिक मदत किंवा उदरनिर्वाहासाठी पैसे देण्यासा ठी नकार दिला होता. ज्यामुळे मुलांचे देखभाल ती करू शकली नाही. मुलांना तिला सोडावे लागले, असेही म्हटले जाते. त्यामुळे स्ट्रिप डान्सर म्हणून तिने आपले वलय निर्माण केले. परदेशात शिविप डान्स खूप प्रसिद्ध होते. स्ट्रिप्स क्लबमध्ये अनेक तरुणी डान्स करताना एक - एक कपडे उत्तरवायची ही शैली माताहारीने सुरू केल्याचे सांगितले जाते.
घनिष्ठ संबंधामुळे ती अनेक सैन्य अधिकारी, राजकारणी यांच्या जवळ होती. पण, कोणत्याच देशाने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. नर्तकी ते गुप्तहेर अशी तिची प्रतिमा झाली. तिच्या ५० हजार सैनिकांच्या मृत्यूला ती जबाबदार असल्याचे म्हटले गेले. असे म्हटले जाते की, माताहारी जर्मनीत गुप्तहेर म्हणून गेली असता तिने फ्रान्सला धोका दिला. ज्यादा पैशांच्या हव्यासापोटी ती डबल एजंट बनली. म्हणजेच फ्रान्सची अनेक गोपनीय माहिती जर्मनीला सांगू लागली. त्यावेळी माताहारीला ५० हजार सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आले होते. महायुद्ध सुरू होताच फ्रान्सने ती जर्मनीची गुप्तहेर असल्याचे म्हटले तर जर्मनीने ती फ्रान्सची गुजहेर असल्याचे म्हटले. तरफ्रान्स आणि इंग्लंड गुप्तहेर खात्याचा माताहारीवर ती जर्मनीची हेरगिर असल्याचा संशय होता. असेही म्हटले जाते की, दोन्ही देशांना मुर्ख बनवून ती दोन्ही देशांकडून पैसा कमवायची.
फ्रान्सच्या सरकारने तिला गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी कबुल केले. ज्याच्या बदल्यात तिला हवी तेवढीर रक्कम मिळणार होती. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माताहारी आपल्या सौंदर्याचा शस्त्र म्हणून वापर करून फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. पण म्हणतात ना, हव्यास-लोभ कधीच फळाला जात नाही. ती डबल गेम खेळत असल्याचे लवकरच एक गुप्तहेर एजन्सीकडून उघड झाले.
पहिल्या महायुद्धाच्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदलॅँड्स आणि स्पेन असा प्रवास केला. जेव्हा ती स्पेनला पोहोचली तेव्हा तिला अटक करण्यात आली. तो महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांकडून गुप्त माहिती मिळवायची आणि ती विकायची. पण हे कुणालाच ठाऊक नव्हतं की, ती कुणासाठी काम करतेय? फ्रान्सच्या गुप्तहेर विभागाला एक दिवस माताहारीवर संशय आला. फ्रान्सच्या सैन्याने स्पेनची राजधानी माद्रिदहून जर्मनीची राजधानी बर्लिनला पाठवत असलेले तिचे संदेश पकडले. ज्यामध्ये म्हटले होते की, त्यांना एच-२९ करून तंतोतंत माहिती मिळत आहे. फ्रान्सच्या लष्कराच्या संशय आणखी बळावला. दुसरीकडे, जर्मनीची माहिती ती फ्रान्सला पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर लावला गेला. अशा प्रकारे माताहारीवर प्रत्येकाचा संशय बळावला. अखेरीस सन १९१७ मध्ये फ्रान्सच्या सैन्याने माताहारीला १३ फेब्रुवारी, १९१७ रोजी एका हॉटेलच्या खोलीतून पकडले. त्यावेळी माताहारी ४१ वर्षांची होती. कोर्टाने तिला शिक्षा सुनावली होती. १५ ऑक्टोबर १९१७ चा तो काळा दिवस होता. कोर्टाने तिला मृत्यूची शिक्षा दिली होती. गोळ्या झाडून तिचा ठार करा असा आदेश देण्यात आला. माताहारीवर लागलेले आरोप कधी ही सिद्ध झाले नाहीत, असे म्हटले जाते. ना ती कुणासाठी काम करायची? हे देखील उघड झाले नाही. अखेरपर्यंत तिने कधीही कबूल केले नाही की, ती हेरगीर आहे. आपण एक नर्तकी असल्याचे तिचे म्हणणे होते.पण, तिच्यावरकुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते.
तिला ५० हजार सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आले होते. गुप्त माहिती जर्मनीला दिल्याचा आरोप आणि धोका दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.
मृत्यूपूर्वी तिचा डोळ्यावर पांढया कापडाची पट्टी बांधण्यासाठी देण्यात आली होती. पण, माताहारीने ती पट्टी डोळ्यावर बांधण्यास नकार दिला. तिचे दोन्ही हात एका खांबाला बांधण्यास सांगितले होते. पण तिने एक हात मागे बांधण्यास नकार दिला. ती इतरांच्यापेक्षा इतकी वेगळी होती की, मृत्यूला घाबरण्याऐवजी तिने तिच्यावर गोळ्या झाडणाऱ्या अधिकायावर ला एका हाताने फ्लाइंग किस दिले. थोड्याच वेळात कमांडरने आदेश दिला आणि तिला तिच्यावर जोरदार आवाजात गोळ्या झाडल्या. थोड्या वेळाने एका अधिकाऱ्याने तिच्या डोक्यावर गोळी झाडली तशी माताहारी खाली कोसळली. एका सुंदर नर्तकी चा अशा प्रकारे करुण अंत झाला. तिचा मृत्यू आणि हेरगिरी दोन्ही रहस्य बनून राहिली.
तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांमध्ये माताहारी अनेक पुस्तके आणि चित्रपटांचा विषय बनली होती. जसजशी अधिक माहिती समोर आली, तिच्या गुन्हयावर संशय होऊ लागला. जर्मन सरकारने १९३० मध्ये ती निर्दोष असल्याचे सांगितले.
माताहारीच्या मृत्यूनंतर तिच्या परिवारातून तिचा मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नाही. माता हारीच्या सुंदर चेहयाला फ्रान्सच्या एका मेडिकल लॅबमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. पण, असं म्हटलं जात की, तिच्या सुंदर चेहऱ्याची लॅबमधून चोरी झाला. ती सुंदर, मादक नर्तकी होती. पण, फ्रान्सच्या आरोपांनंतर केवळ धोका देणारी गुजहेर म्हणून ओळखली गेली. माताहारीचे चरित्रलेखक रसेल वाॉरन हाऊ यांनी १९८५ मध्ये माताहारी निदोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले.