Sunday, December 31, 2023

गिरनार पर्वतावरील पायर्‍यांचं रहस्य

- ऋतुपर्ण

जूनागढची गोष्ट जेव्हा समोर येते, तेव्हा गिरनार नक्की डोळ्यासमोर येते. गिरनार सर्वांसाठी आस्थेचे प्रतीक आहे. १०,००० पायऱ्या चढून जायच्या म्हणजे खरंच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी लागते. कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य आहे. प्रत्येक वर्षी लाखों भक्त गिरनारवर चढून जातात. गिरनारच्या पायऱ्या खरंच खूप अवघड आहे, एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल, पायऱ्या कोणी आणि कशा तयार केल्या असतील, हे आश्चयर्जनकच आहे.
गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे.  जुनागडमध्येच गिरनारचा उंच डोंगर आहे, तिथे दत्तात्रेय मंदिर आहे. येथे हिंदू धर्माचीच नव्हे तर जैन धर्माचीही अनेक मंदिरे आहेत. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशीही सापडतात. सम्राट अशोकाच्या पूर्वीचे ही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैन धमीयांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे.
येथे इसवी सन पूर्व २५० मधील सम्राट अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. ‘रा’ खेंगार आणि चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेषही गिरनारवर सापडतात.
पाच हजार पायऱ्या चढल्यानंतर तेथे अंबामातेचे एक मंदिर आहे. देवी  पार्वतीने अंबामातेनच्या रुपात गिरनार पवर्तावर वास केला म्हणून हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यापुढे पाचशे पायऱ्या चढल्या की गोरक्षनाथांचे मंदिर आहे. पुढे पंधराशे पायऱ्या संपल्या की, भैरवनाथाचे मंदिर आहे. ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच ठिकाणी गुरु दत्तात्रेयांनी १२ हजार वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. २२५० पायऱ्यांनंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांची गुंफा लागते. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, अशी लहान लहान मंदिरे आहेत.
बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. पुढे भगवान नेमिनाथ चे मंदिर आहे. भवनाथांसह अनेक मंदिरे येथे आढळतात. इतक्या पायऱ्या चढून जाणे ही एक परीक्षाच आहे. शिवाय हिंदू आणि जैन धमिर्यांची एकत्र मंदिरे असणे हे या गिरनार पवर्ताचे सर्वांत खास वैशिष्ट्ये म्हणता येईल. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची यात्रा भरते.
जुनागढपासून आठ किमीवरील गिरनारला जाण्यास अनेक वाहने आणि वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. तसेच रोप वे देखील आहे. पण भक्त पायऱ्या चढून जातात.
गिरनारच्या निमिर्ती आणि त्याच्या पायऱ्यांशी संबंधित एक महान इतिहास जोडला गेला आहे. गिरनार गुजरात सवार्त उंच पर्वत आहे. लोक येथे वषर्भर तीर्थयात्रा करण्यासाठी येतात. देवदिवाळीच्या वेळी लोक लीली परिक्रमाचे आनंद देखील घ्यायला येतात. गुजरातच्या जुनागढची आणि गिरनार पवर्ताचा इतिहास अचंबित करणारा आहे.
या इतिहासाबाबत सांगितले जाते की, १८५७ च्या क्रांतीला ३२ वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी ब्रिटीशांनी जवळजवळ संपूर्ण भारत काबीज केला होता आणि अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात आली होती. जुनागढही गुजरातमधील एक संस्थान होते. या संस्थानाचा नब बहादूर खान होता. यावेळी जुनागढच्या नवाबाचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई आणि नवाबाचे पर्सनल असिस्टेंट पुरुषोत्तमराज झाला यांनी एक दिवस मिळून नवाबसमोर एक मत मांडले. ते म्हणाले की, हिंदू आणि जैन बांधवांना गिरनारवर जाण्यासाठी खूप कठिण जाते. अनेक भक्त तर मृत्यूमुखी पडतात. आपण पायऱ्या निर्माण केल्या तर? वर जाण्यासाठी पायऱ्या बनवण्याची विनंती त्यांनी नवाबाकडे केली.
नवाबाने एका ब्रिटिश इंजिनिअरला अहमदाबादहून येण्याचं आमंत्रण दिलं. त्या इंजिनिअरने निरीक्षण करून सांगितलं की, गिरनारच्या टोकाला पोहोचण्यापर्यंतचा पायऱ्यांचा एकूण खर्च एक लाख तीस हजार रुपये येईल.
१८८९ में १ लाख ३० हजार रुपये ही मोठी रक्कम ऐकून नवाबला धक्का बसला आणि त्याने नकार दिला. तेव्हा हरिदास देसाई आणि पुरुषोत्तमराज झाला म्हणाले की, नवाबसाहेब, सरकारी तिजोरीतून पैसे देऊ नका, आम्ही लॉटरीचे तिकीट काढू. लॉटरीमध्ये आकर्षक बक्षिसे असतील. आम्ही त्या लॉटरीची किंमत एक रुपया ठेवतो. म्हणजे लोक लॉटरी खरेदी करतील. त्याच पैशातून आम्ही ही शिडीची निमिर्ती करू. आम्ही लिहू की, ही लॉटरी कोणत्या उद्देशाने काढत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू आणि जैन लोक ही लॉटरी खरेदी करतीत. झाला आणि देशाई यांचे म्हणणे ऐकून यावर संमती दिली.
त्यानंतर या कामासाठी १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. बेचारदास बिहारी दास हे या समितीचे प्रमुख होते. १ ऑक्टोबर, १८८९ रोजी एक रुपयाची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीच्या पहिल्या बक्षीसाची रक्कम ४० हजार होती.  नंतर ती दहा हजार करण्यात आली. सर्वात कमी पक्षीस ५ रुपयाचे होते. त्यानंतर या लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आणि त्यात संपूर्ण योजना लिहिली गेली. या लॉटरीच्या तिकिटाच्या उत्पन्नातून एक शिडी होईल असे वर लिहिले गेले. हिंदू आणि जैन भाविकांना गिरनार टेकडीवर जाण्यासाठी ही शिडी बनवली जाईल, असा मजकूर त्यात होता.  
तिकिटामध्ये एक अतिशय आकर्षक योजना ठेवण्यात आली होती, जसे की १२ तिकिटे एकत्र खरेदी केले तर एक तिकीट मोफत, १०० तिकिटे विकणाऱ्याला १५ टक्के कमिशन मिळेल. जर तिकिटींची विक्री नाही झाली तर तुम्ही तिकिटे परत देऊ शकता. त्यानंतर अनेकांनी लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ब्रिटिशांनीही लॉटरीची तिकिटे खरेदी केली.
१५ मे, १८९२ रोजीचा तो दिवस उजाडला. लॉटरीचे बक्षीस काढण्याचे ठरले. हजारे लोक जुनागढ पोहोचले. जुनागड येथील फराज खान यांच्या घरी लॉटरीचे तिकीट ठेवण्यात आले होते. तब्बल १२८६६३ तिकिटे विकली गेली. पहिले १० हजार रुपयांचे बक्षीस मुंबईच्या रहिवासी सविताबेन दह्याभाई खांडवाला यांना देण्यात आले. ज्यांनी गिरनारचा जिना बांधण्यासाठी हे दहा हजार रुपयांचे बक्षीस अपर्ण केले.
१८९२ मध्ये, दहा हजार म्हणजे आजची कोट्यवधीमध्ये रक्कम असेल. दोन लोकांना दोन हजार पाचशे रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले. पंजाबमधील खुदा बक्श आणि लालचंद यांना ते मिळाले. नवसारीच्या बळवंतराय यांना तिसरे बक्षीस दिड हजार रपयांचे मिळाले होते. असा प्रकारे लॉटरी विकून जवळपास १ लाख तीस रुपये जमा झाले.
ब्रिटीश इंजिनिअरच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर काम सुरु झाले. यासाठी एकूण १९ वषार्ंचा कालावधी लागल्याचे. सांगितले जाते. १९ वषार्ंचा कालावधी म्हणजे हा मोठा काळ आहे. हे पायऱ्या निमिर्तीचे काम जितके अवघड तितकेच रहस्यमयदेखील आहे. इतक्या उंचावर बांधकामाचे साहित्य नेणे, मजुरांची दमछाक आणि उन वारा पाऊस सहन करत अगदी नेटनेटके पायऱ्यांची निमिर्ती करणे हेदेखील एक रहस्यच आहे.  


केंद्रीय मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ या  अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गांव पाटगाव’ कास्य पदकाने सन्मानित झाले. ‘मधाचे गाव’ ह्या उद्योगामुळे हे पाटगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) राज्याच्या चर्चेत आले. येथे कित्येक दशकापासून मधाचा व्यवसाय चालत आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे मध उत्पादनात घट झाली होती.पण अलिकडच्या काळात राज्य शासनाने विशेष लक्ष दिल्याने ही उत्पादन वाढले आहे. वर्षाला दोन कोटी रुपयाचा वीस हजार किलो मध पाटगावातून उत्पादित होतो.तसेच पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या या प्रयत्नांची दखल आता देश पातळीवरही घेतली जात आहे. हे केंद्र नाबार्डच्या शेती उत्पादक संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करणारी ही मध उत्पादक शेती संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे.


कोणतेही भेसळ नसलेला येथील मध "औषधी मध म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी पाच ते सात टनापर्यंत मध निर्मिती या परिसरात करण्यात येते. यामुळेच या भागातील शेतकऱ्यांची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आता पाटगावच म्हणजे मधाचे गाव म्हणून गेल्या काही वर्षात नकाशावर आले आहे. ग्रामीण भागासाठी व राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली होती.
 
    संस्थात्मक पातळीवर बाजारात ‘पाटगाव’ ह्या नावानेच मधाचा स्वतंत्र ब्रँड देशभर आणि जगभर पोहोचेल या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. मधाची आधारभूत किंमत ठरविली जाणार आहे.  मध उत्पादनातील प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याचा प्रशासन भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानुसार ही  मधपाळांची शेती संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेद्वारे परिसरात कॉमन फॅसिलिटी सेंटर चालवले जाणार आहे. त्याद्वारे मध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होतील. याबरोबरच जीआय टॅगिंग आणि ट्रेडमार्कची प्रक्रियाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

मधाचे उत्पादन,मध संस्थेची देखभाल, तसेच प्रशिक्षण,अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. मधाचे ब्रँडिंग व मधासाठी बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती  या यंत्रणेतून मिळत आहे. यासाठी मध संस्थेला 10 लाखाचे अनुदानही उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर पाटगाव आणि परिसरातील 100 जणांना केंद्र शासनाच्या ‘बी’ किपिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून ‘बी ब्रिडिंग’चे प्रशिक्षण दिले गेले आहे.या वर्षी  पाटगावसह परिसरातील शिवडाव, आंतुर्ली, पाळ्याचाहुडा, मठगाव अशा जवळच्या वाड्यावस्त्यांवर 286 मधपाळांकडे सुमारे 20 हजार किलो मध उत्पादन झाला आहे. यासाठी  खादी व ग्रामोद्योग मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती अंशू सिन्हा, महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो  संदेश जोशी,  जिल्हा खादी व ग्रामद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे आदिंचे सहकार्य लाभले आहे.    

      शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणार्‍या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.   सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येऊन याठिकाणी तयार होणार्‍या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्याची वाटचाल सुरू आहे.

मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता शासकीय पातळीवर काम चालू आहे. मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे.

   पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देणे, आवश्यक कर्ज पुरवठा करणे यासाठी तसेच पाटगावसह इतर  ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

महेश भोपळे - कनिष्ठ मध्यमवर्गीय ते कष्टाळू उद्योगपती



कोल्हापुरातलं एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब! शशिकला आणि मारुती भोपळे हे दाम्पत्य. मारुती हे बँकेत दफ्तरी. त्यांना तीन मुले. महेश, गणेश आणि योगेश.  तसं हे एकत्र कुटुंब. कुटुंबातील सदस्य 14 आहेत. शाळेत शिकता शिकताच स्वतःचा उद्योग असावा, असं स्वप्न महेशनं बाळगलं होतं. 23 जुलै 1980 या दिवशी जन्मलेल्या महेश यांचं शिक्षण 1995 मध्ये दहावी, 1997 मध्ये बारावी पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी कळंबा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आय. टी. आय.) प्रवेश घेतला. दरम्यान 1997 ते 2002 ह्या कालावधीत एका पेट्रोल पंपावर अटेंडंट म्हणून नोकरी केली.  2002 मध्ये आय. टी. आय. पूर्ण झाल्यावर शिरोली औद्योगिक वसाहतीत एका उद्योगात सी. एन. सी. ऑपरेटर म्हणून नोकरी केली नोकरी 2011 पर्यंत केली. हे काम करत असतानाच आपले स्वतःचे मशीन शॉप असावे ही मूळची तीव्र इच्छा अधिकच बळावत गेली. पण धाडस व भांडवल कमी पडत होते.

त्या वेळी त्यांचे मित्र पुढे आले व त्यांनी महेश यांना भागिदारी व्यवसाय सुरू करू या असे सुचवले. महेशने भावांना सोबत घेऊन व्यवसाय सुरू कारावा, असं वडिलांना वाटत होत. बाहेरचे भागीदार घेण्याऐवजी आपल्याच भावंडांना घ्यावं, असं ते म्हणत होते. पण मित्रांनी आरंभापासून साथ दिली होती. त्यांना वार्‍यावर सोडून भावांना सोबत घेणे हे योग्य वाटत नव्हतं. वडील नाराज होते, पण त्यांनीच 1लाख 16 हजार रुपयांचे भांडवल दिलं. चार भागीदार  मिळून श्री एंटरप्राइज   नावाची आपली स्वतःची छोटीशी कंपनी महेश यांनी स्थापन केली. पूर्वी पेट्रोल पंपावर कामगार असताना लग्नासाठी कुणी मुलगी देत नव्हतं. पण ते सी. एन. सी. मशीन शिकून तरबेज झाले, कारखान्यात पगार वाढला.  त्यानंतर त्यांना सधन कुटुंबातील मुलगी राजलक्ष्मी ही पत्नी म्हणून मिळाली. महेश उद्योजक होण्यात पत्नीची  साथ मोलाची मिळाली. मोठी मुलगी राजलक्ष्मी आणि लहान मुलगी महेश्वरी ही आहे.

 उद्योग तर सुरू झाला. पहिली ऑर्डर ब्रेक डिस्कची श्री कणेरी इंडस्ट्रीज यांनी दिली.  त्यांना पहिले बिल सात हजार  मिळाले. हळुहळू कामात सुधारणा करून 2018 पर्यंत त्यांचं बिल महिन्याला 40 हजारपर्यंत पोहोचलं.  मग त्यांनी मार्च 2018 ला त्यांनी आणखीन एका भागिदाराचा समावेश  करून श्री शुभलाभ सी. एन. सी. वर्क्स या नावाने नवीन कंपनी चालू केली. सुरुवातीला प्रत्येकी 4 लाख भांडवल घालून ही कंपनी चालू केली  त्या वर्षी त्यांची वार्षिक उलाढाल 19 लाख रुपयांची झाली.  महेश हे महिन्याला 1700 डिस्क सप्लाय करत होतो तो 2018 ला डेली 500 ब्रेक डिस्क म्हणजे 1महिन्याला 12 हजार ते 12 हजार 500 पर्यंत वाढवले. तोपर्यंत कोविडचे संकट आले.  सर्व काही ठप्प झाले, पण कोरोना काळात सर्व कामगारांना पगार दिला. अजूनही महेश आणि त्यांचे भागीदार वर्षातून एकदा सगळ्या कामगारांना घेऊन सहल काढतात.  चार महिन्यात मंडळींनी पुन्हा उभारी घेतली. नंतर बंधू योगेश यालाही सोबत घेतलं. अपार परिश्रम करून भागिदारीत उद्योग यशस्वी करून दाखवायचा अशी जिद्द बाळगली होती. लग्न हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण ठरले. महेश आणि त्यांच्या भागिदारांच्या उद्योागात दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील पार्ट,  एस. पी. एम. मधील पार्ट, फास्टनर्स-   जसे  नट- बोल्ट,  शेती लाईन मधील लहान- मोठे विविध पार्ट, गियर बॉक्स मधील पार्ट, आणखीन काही सुट्टे पार्ट, लिफ्ट मधील पार्ट. हे सगळे मिळून महिन्याला चार मशीन्सवर सुमारे  40 हजार पार्ट बनवले जातात. दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील काम मिळवताना भरपूर धावपळ झाली; पण प्रयत्न, चिकाटी व कामावरील एकाग्रता ह्या जोरावर ते मिळालं. गुणवत्तापूर्वक उत्पादन  करण्यात सातत्य आहे. लिफ्टमधील पार्ट इटलीला निर्यात होतो, तर नट- बोल्ट नावाचा  पार्ट अद्वैत फास्टनर्स मध्ये जातो व तिथून पुढे परदेशात निर्यात होतो.

महेश यांची मुलगी राजनंदिनी ही सध्या तीन वर्षाचा डिप्लोमा करत आहे. 2027 मध्ये ती बी. ई. शिकत होईल. त्यानंतर ती आणि माझे दोन भाऊ मिळून स्वतंत्र उद्योग सुरू करणार आहेत. आत्ता महेश यांच्या कंपनीत चार सी. एन. सी. मशीन्स, 14 कर्मचारी अशी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या यशात सर्व मित्रपरिवार व त्यांनी जिथे नोकरी केली, तेथील आस्थापनांचे मालक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. त्या सर्व मालकांनी खूप प्रेरणा व काम दिले त्यामुळे आपण येथवर पोहोचलो, असं महेश म्हणतात. आत्ता कंपनीवर कोणतेही कर्ज नाही,वार्षिक आर्थिक उलाढाल 45 लाखाची आहे.  फक्त  लहानपणी चे मित्र 10 वीचे वर्गमित्र,  आय. टी. आय. चे वर्गमित्र  आणि व्यवसायिक मित्र, सनदी लेखापाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आपला प्रवास सुरू राहील, आपले 2028 पर्यंत स्वतःच्या जागेत मशीन शॉप सुरू करायचे  व सी. एन. सी. मशीनची संख्या 15 करायची हे स्वप्न आहे. घरी असणारं मोठं कुटुंब आणि उद्योग विश्वातलं कुटुंब असा सुखाचा संसार महेश भोपळे करत आहेत.

Thursday, December 28, 2023

लाकूड उद्‌योगातील टिंबर मर्चेंट संदीप पाटील



संदीप पाटील हे कोल्हापुरातील लाकूड व्यावसायिक आहेत. लाकडापासून तयार केलेली अनेक उत्पादने त्यांच्याकडे विक्री होतात. संदीप पाटील यांच्या उद्योगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मागणी तसा पुरवठा केला जातो. अख्ख्या टिंबर मार्केटमध्ये कोणत्याही ग्राहकाला कोणतीही वस्तू तयार करून हवी असेल तर संदीप पाटील यांचेच नाव पुढे येते. विशेष म्हणजे कोल्हापूरमधील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सोन्याने मढवलेली जी मूळ लाकडी पालखी आहे, ती संदीप पाटील यांनी बन‌वलेली आहे. संदीप पाटील- यांच्या कामाची ख्याती इतकी झालेली आहे की, वूडवर्कमधील कोणतेही काम असो, संदीप पाटील यांच्या निर्मला- एन्टरप्रायझेस टिंबर मर्चट'चाच पुढाकार असतो. वडिलोपार्जित व्यवसाय संदीप पाटील यांनी पुढे नेत आज लाकूड व्यवसायात खूप लोकप्रियता मिळवली आहे.


संदीप पाटील स्वत: 30 वर्ष या उद्योगात कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल येथे झाले असून बी. कॉम पर्यंत पदवीचे शिक्षण झाले आहे. वडिलोपार्जित लाकूड व्यवसाय असतानाही संदीप यांनी शालेय जीवना पासून सायकलवरून प्रवास करत कारखान्यातील काम शिकून घेतले आणि शिक्षणही पूर्ण केले.


संदीप पाटील यांचे वडील रघुनाथ पाटील हे मुळात या लाकूड व्यवसायात होते. मुंबईच्या एका व्यक्तीला इलेक्ट्रिक वायर फिटिंगसाठी वूडन केसिंग कॅपिंगची आवश्यकता होती. त्यांच्या गरजेनुसार संदीप पाटील यांचे आजोबा सखाराम रामजी पाटील यांनी आपली दीन मुले १) त्रिंबक २) आनंदराव ३) रघुनाथ यांच्याशी विनिमय करून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९६२-६ ३ मध्ये शिवाजी पेठ माळी गवळी येथे भाड्याच्या जागेत एक वर्कशॉप-दत्त इलेक्ट्रिक केसिंग ब्लॉक वर्कस सुरू केलं. धेये वूडन स्वीचबोर्ड, सनमायका वोर्ड, केसिंग कॅपिंग, वूडन बॅटन यांचं उत्पादन सुरू केलं. त्यासाठी लागणारे सर्व कच्चे लाकूड दांडेली (कर्नाटक) येथून आणलं जायचं. ते उच्च प्रतीचे लाकूडे (सागवान) असायचे.


त्याचवेळी कामाच्या दर्जामुळे अल्पावधीतचं उद्योग भरभराटीस आला १९७२ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेने स्वतंत्र टिंबर मार्केट वसवले. पाटील यांनी शिवाजी पेठेतून टिंबर मार्केट येथे वर्कशॉप शिफ्ट केलं. १९२६ पर्यंत स्वीच बोर्डचे काम इतके प्रसिद्ध झाले की, शासनाच्या सार्वजनिक बांधकामाच्या विभागामध्ये च्या निविदामध्ये दत्त मेक स्वीच बोर्ड वापरावे, असे आवाहन किंवा सूचना छापली जायची. एका स्वीच बोर्डपासून सुरु झालेले काम लाकूड व्यवसायात बदलने ग्राहकांची गर्दी होऊ लागली अन् १५-१५ दिवस ग्राहकांना मालाची वाट पाहावी लागायची.


ऑर्डर दिल्यानंतर १५ दिवस वाट पाहावी लागायची. संदीप पाटील यांचे वडील रघुनाथ पाटील यांनी जोडव्यवसाय म्हणून चौकटी, खिडक्या तयार करणे, हा नवा उद्‌योग सुरु केला. उच्च प्रतीचे लाकूड वापरून ऑर्डरप्रमाणे माल तयार करून दिला जायचा. वर्कशॉपसाठी जागादेखील मोठी मिळाली होती. अल्पावधीतचं जोड व्यवसायालादेखील यश मिळाले. कामात भरभराट झाली. उच्च दर्जाचं उत्पादन, कुठलीही फसवणूक नाही, ग्राहकांशी मैत्रीपूर्ण संबंधामुळे ग्राहकांची विश्वासाहर्ता जपली गेली. लाकूड व्यवसायातील विविध उत्पादनांची मागणी वाढत गेली. रघुनाथ पाटील यांनी लाकूड व्यवसाय पुढे सुरूच ठेवला. भविष्यकाळात त्यांचा मुलगा संदीप पाटील यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेला. सध्या संदीप पाटील हे निर्मला एन्टरप्रायझेस (टिंबरमर्चट) नावाने व्यवसाय - उद्‌योग पाहत आहेत. 

कुठल्याही प्रकारचं काम कितीही अवघड आणि आव्हानात्मक असो, ते केवळ संदीप पाटील यांच्या कारखान्यात करून मिळते. नंतर १९९५ पासून निर्मला एन्टरप्रायझेजस नावाने कारखाना संदीप पाटील यांनी त्याच जागेत सुरू केला.
लाकडाचे दरवाजे, लाकडी खिडक्या, शटर्स, वूडन आणि सनमायका बोर्ड्स, सर्व फर्निचर वर्क, कार्विंग वर्क आणि मोल्डिंग, कडीपाट (झोपाळा), पाळणे, चौकटी, चौरंग, पाट, देव्हारे अनेक प्रकारचा लाकडी उत्पादने संदीप पाटील यांच्या उद्योग व्यवसायात तयार केल्या जातात. शिवाय मंदिरातील लागणाऱ्या देवाच्या पालख्या तयार केल्या जातात.


विशेष म्हणजे, अंबाबाई मंदिरात सोने चढवलेली जी पालखी आहे; ती मूळ लाकडी पालखी संदीप पाटील यांनी बनवली आहे.


घरचा उद्‌योग असल्याने सर्व प्रशिक्षण थेट कारखान्यातून संदीप पाटील यांनी घेतले. सध्या ऑनमशीन चार कामगार आहेत. ऑफमशीन (हाताने काम करणारे) सुताराच्या ३  जोड्या आहेत. तसेच फर्निचर करणाऱ्या जोड्‌या काम करतात. कामगार परंपरागत काम करत आहेत. यामध्ये परंपरेतून शिकलेले, फर्निचर वाले शिकून आलेले कामगार आहेत.

चौरंग पाच हजार रुपयांपासून पस्तीस हजारपर्यंत, पालखीची किंमत सरासरी सव्वा लाख (आकारानुसार किंमत बदलते) असते. संदीप पाटील यांनी आतापर्यंत पंचवीसहून अधिक पालख्या बनवल्या. त्या विविध मंदिरात पाठवल्या गेल्या. रोज सकाळ ते संध्याकाळ - पर्यंत काम सुरू असतं. एकदिवसदेखील कामामध्ये ख्वाडा पडत नाही.


संदीप पाटील यांच्या निर्मला एन्टरप्रायझेसची वार्षिक उत्माढाल सुमारे ७० लाख रुपये होते.

लाकूड व्यवसायातील उत्पादनासाठी मध्यप्रदेश सीमेवरील भागातून, चंद्रपूर, परतवाडा या भागातून तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून सागवान येते. या लाकडांचा दर्जा चांगला असतो. कर्नाटकातील दांडेली येथून आता कमी प्रमाणात लाकूड येते. कारण, कर्नाटकातून महाराष्ट्रात लाकूड आणण्यासाठी ४० टक्के कर भरावा लागतो.


७०-८० टक्के अगदी उच्च दर्जाचं नाकूड आफ्रिकन देशातून येत. त्यांचं उत्पादन खास प्रयत्न करून ठेवलं जातं. कलाकुसरीच्या कामासाठी सागवान वापरलं जातं. त्या खालोखाल जंगलवूड, आकेशिया, नाना, आंबा, बाभूळ, लिंबाचे लाकूड महाराष्ट्रातून येत. ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड येथून पाईन आणि देवदारांचं लाकूड येत. लाकूड खासगी व सरकारी कंपन्यांकडून येत. हे लाकूड गुजरातच्या कांडला बंदर, बंगळुरू बंदर, मुंबई बंदर येथे जहाजांमधून आणलं जातं. तेथून थेट कोल्हापुरात आणले जाते.


संदीप पाटील यांच्याकडे विविध उत्पादनांसाठी एकूण ९ मशिन्स उपलब्ध आहेत. ती मुंबई, गुजरात आणि पंजाब येथून आणली आहेत. एकूण १० हजार चौरस फूट जागेत संदीप यांचा कारखाना उभा आहे. लाकूड व्यवसायात प्रामुख्याने गुजरात मधील कच्छी-पटेल संपूर्ण भारतात आहेत. पण मराठी बांधवांपैकी खूप कमी लाकूड उद्‌योगात असणारे व्यापारी आहेत.


संदीप पाटील यांचे संपूर्ण, कोल्हापूर जिल्हयात ग्राहक आहेत. त्याचसोबत ते फर्निचरचे काम देखील करतात. अनेक घरांचे । दुकानांचे फर्निचर काम त्यांनी केलेले आहे. मुंबई, पुणे, सातारा, सावंतवाडी, सांग‌ली, रत्नागिरी, सांगोला अशा विविध जिल्हयांमध्ये जाऊन तसेच गोव्यातदेखील फर्निचरची काम केलेली आहेत.

संदीप पाटील - मोबाईल क्रमांक 9421203645

ईमेल - sandeepnirmala.patil@gmail.com

Friday, December 15, 2023

मकर संक्रांत आणि पर्यावरण

भारतातील प्रत्येक सणामागे शास्त्रीय आधार आहे. अनेक सण पर्यावरणाशी निगडित असून पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. पर्यावरणातील निसर्गासोबत नात्यांचा गोडवा जपणारा सण म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक वर्षी नवी उमंग आणि उल्हासचा संचार करत अनेक आशांनी भरलेला नव्या वर्षातील हा पहिला सण होय. आशा आणि गोडवा जपत अनेक दु:खाचे प्रसंग विसरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तीळगुळ, मिठाई एकमेकांना आदानप्रदान करतो. त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो. या पर्वावर तीळ आणि गुळापासून बनलेले खाद्यपदार्थ एकमेकांना दिले जातात, ज्यामुळे नात्यांमधले गुंफण आणि मधुरता दोन्ही वाढवण्यासाठीची क्षमता मकर संक्रातीमध्ये आहे. त्याचबरोबर, मकर संक्रांतीचा सण कायमचा लक्षात राहावा, यासाठी हा सण पर्यावरणाच्या दृष्टीनेही साजरा केला तर निसर्गाचे संरक्षण करण्यास ते खूपचं उत्तम ठरेल.


निसर्गासाठी संवेदनशीलता

काळाच्या ओघात हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला गेला तर? समाज आणि निसर्ग या दोघांचाही फायदा होऊ शकतो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजा करतात. यामध्ये आणखी एक गोष्ट करता येईल, ते म्हणजे मातीच्या कुंड्यांमध्ये सुंदर फुले, रोपांची लागवड केली तर? ही फुले, रोपे, झाडे आपल्याला उपयोगी तर पडतीलच. शिवाय ते आपल्याला नेहमी मकर संक्रातीच्या सणाची आठवण करून देतील. शिवाय, वेली, फुले, रोपांमुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढून पर्यावरण नक्कीच निरोगी होईल.

आपले हे छोटे प्रयत्न पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरेल. असा छोटासा प्रयत्नदेखील पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करेल. शिवाय, हीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाईल आणि यामुळे अनेक झाडे, वनस्पतींचे संरक्षण होईल. निसर्गाच्या संरक्षणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न देखील कितीतरी मोठ्याने पर्यावरण राखण्यास मदतीस कारणीभूत ठरू शकेल. घरातील इतर मुलींना,  महिलांनादेखील झाडांबद्दल आत्मीयता टिकून निसर्गप्रेम वाढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. वनस्पती, झाडांबद्दल आपण संवेदनशील होणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुन्हा पर्यावरणाचे संरक्षण अधिक मजबूतीने करण्यास आपण यशस्वी ठरू शकतो. आज निसर्गाच्या जवळ जाणे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनीच अनुभवले आहे.
मुळात संक्रांतीच्या काळात घरातील मुले आकाशात पतंग उडवतात. यावेळी मुलांना संक्रांतीच्या महत्वासोबतच निसर्ग, पर्यावरणाचेही महत्त्व मुलांना पटवून द्यायला हवे. अखेर, निसर्गाचे संरक्षण पिढीजातपणे त्यांच्याकडूनच घडणार आहे.

सांस्कृतिक वारसा निसर्गाशी जोडलेला

मकर संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे. यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला प्रार्थना करतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण तसा निसर्गाशी संबंधित तर आहे. कारण, जे मोसमी अन्नपदार्थ उपलब्ध होते, ते उष्ण पदार्थ असतात. हे पदार्थ खाण्यावर आपण अधिक भर देतो. हिवाळा ऋतूतील मकर संक्रांतीला आपण, रेवडी, तीळगूळ, गुळाच्या वड्या, आलेपाक, तीळाच्या वड्या, रेवडी आदानप्रदान करतो. मकर संक्रांतीला तीळगूळ वाटायची प्रथा महाराष्ट्रात आहे.

मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा काळ थंडीचा असल्याने तीळ आणि गूळ, शेंगदाणे चिक्की, तिळाचे लाडू खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. शरीर उष्ण राहून त्वचा सुंदर आणि टवटवीत राहण्यास मदत मिळत असते. यामुळे या दिवशी आवर्जून तीळगुळ वाटला जातो. काटेरी हलव्याचे दागिने महिला परिधान करतात. यामुळे घरोघरी तीळ, गूळ खरेदी करून गृहिणी तीळगूळ बनवत असतात.

काय आहे मकर संक्रांती?

ज्योतिषानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. सूर्याची एक राशीतून दुसऱ्यात प्रवेश करण्यास संक्रांती म्हणतात. संक्रांतीचा अर्थ संक्रमण अर्थात प्रवेश करणे असे आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या काळास ‘मकर संक्रांती’ म्हटलं जातं. मकर संक्रातीच्या पर्वाला काही वेळा उत्तरायण देखील म्हटलं जातं. यादिवशी गंगा स्नान करण्याची, व्रत, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख लीप वर्षात १५ जानेवारीला येते अन्यथा ते १४ जानेवारीला येते.

मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. नेपाळमध्ये खूप धामधुमीत  साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखलेजाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती म्हटले जाते. मकर संक्रांतीला तामिळनाडूमध्ये पोंगलच्या रूपात साजरं केलं जातं. कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये यास ‘संक्रांती’ म्हणतात. आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात अशा विविध नावांनी ओळखले जातात. याच दिवशी विविध राज्यात गंगा नदी किनारी माघ मेळा वा गंगा स्नानचे आयोजन केले जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते माघ मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे.

भौगोलिक महत्व

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूप पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायन पेक्षा अधिक शुभ मानला जातो. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये प्रवेश करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. या संक्रमणाच्या आधीपासूनच हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो. थंडीमध्ये ऊबदार आणि संक्रांतीला काळे कपडे वापरले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. या काळात शरीराला उर्जेची गरज असते. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात.

तसेच शरीराला आहारातून ऊर्जा मिळावी, यासाठी संक्रांतीला तीळापासून बनवलेले पदार्थ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर करतात. तीळ वापरण्यात दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करून एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात. 

Friday, December 8, 2023

खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर

 शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 

कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये

या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 

उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.

मंदिरात २ शिवलिंग

गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 

Image result for khidrapur temple

मंदिर परिसरात १२ शिलालेख

मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 

दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 

Image result for khidrapur temple

मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  

मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 

मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 

सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 

पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 

‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 


खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 

एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 

हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 

'मंदिरात विजेची सोय व्हावी' 

कोपेश्वर मंदिरात विजेची सोय व्हावी, तसेच मंदिराचे संवर्धन व्हावे. पर्यटकांना राहण्याची सोय व्हावी. त्याचप्रमाणे, प्रशासनाने प्रसाधनगृहाची सोय करणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी खासगी वाहने नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अडचणीचे ठरते. 

- प्रा. शशांक रामचंद्र चोथे, इतिहास अभ्यासक

Tuesday, December 5, 2023

कंबोडिया

 भारताला समृद्ध परंपरांचा इतिहास आहे. भारताच्या समृद्ध वैभवशाली इतिहासात मंदिरांना नन्यसाधार महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजही जगभरात अनेक देशांमध्ये पसरली आहे. भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक कथा आणि वारसा आजही जगभरात पाहायला मिळतात, जिथे मंदिरांच्या माध्यमातून ते पतित होतात. प्राचीन काळापासून अनेक मंदिरांची  निर्मिती झालेली आहे. पण, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठे मंदिर हे कंबोडिया देशात आहे. कंबोडियात स्थित असलेले अंग्कोर वाट हे इटलीतील ज्वालामुखी शहर पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. आठव्या  आश्चर्याची मान्यता  एक अनौपचारिक मान्यता आहे, जी नवीन इमारती, नवीन प्रकल्प आणि डिझाईन्सना प्रदान केली जाते. अंग्कोर वाट येथील वास्तूकला जगातील सर्वात अद्वितीय आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  


भारतात मंदिरांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात मंदिरे आहेत. कंबोडियातील अंग्कोर वाट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचा इतिहास ८०० वर्षांहून अधिक जुना आहे. कंबोडियातील अंगकोर वाट मंदिराची एक एक वास्तूकला आश्चर्यात टाकणारी आहे. वास्तविक, अंग्कोर वाट १२व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीयने ३० वर्षांच्या कालावधीत निर्माण केल्याचे म्हटले जाते. हे एक विशाल मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. १९९२ मध्ये जागतिक स्थळात या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

कंबोडिया एकेकाळी 'कंपुचिया' म्हणून ओळखले जात होते आणि ते शक्तिशाली हिंदू आणि बौद्ध साम्राज्यांसाठी ओळखले जात होते. अंग्कोरथोम आणि अंगकोर वाट या प्राचीन कंबुज देशाच्या राजधानी होत्या. मान्यतेनुसार, या राज्याचा संस्थापक कौंडिण्य ब्राह्मण होता, त्याचे नाव तेथील संस्कृत शिलालेख मध्ये आढळते. ९ व्या शतकात, जयवर्मा तिसरा कंबुजचा राजा झाला आणि त्याने सुमारे ८६० इ.स.मध्ये अंकोर्थम नावाची राजधानी सुरू केली, जी सुमारे ४० वर्षात बांधली गेली आणि ९०० इ.स. च्या सुमारास पूर्ण झाली. कंबुज साहित्यातही त्याच्या बांधकामाबाबत अनेक प्रसंग आढळतात.

थोम याचा अर्थ राजधानी असा होय. या मंदिरांच्या भारतीय गुप्त कलेचा प्रभाव असल्याचे दिसते. अंग्कोर वाटची मंदिरे, तोरण आणि शिखरे यांची सजावट गुप्त कला दर्शवते. मंदिरातील एका शिलालेखावरून असे दिसून आले आहे की, यशोधरपूरचा संस्थापक राजा यशोवर्मा हा विद्वान, हस्तकला, भाषा, लिपी आणि नृत्यात निपुण होता. अंग्कोरथोम  व्यतिरिक्त, त्याने कंबुज राज्यातील अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले, जेथे रामायण, महाभारत, पुराण आणि इतर भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास शिकवला गेला. अंगकोर वाटच्या हिंदू मंदिरांवर नंतर बौद्ध धर्माचा खोलवर प्रभाव पडला आणि नंतर तेथे बौद्ध भिक्षूंनी वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते.

अंग्कोर वाट हे १६२.६ हेक्‍टर जागेत पसरलेले आहे. अंग्कोरचे जुने नाव 'यशोधरपूर' होते. हे सम्राट सूर्यवर्मन द्वितीयने (१११२-५३ AD) च्या काळात बांधले होते. मेकाँग नदीच्या काठावर सिम्रीप शहरात हे मंदिर असून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. अंगकोर वाटचे मध्यवर्ती संकुल तीन मजली आहे. येथे, मंदिराच्या मध्यभागी एक ६५ मीटर उंच टॉवर आहे, जो चार लहान टॉवरांनी वेढलेला आहे. या मंदिरात वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान विष्णूची ३.२ मीटर उंचीची मूर्तीही स्थापित आहे. अंग्कोर वाट हे २ किलोमीटर परिसरात पसरलेले असून लांबी ७०० फूट आहे. या मंदिराच्या बाहेर विशाल खोल दरी आहे आणि पार करम्याासठी पूल आहे. मंदिर परिसरात पाच कमळाच्या आकाराचे टॉवर आहेत, जे माऊंट मेरुचे प्रतिक आहेत. किंबहुना, मंदिराची सुंदर वास्तुकला हे जगातील आठवे आश्चर्य बनवते. कंबोडियाचे हे मंदिर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नेदेखील जगातील सर्वात मोठे धार्मिक संरचना मानली आहे.

खमेर शास्त्रीय स्थापत्य शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो. हे मंदिर सूर्यवर्मन द्वितीय /e; भाचा, त्याचा उत्तराधिकारी धरणीन्द्र वमर्नने पूर् केलं होतं. इजिप्त व मेक्सिकोच्या स्टेप पिरॅमिडप्रमाणे पायऱ्या किंवा सिडीप्रमाणे बांधकाम सून मूळ शिखर जवळपास ६४ मीटर उंच हे. इतर आठ शिखर ५४ मीटर उंच आहेत.  स्थानिक लोकांमध्ये या मंदिराबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजातही स्थान देण्यात आले आहे.
विद्वानांच्या मते ते चोल वंशाच्या मंदिरांसारखे आहे. या मंदिरात दक्षिण-पश्चिमेला तीन गॅलरी आहेत, आतील गॅलरी जास्त उंचीवर आहेत. मंदिराच्या भिंतीवर भारतीय हिंदू धार्मिक ग्रंथातील अनेक प्रसंग, दृश्ये दर्शवण्यात आली आहेत. अप्सरांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे, दानव आणि देव यांच्यातील समुद्रमंथनाचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये तत्कालीन सम्राट, बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्रमंथन, देव-दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण आणि रामायण यांच्याशी संबंधित अनेक दगडी चित्रे आहेत. इथल्या रॉक पेंटिंगमध्ये चित्रित केलेली राम कथा अगदी थोडक्यात आहे. या रॉक पेंटिंगची मालिका रावणाच्या वधासाठी देवतांनी केलेल्या पूजेपासून सुरू होते. त्यानंतर माता सीता स्वयंवराचे दृश्य कोरण्यात आला आहे. दुसऱ्या एका रॉक पेंटिंगमध्ये प्रभू राम धनुष्यबाण घेऊन हरीण मागे धावताना दिसतात. यानंतर प्रभू राम यांची सुग्रीवाशी मैत्री झाल्याचे दृश्य आहे. त्यानंतर, बळी आणि सुग्रीव यांच्यातील द्वंद्व चित्रण केले आहे. आणखी एका रॉक पेंटिंगमध्ये अशोक वाटिकेत हनुमानाची उपस्थिती, राम-रावण युद्ध, माता सीतेची अग्निपरीक्षा आणि प्रभू रामाचे अयोध्येत परतले या दृश्यांचे चित्रण दाखवण्यात आले आहेत. नंतर, अंगकोर वाटच्या मंदिरावर बौद्ध धर्माचा  प्रभाव पडला. त्यात बौद्ध भिक्खू राहत असत, असे म्हटले जाते.
हे मंदिर बराच काळ अज्ञात राहिले. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री महाउत यांच्यामुळे १९ व्या शतकाच्या मध्यात अंगकोर वाट मंदिर पुन्हा प्रकाशझोतात आले. १९८६ ते १९९३ या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली.
पर्यटक येथे केवळ वास्तुशास्त्राचे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठीच येत नाहीत तर येथील सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही येथे येतात.

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...