Tuesday, December 5, 2023

कंबोडिया

 भारताला समृद्ध परंपरांचा इतिहास आहे. भारताच्या समृद्ध वैभवशाली इतिहासात मंदिरांना नन्यसाधार महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजही जगभरात अनेक देशांमध्ये पसरली आहे. भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक कथा आणि वारसा आजही जगभरात पाहायला मिळतात, जिथे मंदिरांच्या माध्यमातून ते पतित होतात. प्राचीन काळापासून अनेक मंदिरांची  निर्मिती झालेली आहे. पण, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठे मंदिर हे कंबोडिया देशात आहे. कंबोडियात स्थित असलेले अंग्कोर वाट हे इटलीतील ज्वालामुखी शहर पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. आठव्या  आश्चर्याची मान्यता  एक अनौपचारिक मान्यता आहे, जी नवीन इमारती, नवीन प्रकल्प आणि डिझाईन्सना प्रदान केली जाते. अंग्कोर वाट येथील वास्तूकला जगातील सर्वात अद्वितीय आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  


भारतात मंदिरांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात मंदिरे आहेत. कंबोडियातील अंग्कोर वाट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचा इतिहास ८०० वर्षांहून अधिक जुना आहे. कंबोडियातील अंगकोर वाट मंदिराची एक एक वास्तूकला आश्चर्यात टाकणारी आहे. वास्तविक, अंग्कोर वाट १२व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीयने ३० वर्षांच्या कालावधीत निर्माण केल्याचे म्हटले जाते. हे एक विशाल मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. १९९२ मध्ये जागतिक स्थळात या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

कंबोडिया एकेकाळी 'कंपुचिया' म्हणून ओळखले जात होते आणि ते शक्तिशाली हिंदू आणि बौद्ध साम्राज्यांसाठी ओळखले जात होते. अंग्कोरथोम आणि अंगकोर वाट या प्राचीन कंबुज देशाच्या राजधानी होत्या. मान्यतेनुसार, या राज्याचा संस्थापक कौंडिण्य ब्राह्मण होता, त्याचे नाव तेथील संस्कृत शिलालेख मध्ये आढळते. ९ व्या शतकात, जयवर्मा तिसरा कंबुजचा राजा झाला आणि त्याने सुमारे ८६० इ.स.मध्ये अंकोर्थम नावाची राजधानी सुरू केली, जी सुमारे ४० वर्षात बांधली गेली आणि ९०० इ.स. च्या सुमारास पूर्ण झाली. कंबुज साहित्यातही त्याच्या बांधकामाबाबत अनेक प्रसंग आढळतात.

थोम याचा अर्थ राजधानी असा होय. या मंदिरांच्या भारतीय गुप्त कलेचा प्रभाव असल्याचे दिसते. अंग्कोर वाटची मंदिरे, तोरण आणि शिखरे यांची सजावट गुप्त कला दर्शवते. मंदिरातील एका शिलालेखावरून असे दिसून आले आहे की, यशोधरपूरचा संस्थापक राजा यशोवर्मा हा विद्वान, हस्तकला, भाषा, लिपी आणि नृत्यात निपुण होता. अंग्कोरथोम  व्यतिरिक्त, त्याने कंबुज राज्यातील अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले, जेथे रामायण, महाभारत, पुराण आणि इतर भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास शिकवला गेला. अंगकोर वाटच्या हिंदू मंदिरांवर नंतर बौद्ध धर्माचा खोलवर प्रभाव पडला आणि नंतर तेथे बौद्ध भिक्षूंनी वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते.

अंग्कोर वाट हे १६२.६ हेक्‍टर जागेत पसरलेले आहे. अंग्कोरचे जुने नाव 'यशोधरपूर' होते. हे सम्राट सूर्यवर्मन द्वितीयने (१११२-५३ AD) च्या काळात बांधले होते. मेकाँग नदीच्या काठावर सिम्रीप शहरात हे मंदिर असून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. अंगकोर वाटचे मध्यवर्ती संकुल तीन मजली आहे. येथे, मंदिराच्या मध्यभागी एक ६५ मीटर उंच टॉवर आहे, जो चार लहान टॉवरांनी वेढलेला आहे. या मंदिरात वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान विष्णूची ३.२ मीटर उंचीची मूर्तीही स्थापित आहे. अंग्कोर वाट हे २ किलोमीटर परिसरात पसरलेले असून लांबी ७०० फूट आहे. या मंदिराच्या बाहेर विशाल खोल दरी आहे आणि पार करम्याासठी पूल आहे. मंदिर परिसरात पाच कमळाच्या आकाराचे टॉवर आहेत, जे माऊंट मेरुचे प्रतिक आहेत. किंबहुना, मंदिराची सुंदर वास्तुकला हे जगातील आठवे आश्चर्य बनवते. कंबोडियाचे हे मंदिर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नेदेखील जगातील सर्वात मोठे धार्मिक संरचना मानली आहे.

खमेर शास्त्रीय स्थापत्य शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो. हे मंदिर सूर्यवर्मन द्वितीय /e; भाचा, त्याचा उत्तराधिकारी धरणीन्द्र वमर्नने पूर् केलं होतं. इजिप्त व मेक्सिकोच्या स्टेप पिरॅमिडप्रमाणे पायऱ्या किंवा सिडीप्रमाणे बांधकाम सून मूळ शिखर जवळपास ६४ मीटर उंच हे. इतर आठ शिखर ५४ मीटर उंच आहेत.  स्थानिक लोकांमध्ये या मंदिराबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजातही स्थान देण्यात आले आहे.
विद्वानांच्या मते ते चोल वंशाच्या मंदिरांसारखे आहे. या मंदिरात दक्षिण-पश्चिमेला तीन गॅलरी आहेत, आतील गॅलरी जास्त उंचीवर आहेत. मंदिराच्या भिंतीवर भारतीय हिंदू धार्मिक ग्रंथातील अनेक प्रसंग, दृश्ये दर्शवण्यात आली आहेत. अप्सरांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे, दानव आणि देव यांच्यातील समुद्रमंथनाचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये तत्कालीन सम्राट, बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्रमंथन, देव-दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण आणि रामायण यांच्याशी संबंधित अनेक दगडी चित्रे आहेत. इथल्या रॉक पेंटिंगमध्ये चित्रित केलेली राम कथा अगदी थोडक्यात आहे. या रॉक पेंटिंगची मालिका रावणाच्या वधासाठी देवतांनी केलेल्या पूजेपासून सुरू होते. त्यानंतर माता सीता स्वयंवराचे दृश्य कोरण्यात आला आहे. दुसऱ्या एका रॉक पेंटिंगमध्ये प्रभू राम धनुष्यबाण घेऊन हरीण मागे धावताना दिसतात. यानंतर प्रभू राम यांची सुग्रीवाशी मैत्री झाल्याचे दृश्य आहे. त्यानंतर, बळी आणि सुग्रीव यांच्यातील द्वंद्व चित्रण केले आहे. आणखी एका रॉक पेंटिंगमध्ये अशोक वाटिकेत हनुमानाची उपस्थिती, राम-रावण युद्ध, माता सीतेची अग्निपरीक्षा आणि प्रभू रामाचे अयोध्येत परतले या दृश्यांचे चित्रण दाखवण्यात आले आहेत. नंतर, अंगकोर वाटच्या मंदिरावर बौद्ध धर्माचा  प्रभाव पडला. त्यात बौद्ध भिक्खू राहत असत, असे म्हटले जाते.
हे मंदिर बराच काळ अज्ञात राहिले. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री महाउत यांच्यामुळे १९ व्या शतकाच्या मध्यात अंगकोर वाट मंदिर पुन्हा प्रकाशझोतात आले. १९८६ ते १९९३ या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली.
पर्यटक येथे केवळ वास्तुशास्त्राचे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठीच येत नाहीत तर येथील सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही येथे येतात.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...