Friday, December 15, 2023

मकर संक्रांत आणि पर्यावरण

भारतातील प्रत्येक सणामागे शास्त्रीय आधार आहे. अनेक सण पर्यावरणाशी निगडित असून पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. पर्यावरणातील निसर्गासोबत नात्यांचा गोडवा जपणारा सण म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक वर्षी नवी उमंग आणि उल्हासचा संचार करत अनेक आशांनी भरलेला नव्या वर्षातील हा पहिला सण होय. आशा आणि गोडवा जपत अनेक दु:खाचे प्रसंग विसरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तीळगुळ, मिठाई एकमेकांना आदानप्रदान करतो. त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो. या पर्वावर तीळ आणि गुळापासून बनलेले खाद्यपदार्थ एकमेकांना दिले जातात, ज्यामुळे नात्यांमधले गुंफण आणि मधुरता दोन्ही वाढवण्यासाठीची क्षमता मकर संक्रातीमध्ये आहे. त्याचबरोबर, मकर संक्रांतीचा सण कायमचा लक्षात राहावा, यासाठी हा सण पर्यावरणाच्या दृष्टीनेही साजरा केला तर निसर्गाचे संरक्षण करण्यास ते खूपचं उत्तम ठरेल.


निसर्गासाठी संवेदनशीलता

काळाच्या ओघात हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला गेला तर? समाज आणि निसर्ग या दोघांचाही फायदा होऊ शकतो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजा करतात. यामध्ये आणखी एक गोष्ट करता येईल, ते म्हणजे मातीच्या कुंड्यांमध्ये सुंदर फुले, रोपांची लागवड केली तर? ही फुले, रोपे, झाडे आपल्याला उपयोगी तर पडतीलच. शिवाय ते आपल्याला नेहमी मकर संक्रातीच्या सणाची आठवण करून देतील. शिवाय, वेली, फुले, रोपांमुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढून पर्यावरण नक्कीच निरोगी होईल.

आपले हे छोटे प्रयत्न पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरेल. असा छोटासा प्रयत्नदेखील पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करेल. शिवाय, हीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाईल आणि यामुळे अनेक झाडे, वनस्पतींचे संरक्षण होईल. निसर्गाच्या संरक्षणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न देखील कितीतरी मोठ्याने पर्यावरण राखण्यास मदतीस कारणीभूत ठरू शकेल. घरातील इतर मुलींना,  महिलांनादेखील झाडांबद्दल आत्मीयता टिकून निसर्गप्रेम वाढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. वनस्पती, झाडांबद्दल आपण संवेदनशील होणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुन्हा पर्यावरणाचे संरक्षण अधिक मजबूतीने करण्यास आपण यशस्वी ठरू शकतो. आज निसर्गाच्या जवळ जाणे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनीच अनुभवले आहे.
मुळात संक्रांतीच्या काळात घरातील मुले आकाशात पतंग उडवतात. यावेळी मुलांना संक्रांतीच्या महत्वासोबतच निसर्ग, पर्यावरणाचेही महत्त्व मुलांना पटवून द्यायला हवे. अखेर, निसर्गाचे संरक्षण पिढीजातपणे त्यांच्याकडूनच घडणार आहे.

सांस्कृतिक वारसा निसर्गाशी जोडलेला

मकर संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे. यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला प्रार्थना करतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण तसा निसर्गाशी संबंधित तर आहे. कारण, जे मोसमी अन्नपदार्थ उपलब्ध होते, ते उष्ण पदार्थ असतात. हे पदार्थ खाण्यावर आपण अधिक भर देतो. हिवाळा ऋतूतील मकर संक्रांतीला आपण, रेवडी, तीळगूळ, गुळाच्या वड्या, आलेपाक, तीळाच्या वड्या, रेवडी आदानप्रदान करतो. मकर संक्रांतीला तीळगूळ वाटायची प्रथा महाराष्ट्रात आहे.

मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा काळ थंडीचा असल्याने तीळ आणि गूळ, शेंगदाणे चिक्की, तिळाचे लाडू खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. शरीर उष्ण राहून त्वचा सुंदर आणि टवटवीत राहण्यास मदत मिळत असते. यामुळे या दिवशी आवर्जून तीळगुळ वाटला जातो. काटेरी हलव्याचे दागिने महिला परिधान करतात. यामुळे घरोघरी तीळ, गूळ खरेदी करून गृहिणी तीळगूळ बनवत असतात.

काय आहे मकर संक्रांती?

ज्योतिषानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. सूर्याची एक राशीतून दुसऱ्यात प्रवेश करण्यास संक्रांती म्हणतात. संक्रांतीचा अर्थ संक्रमण अर्थात प्रवेश करणे असे आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या काळास ‘मकर संक्रांती’ म्हटलं जातं. मकर संक्रातीच्या पर्वाला काही वेळा उत्तरायण देखील म्हटलं जातं. यादिवशी गंगा स्नान करण्याची, व्रत, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख लीप वर्षात १५ जानेवारीला येते अन्यथा ते १४ जानेवारीला येते.

मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. नेपाळमध्ये खूप धामधुमीत  साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखलेजाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती म्हटले जाते. मकर संक्रांतीला तामिळनाडूमध्ये पोंगलच्या रूपात साजरं केलं जातं. कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये यास ‘संक्रांती’ म्हणतात. आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात अशा विविध नावांनी ओळखले जातात. याच दिवशी विविध राज्यात गंगा नदी किनारी माघ मेळा वा गंगा स्नानचे आयोजन केले जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते माघ मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे.

भौगोलिक महत्व

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूप पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायन पेक्षा अधिक शुभ मानला जातो. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये प्रवेश करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. या संक्रमणाच्या आधीपासूनच हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो. थंडीमध्ये ऊबदार आणि संक्रांतीला काळे कपडे वापरले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. या काळात शरीराला उर्जेची गरज असते. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात.

तसेच शरीराला आहारातून ऊर्जा मिळावी, यासाठी संक्रांतीला तीळापासून बनवलेले पदार्थ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर करतात. तीळ वापरण्यात दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करून एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात. 

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...