Sunday, December 31, 2023


केंद्रीय मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ या  अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गांव पाटगाव’ कास्य पदकाने सन्मानित झाले. ‘मधाचे गाव’ ह्या उद्योगामुळे हे पाटगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) राज्याच्या चर्चेत आले. येथे कित्येक दशकापासून मधाचा व्यवसाय चालत आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे मध उत्पादनात घट झाली होती.पण अलिकडच्या काळात राज्य शासनाने विशेष लक्ष दिल्याने ही उत्पादन वाढले आहे. वर्षाला दोन कोटी रुपयाचा वीस हजार किलो मध पाटगावातून उत्पादित होतो.तसेच पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या या प्रयत्नांची दखल आता देश पातळीवरही घेतली जात आहे. हे केंद्र नाबार्डच्या शेती उत्पादक संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करणारी ही मध उत्पादक शेती संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे.


कोणतेही भेसळ नसलेला येथील मध "औषधी मध म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी पाच ते सात टनापर्यंत मध निर्मिती या परिसरात करण्यात येते. यामुळेच या भागातील शेतकऱ्यांची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आता पाटगावच म्हणजे मधाचे गाव म्हणून गेल्या काही वर्षात नकाशावर आले आहे. ग्रामीण भागासाठी व राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली होती.
 
    संस्थात्मक पातळीवर बाजारात ‘पाटगाव’ ह्या नावानेच मधाचा स्वतंत्र ब्रँड देशभर आणि जगभर पोहोचेल या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. मधाची आधारभूत किंमत ठरविली जाणार आहे.  मध उत्पादनातील प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याचा प्रशासन भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानुसार ही  मधपाळांची शेती संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेद्वारे परिसरात कॉमन फॅसिलिटी सेंटर चालवले जाणार आहे. त्याद्वारे मध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होतील. याबरोबरच जीआय टॅगिंग आणि ट्रेडमार्कची प्रक्रियाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

मधाचे उत्पादन,मध संस्थेची देखभाल, तसेच प्रशिक्षण,अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. मधाचे ब्रँडिंग व मधासाठी बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती  या यंत्रणेतून मिळत आहे. यासाठी मध संस्थेला 10 लाखाचे अनुदानही उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर पाटगाव आणि परिसरातील 100 जणांना केंद्र शासनाच्या ‘बी’ किपिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून ‘बी ब्रिडिंग’चे प्रशिक्षण दिले गेले आहे.या वर्षी  पाटगावसह परिसरातील शिवडाव, आंतुर्ली, पाळ्याचाहुडा, मठगाव अशा जवळच्या वाड्यावस्त्यांवर 286 मधपाळांकडे सुमारे 20 हजार किलो मध उत्पादन झाला आहे. यासाठी  खादी व ग्रामोद्योग मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती अंशू सिन्हा, महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो  संदेश जोशी,  जिल्हा खादी व ग्रामद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे आदिंचे सहकार्य लाभले आहे.    

      शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणार्‍या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.   सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येऊन याठिकाणी तयार होणार्‍या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्याची वाटचाल सुरू आहे.

मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता शासकीय पातळीवर काम चालू आहे. मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे.

   पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देणे, आवश्यक कर्ज पुरवठा करणे यासाठी तसेच पाटगावसह इतर  ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...