Thursday, December 28, 2023

लाकूड उद्‌योगातील टिंबर मर्चेंट संदीप पाटील



संदीप पाटील हे कोल्हापुरातील लाकूड व्यावसायिक आहेत. लाकडापासून तयार केलेली अनेक उत्पादने त्यांच्याकडे विक्री होतात. संदीप पाटील यांच्या उद्योगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मागणी तसा पुरवठा केला जातो. अख्ख्या टिंबर मार्केटमध्ये कोणत्याही ग्राहकाला कोणतीही वस्तू तयार करून हवी असेल तर संदीप पाटील यांचेच नाव पुढे येते. विशेष म्हणजे कोल्हापूरमधील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सोन्याने मढवलेली जी मूळ लाकडी पालखी आहे, ती संदीप पाटील यांनी बन‌वलेली आहे. संदीप पाटील- यांच्या कामाची ख्याती इतकी झालेली आहे की, वूडवर्कमधील कोणतेही काम असो, संदीप पाटील यांच्या निर्मला- एन्टरप्रायझेस टिंबर मर्चट'चाच पुढाकार असतो. वडिलोपार्जित व्यवसाय संदीप पाटील यांनी पुढे नेत आज लाकूड व्यवसायात खूप लोकप्रियता मिळवली आहे.


संदीप पाटील स्वत: 30 वर्ष या उद्योगात कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल येथे झाले असून बी. कॉम पर्यंत पदवीचे शिक्षण झाले आहे. वडिलोपार्जित लाकूड व्यवसाय असतानाही संदीप यांनी शालेय जीवना पासून सायकलवरून प्रवास करत कारखान्यातील काम शिकून घेतले आणि शिक्षणही पूर्ण केले.


संदीप पाटील यांचे वडील रघुनाथ पाटील हे मुळात या लाकूड व्यवसायात होते. मुंबईच्या एका व्यक्तीला इलेक्ट्रिक वायर फिटिंगसाठी वूडन केसिंग कॅपिंगची आवश्यकता होती. त्यांच्या गरजेनुसार संदीप पाटील यांचे आजोबा सखाराम रामजी पाटील यांनी आपली दीन मुले १) त्रिंबक २) आनंदराव ३) रघुनाथ यांच्याशी विनिमय करून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९६२-६ ३ मध्ये शिवाजी पेठ माळी गवळी येथे भाड्याच्या जागेत एक वर्कशॉप-दत्त इलेक्ट्रिक केसिंग ब्लॉक वर्कस सुरू केलं. धेये वूडन स्वीचबोर्ड, सनमायका वोर्ड, केसिंग कॅपिंग, वूडन बॅटन यांचं उत्पादन सुरू केलं. त्यासाठी लागणारे सर्व कच्चे लाकूड दांडेली (कर्नाटक) येथून आणलं जायचं. ते उच्च प्रतीचे लाकूडे (सागवान) असायचे.


त्याचवेळी कामाच्या दर्जामुळे अल्पावधीतचं उद्योग भरभराटीस आला १९७२ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेने स्वतंत्र टिंबर मार्केट वसवले. पाटील यांनी शिवाजी पेठेतून टिंबर मार्केट येथे वर्कशॉप शिफ्ट केलं. १९२६ पर्यंत स्वीच बोर्डचे काम इतके प्रसिद्ध झाले की, शासनाच्या सार्वजनिक बांधकामाच्या विभागामध्ये च्या निविदामध्ये दत्त मेक स्वीच बोर्ड वापरावे, असे आवाहन किंवा सूचना छापली जायची. एका स्वीच बोर्डपासून सुरु झालेले काम लाकूड व्यवसायात बदलने ग्राहकांची गर्दी होऊ लागली अन् १५-१५ दिवस ग्राहकांना मालाची वाट पाहावी लागायची.


ऑर्डर दिल्यानंतर १५ दिवस वाट पाहावी लागायची. संदीप पाटील यांचे वडील रघुनाथ पाटील यांनी जोडव्यवसाय म्हणून चौकटी, खिडक्या तयार करणे, हा नवा उद्‌योग सुरु केला. उच्च प्रतीचे लाकूड वापरून ऑर्डरप्रमाणे माल तयार करून दिला जायचा. वर्कशॉपसाठी जागादेखील मोठी मिळाली होती. अल्पावधीतचं जोड व्यवसायालादेखील यश मिळाले. कामात भरभराट झाली. उच्च दर्जाचं उत्पादन, कुठलीही फसवणूक नाही, ग्राहकांशी मैत्रीपूर्ण संबंधामुळे ग्राहकांची विश्वासाहर्ता जपली गेली. लाकूड व्यवसायातील विविध उत्पादनांची मागणी वाढत गेली. रघुनाथ पाटील यांनी लाकूड व्यवसाय पुढे सुरूच ठेवला. भविष्यकाळात त्यांचा मुलगा संदीप पाटील यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेला. सध्या संदीप पाटील हे निर्मला एन्टरप्रायझेस (टिंबरमर्चट) नावाने व्यवसाय - उद्‌योग पाहत आहेत. 

कुठल्याही प्रकारचं काम कितीही अवघड आणि आव्हानात्मक असो, ते केवळ संदीप पाटील यांच्या कारखान्यात करून मिळते. नंतर १९९५ पासून निर्मला एन्टरप्रायझेजस नावाने कारखाना संदीप पाटील यांनी त्याच जागेत सुरू केला.
लाकडाचे दरवाजे, लाकडी खिडक्या, शटर्स, वूडन आणि सनमायका बोर्ड्स, सर्व फर्निचर वर्क, कार्विंग वर्क आणि मोल्डिंग, कडीपाट (झोपाळा), पाळणे, चौकटी, चौरंग, पाट, देव्हारे अनेक प्रकारचा लाकडी उत्पादने संदीप पाटील यांच्या उद्योग व्यवसायात तयार केल्या जातात. शिवाय मंदिरातील लागणाऱ्या देवाच्या पालख्या तयार केल्या जातात.


विशेष म्हणजे, अंबाबाई मंदिरात सोने चढवलेली जी पालखी आहे; ती मूळ लाकडी पालखी संदीप पाटील यांनी बनवली आहे.


घरचा उद्‌योग असल्याने सर्व प्रशिक्षण थेट कारखान्यातून संदीप पाटील यांनी घेतले. सध्या ऑनमशीन चार कामगार आहेत. ऑफमशीन (हाताने काम करणारे) सुताराच्या ३  जोड्या आहेत. तसेच फर्निचर करणाऱ्या जोड्‌या काम करतात. कामगार परंपरागत काम करत आहेत. यामध्ये परंपरेतून शिकलेले, फर्निचर वाले शिकून आलेले कामगार आहेत.

चौरंग पाच हजार रुपयांपासून पस्तीस हजारपर्यंत, पालखीची किंमत सरासरी सव्वा लाख (आकारानुसार किंमत बदलते) असते. संदीप पाटील यांनी आतापर्यंत पंचवीसहून अधिक पालख्या बनवल्या. त्या विविध मंदिरात पाठवल्या गेल्या. रोज सकाळ ते संध्याकाळ - पर्यंत काम सुरू असतं. एकदिवसदेखील कामामध्ये ख्वाडा पडत नाही.


संदीप पाटील यांच्या निर्मला एन्टरप्रायझेसची वार्षिक उत्माढाल सुमारे ७० लाख रुपये होते.

लाकूड व्यवसायातील उत्पादनासाठी मध्यप्रदेश सीमेवरील भागातून, चंद्रपूर, परतवाडा या भागातून तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून सागवान येते. या लाकडांचा दर्जा चांगला असतो. कर्नाटकातील दांडेली येथून आता कमी प्रमाणात लाकूड येते. कारण, कर्नाटकातून महाराष्ट्रात लाकूड आणण्यासाठी ४० टक्के कर भरावा लागतो.


७०-८० टक्के अगदी उच्च दर्जाचं नाकूड आफ्रिकन देशातून येत. त्यांचं उत्पादन खास प्रयत्न करून ठेवलं जातं. कलाकुसरीच्या कामासाठी सागवान वापरलं जातं. त्या खालोखाल जंगलवूड, आकेशिया, नाना, आंबा, बाभूळ, लिंबाचे लाकूड महाराष्ट्रातून येत. ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड येथून पाईन आणि देवदारांचं लाकूड येत. लाकूड खासगी व सरकारी कंपन्यांकडून येत. हे लाकूड गुजरातच्या कांडला बंदर, बंगळुरू बंदर, मुंबई बंदर येथे जहाजांमधून आणलं जातं. तेथून थेट कोल्हापुरात आणले जाते.


संदीप पाटील यांच्याकडे विविध उत्पादनांसाठी एकूण ९ मशिन्स उपलब्ध आहेत. ती मुंबई, गुजरात आणि पंजाब येथून आणली आहेत. एकूण १० हजार चौरस फूट जागेत संदीप यांचा कारखाना उभा आहे. लाकूड व्यवसायात प्रामुख्याने गुजरात मधील कच्छी-पटेल संपूर्ण भारतात आहेत. पण मराठी बांधवांपैकी खूप कमी लाकूड उद्‌योगात असणारे व्यापारी आहेत.


संदीप पाटील यांचे संपूर्ण, कोल्हापूर जिल्हयात ग्राहक आहेत. त्याचसोबत ते फर्निचरचे काम देखील करतात. अनेक घरांचे । दुकानांचे फर्निचर काम त्यांनी केलेले आहे. मुंबई, पुणे, सातारा, सावंतवाडी, सांग‌ली, रत्नागिरी, सांगोला अशा विविध जिल्हयांमध्ये जाऊन तसेच गोव्यातदेखील फर्निचरची काम केलेली आहेत.

संदीप पाटील - मोबाईल क्रमांक 9421203645

ईमेल - sandeepnirmala.patil@gmail.com

Friday, December 15, 2023

मकर संक्रांत आणि पर्यावरण

भारतातील प्रत्येक सणामागे शास्त्रीय आधार आहे. अनेक सण पर्यावरणाशी निगडित असून पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. पर्यावरणातील निसर्गासोबत नात्यांचा गोडवा जपणारा सण म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक वर्षी नवी उमंग आणि उल्हासचा संचार करत अनेक आशांनी भरलेला नव्या वर्षातील हा पहिला सण होय. आशा आणि गोडवा जपत अनेक दु:खाचे प्रसंग विसरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तीळगुळ, मिठाई एकमेकांना आदानप्रदान करतो. त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो. या पर्वावर तीळ आणि गुळापासून बनलेले खाद्यपदार्थ एकमेकांना दिले जातात, ज्यामुळे नात्यांमधले गुंफण आणि मधुरता दोन्ही वाढवण्यासाठीची क्षमता मकर संक्रातीमध्ये आहे. त्याचबरोबर, मकर संक्रांतीचा सण कायमचा लक्षात राहावा, यासाठी हा सण पर्यावरणाच्या दृष्टीनेही साजरा केला तर निसर्गाचे संरक्षण करण्यास ते खूपचं उत्तम ठरेल.


निसर्गासाठी संवेदनशीलता

काळाच्या ओघात हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला गेला तर? समाज आणि निसर्ग या दोघांचाही फायदा होऊ शकतो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजा करतात. यामध्ये आणखी एक गोष्ट करता येईल, ते म्हणजे मातीच्या कुंड्यांमध्ये सुंदर फुले, रोपांची लागवड केली तर? ही फुले, रोपे, झाडे आपल्याला उपयोगी तर पडतीलच. शिवाय ते आपल्याला नेहमी मकर संक्रातीच्या सणाची आठवण करून देतील. शिवाय, वेली, फुले, रोपांमुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढून पर्यावरण नक्कीच निरोगी होईल.

आपले हे छोटे प्रयत्न पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरेल. असा छोटासा प्रयत्नदेखील पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करेल. शिवाय, हीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाईल आणि यामुळे अनेक झाडे, वनस्पतींचे संरक्षण होईल. निसर्गाच्या संरक्षणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न देखील कितीतरी मोठ्याने पर्यावरण राखण्यास मदतीस कारणीभूत ठरू शकेल. घरातील इतर मुलींना,  महिलांनादेखील झाडांबद्दल आत्मीयता टिकून निसर्गप्रेम वाढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. वनस्पती, झाडांबद्दल आपण संवेदनशील होणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुन्हा पर्यावरणाचे संरक्षण अधिक मजबूतीने करण्यास आपण यशस्वी ठरू शकतो. आज निसर्गाच्या जवळ जाणे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनीच अनुभवले आहे.
मुळात संक्रांतीच्या काळात घरातील मुले आकाशात पतंग उडवतात. यावेळी मुलांना संक्रांतीच्या महत्वासोबतच निसर्ग, पर्यावरणाचेही महत्त्व मुलांना पटवून द्यायला हवे. अखेर, निसर्गाचे संरक्षण पिढीजातपणे त्यांच्याकडूनच घडणार आहे.

सांस्कृतिक वारसा निसर्गाशी जोडलेला

मकर संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे. यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला प्रार्थना करतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण तसा निसर्गाशी संबंधित तर आहे. कारण, जे मोसमी अन्नपदार्थ उपलब्ध होते, ते उष्ण पदार्थ असतात. हे पदार्थ खाण्यावर आपण अधिक भर देतो. हिवाळा ऋतूतील मकर संक्रांतीला आपण, रेवडी, तीळगूळ, गुळाच्या वड्या, आलेपाक, तीळाच्या वड्या, रेवडी आदानप्रदान करतो. मकर संक्रांतीला तीळगूळ वाटायची प्रथा महाराष्ट्रात आहे.

मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा काळ थंडीचा असल्याने तीळ आणि गूळ, शेंगदाणे चिक्की, तिळाचे लाडू खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. शरीर उष्ण राहून त्वचा सुंदर आणि टवटवीत राहण्यास मदत मिळत असते. यामुळे या दिवशी आवर्जून तीळगुळ वाटला जातो. काटेरी हलव्याचे दागिने महिला परिधान करतात. यामुळे घरोघरी तीळ, गूळ खरेदी करून गृहिणी तीळगूळ बनवत असतात.

काय आहे मकर संक्रांती?

ज्योतिषानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. सूर्याची एक राशीतून दुसऱ्यात प्रवेश करण्यास संक्रांती म्हणतात. संक्रांतीचा अर्थ संक्रमण अर्थात प्रवेश करणे असे आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या काळास ‘मकर संक्रांती’ म्हटलं जातं. मकर संक्रातीच्या पर्वाला काही वेळा उत्तरायण देखील म्हटलं जातं. यादिवशी गंगा स्नान करण्याची, व्रत, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख लीप वर्षात १५ जानेवारीला येते अन्यथा ते १४ जानेवारीला येते.

मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. नेपाळमध्ये खूप धामधुमीत  साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखलेजाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती म्हटले जाते. मकर संक्रांतीला तामिळनाडूमध्ये पोंगलच्या रूपात साजरं केलं जातं. कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये यास ‘संक्रांती’ म्हणतात. आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात अशा विविध नावांनी ओळखले जातात. याच दिवशी विविध राज्यात गंगा नदी किनारी माघ मेळा वा गंगा स्नानचे आयोजन केले जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते माघ मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे.

भौगोलिक महत्व

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूप पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायन पेक्षा अधिक शुभ मानला जातो. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये प्रवेश करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. या संक्रमणाच्या आधीपासूनच हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो. थंडीमध्ये ऊबदार आणि संक्रांतीला काळे कपडे वापरले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. या काळात शरीराला उर्जेची गरज असते. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात.

तसेच शरीराला आहारातून ऊर्जा मिळावी, यासाठी संक्रांतीला तीळापासून बनवलेले पदार्थ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर करतात. तीळ वापरण्यात दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करून एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात. 

Friday, December 8, 2023

खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर

 शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 

कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये

या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 

उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.

मंदिरात २ शिवलिंग

गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 

Image result for khidrapur temple

मंदिर परिसरात १२ शिलालेख

मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 

दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 

Image result for khidrapur temple

मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  

मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 

मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 

सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 

पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 

‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 


खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 

एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 

हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 

'मंदिरात विजेची सोय व्हावी' 

कोपेश्वर मंदिरात विजेची सोय व्हावी, तसेच मंदिराचे संवर्धन व्हावे. पर्यटकांना राहण्याची सोय व्हावी. त्याचप्रमाणे, प्रशासनाने प्रसाधनगृहाची सोय करणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी खासगी वाहने नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अडचणीचे ठरते. 

- प्रा. शशांक रामचंद्र चोथे, इतिहास अभ्यासक

Tuesday, December 5, 2023

कंबोडिया

 भारताला समृद्ध परंपरांचा इतिहास आहे. भारताच्या समृद्ध वैभवशाली इतिहासात मंदिरांना नन्यसाधार महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजही जगभरात अनेक देशांमध्ये पसरली आहे. भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक कथा आणि वारसा आजही जगभरात पाहायला मिळतात, जिथे मंदिरांच्या माध्यमातून ते पतित होतात. प्राचीन काळापासून अनेक मंदिरांची  निर्मिती झालेली आहे. पण, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठे मंदिर हे कंबोडिया देशात आहे. कंबोडियात स्थित असलेले अंग्कोर वाट हे इटलीतील ज्वालामुखी शहर पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. आठव्या  आश्चर्याची मान्यता  एक अनौपचारिक मान्यता आहे, जी नवीन इमारती, नवीन प्रकल्प आणि डिझाईन्सना प्रदान केली जाते. अंग्कोर वाट येथील वास्तूकला जगातील सर्वात अद्वितीय आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  


भारतात मंदिरांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात मंदिरे आहेत. कंबोडियातील अंग्कोर वाट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचा इतिहास ८०० वर्षांहून अधिक जुना आहे. कंबोडियातील अंगकोर वाट मंदिराची एक एक वास्तूकला आश्चर्यात टाकणारी आहे. वास्तविक, अंग्कोर वाट १२व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीयने ३० वर्षांच्या कालावधीत निर्माण केल्याचे म्हटले जाते. हे एक विशाल मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. १९९२ मध्ये जागतिक स्थळात या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

कंबोडिया एकेकाळी 'कंपुचिया' म्हणून ओळखले जात होते आणि ते शक्तिशाली हिंदू आणि बौद्ध साम्राज्यांसाठी ओळखले जात होते. अंग्कोरथोम आणि अंगकोर वाट या प्राचीन कंबुज देशाच्या राजधानी होत्या. मान्यतेनुसार, या राज्याचा संस्थापक कौंडिण्य ब्राह्मण होता, त्याचे नाव तेथील संस्कृत शिलालेख मध्ये आढळते. ९ व्या शतकात, जयवर्मा तिसरा कंबुजचा राजा झाला आणि त्याने सुमारे ८६० इ.स.मध्ये अंकोर्थम नावाची राजधानी सुरू केली, जी सुमारे ४० वर्षात बांधली गेली आणि ९०० इ.स. च्या सुमारास पूर्ण झाली. कंबुज साहित्यातही त्याच्या बांधकामाबाबत अनेक प्रसंग आढळतात.

थोम याचा अर्थ राजधानी असा होय. या मंदिरांच्या भारतीय गुप्त कलेचा प्रभाव असल्याचे दिसते. अंग्कोर वाटची मंदिरे, तोरण आणि शिखरे यांची सजावट गुप्त कला दर्शवते. मंदिरातील एका शिलालेखावरून असे दिसून आले आहे की, यशोधरपूरचा संस्थापक राजा यशोवर्मा हा विद्वान, हस्तकला, भाषा, लिपी आणि नृत्यात निपुण होता. अंग्कोरथोम  व्यतिरिक्त, त्याने कंबुज राज्यातील अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले, जेथे रामायण, महाभारत, पुराण आणि इतर भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास शिकवला गेला. अंगकोर वाटच्या हिंदू मंदिरांवर नंतर बौद्ध धर्माचा खोलवर प्रभाव पडला आणि नंतर तेथे बौद्ध भिक्षूंनी वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते.

अंग्कोर वाट हे १६२.६ हेक्‍टर जागेत पसरलेले आहे. अंग्कोरचे जुने नाव 'यशोधरपूर' होते. हे सम्राट सूर्यवर्मन द्वितीयने (१११२-५३ AD) च्या काळात बांधले होते. मेकाँग नदीच्या काठावर सिम्रीप शहरात हे मंदिर असून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. अंगकोर वाटचे मध्यवर्ती संकुल तीन मजली आहे. येथे, मंदिराच्या मध्यभागी एक ६५ मीटर उंच टॉवर आहे, जो चार लहान टॉवरांनी वेढलेला आहे. या मंदिरात वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान विष्णूची ३.२ मीटर उंचीची मूर्तीही स्थापित आहे. अंग्कोर वाट हे २ किलोमीटर परिसरात पसरलेले असून लांबी ७०० फूट आहे. या मंदिराच्या बाहेर विशाल खोल दरी आहे आणि पार करम्याासठी पूल आहे. मंदिर परिसरात पाच कमळाच्या आकाराचे टॉवर आहेत, जे माऊंट मेरुचे प्रतिक आहेत. किंबहुना, मंदिराची सुंदर वास्तुकला हे जगातील आठवे आश्चर्य बनवते. कंबोडियाचे हे मंदिर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नेदेखील जगातील सर्वात मोठे धार्मिक संरचना मानली आहे.

खमेर शास्त्रीय स्थापत्य शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो. हे मंदिर सूर्यवर्मन द्वितीय /e; भाचा, त्याचा उत्तराधिकारी धरणीन्द्र वमर्नने पूर् केलं होतं. इजिप्त व मेक्सिकोच्या स्टेप पिरॅमिडप्रमाणे पायऱ्या किंवा सिडीप्रमाणे बांधकाम सून मूळ शिखर जवळपास ६४ मीटर उंच हे. इतर आठ शिखर ५४ मीटर उंच आहेत.  स्थानिक लोकांमध्ये या मंदिराबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजातही स्थान देण्यात आले आहे.
विद्वानांच्या मते ते चोल वंशाच्या मंदिरांसारखे आहे. या मंदिरात दक्षिण-पश्चिमेला तीन गॅलरी आहेत, आतील गॅलरी जास्त उंचीवर आहेत. मंदिराच्या भिंतीवर भारतीय हिंदू धार्मिक ग्रंथातील अनेक प्रसंग, दृश्ये दर्शवण्यात आली आहेत. अप्सरांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे, दानव आणि देव यांच्यातील समुद्रमंथनाचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये तत्कालीन सम्राट, बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्रमंथन, देव-दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण आणि रामायण यांच्याशी संबंधित अनेक दगडी चित्रे आहेत. इथल्या रॉक पेंटिंगमध्ये चित्रित केलेली राम कथा अगदी थोडक्यात आहे. या रॉक पेंटिंगची मालिका रावणाच्या वधासाठी देवतांनी केलेल्या पूजेपासून सुरू होते. त्यानंतर माता सीता स्वयंवराचे दृश्य कोरण्यात आला आहे. दुसऱ्या एका रॉक पेंटिंगमध्ये प्रभू राम धनुष्यबाण घेऊन हरीण मागे धावताना दिसतात. यानंतर प्रभू राम यांची सुग्रीवाशी मैत्री झाल्याचे दृश्य आहे. त्यानंतर, बळी आणि सुग्रीव यांच्यातील द्वंद्व चित्रण केले आहे. आणखी एका रॉक पेंटिंगमध्ये अशोक वाटिकेत हनुमानाची उपस्थिती, राम-रावण युद्ध, माता सीतेची अग्निपरीक्षा आणि प्रभू रामाचे अयोध्येत परतले या दृश्यांचे चित्रण दाखवण्यात आले आहेत. नंतर, अंगकोर वाटच्या मंदिरावर बौद्ध धर्माचा  प्रभाव पडला. त्यात बौद्ध भिक्खू राहत असत, असे म्हटले जाते.
हे मंदिर बराच काळ अज्ञात राहिले. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री महाउत यांच्यामुळे १९ व्या शतकाच्या मध्यात अंगकोर वाट मंदिर पुन्हा प्रकाशझोतात आले. १९८६ ते १९९३ या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली.
पर्यटक येथे केवळ वास्तुशास्त्राचे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठीच येत नाहीत तर येथील सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही येथे येतात.

Friday, December 1, 2023

असे एक शिव मंदिर ज्याच्या पायऱ्यांमधून येते जादुई संगीत

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध सोमनाथ मन्दिर मंदिराचे रहस्य कुणी समजू शकलेले नाही. सोमनाथ मंदिराची वास्तुकला इतकी रहस्यमय आहे की, जो कुणी पाहिल तो आचंबित राहतो. हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. येथील मंदिरांच्या पायऱ्या अद्भूत तर आहेतच. शिवाय याच पायऱ्यांमधून येणारा गूढ संगीताचा आवाज त्याहून कमालीचे आहे. द्रविड वास्तुकलेती एक उत्तम नमूना आणि चोल साम्राज्यातील ‘द ग्रेट लिविंग टेंपल्स’ पैकी एक ऐरावतेश्वर मंदिर आहे. हे मंदिर तामिळनाडूतील कुंभकोणमजवळ दारासुरम येथे स्थित आहे.

असे म्हटले जाते की, हे मंदिर १२ व्या शतकात चोल राजा द्वितीयने बनवलं होतं. हे मंदिर महान जीवंत चोल मंदिरांच्या रूपातही ओळखले जाते. युनेस्‍कोने हे मंदिर जागतिक वारसा स्थळ देखील घोषित करण्यात आलं आहे. ऐरावतेश्वर मंदिराच्या आत शिव मंदिर आहे, त्यास ऐरावतेश्वर नावाने ओळखले जाते. असे म्हटले जाते की, ऐरावत ऋषी दुर्वासाच्या श्रापाच्या कारणाने आपले रंग बदलल्यामुळे  मन खूप दु:खी होतं. त्यांनी या मंदिराच्या तलावातील पवित्र जलमध्ये स्नान करून आपले रंग पूर्वीप्रमाणे प्राप्त केलं. त्यास यमतीर्थम असेही म्हटले जाते.
मंदिराच्या आतील बाजूस एका खोलीत प्रतिमा आहे, ज्यात ऐरावतवर इंद्र बसले आहेत. अशी आख्यायिका सांगितली जाते की, राजा इंद्र देवाचा पांढरा हत्ती ऐरावतने भोलेनाथाची पूजा केली होती. यामुळे हे मंदिर ऐरात्श्वर नावाने ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार,  असे म्हटले जाते की, यमने देखील येथे शिव पूजा केली होती.
मंदिराची वास्तुकला अप्रतिम आहे. मंदिराची नक्षी भाविकांचे मन मोहून घेते. खासकरून येथील पायऱ्या. असे म्हटले जाते की, या पायर्या इतक्या सुंदरतेने बनवण्यात आल्या आहेत की, पायाचा थोडासा दाब दिला की, या पायऱ्यांमधून संगीताचे विविध ध्वनी ऐकू य़ेतात. तसेच सात आकाशीय देवींच्या मूर्तीदेखील येथे दृश्यास पडतात. खासकरून येथे तीन पायऱ्या या प्रकारे बनवण्यात आल्या आहे की, या पायर्यांवर गतीने पाय टाकल्यानंतर संगीताचे ध्‍वन‍ी प्रतीत होतात. त्याशिवाय, मंदिराच्या  अंगणात दक्षिण-पश्चिम दिशेत ४ तीर्थ एक मंडप आहे. त्यावर यमाची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
द्रविड वास्तुकलेत दगडांमध्ये बनवण्यात आलेल्या या मंदिरात सुंदर नक्षी दिसते. मंदिराची ८० फूट उंची आहे. मुख्य मंदिरासमोर मंडपचा  एक भाग दगडाच्या विशाल चाकाच्या एका रथासमान आहे. हे रथ घोडे ओढताना दिसते. ऐरावतेश्वर मंदिर चोल साम्राज्याचे दुसरे ‘लिव्हिंग टेंपल्स’ बृहदीश्वर आणि गंगईकोंडचोलीश्वरमपेक्षा उंचीने लहान आहे. पण ऐरावतेश्वरचा विस्तार मोठा आहे.

उदय भोसले - कारखान्यातील हेल्पर ते उद्योजक- तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी




उदय अण्णासाहेब भोसले हे कोल्हापुरातील एका कारखान्यात पाणी भरणे, सफाई करणे अशी छोटी-मोठी काम करत होते. शाळा आणि घरची जबाबदारी पेलवत त्यांनी आयटीआय देखील पूर्ण केले. उदय भोसले हे इथेच थांबले नाहीत. तर स्वत:चा कारखाना काढण्याचे स्वप्नदेखील पूर्ण केले. आज कोल्हापुरातील जुने जाणकार आणि नामवंत उद्योजकांपैकी ते एक आहेत. त्यांचा उद्योजकापर्यंतचा प्रवास कष्टमय तर आहेच पण तरुण उद्योजकांना प्रेरणादायी देखील आहे.
 विद्यापीठ हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उदय यांनी कळंबा आयटीआयमधून टर्नरचे प्रशिक्षण पूर्ण केले. आयटीआय शिकत असताना ते दुसरीकडे कारखान्यात छोटी-मोठी कामेदेखील करत असत.  उदय भोसले हे मुळचे सांगरुळ जवळ येथील आमशी गावचे. उदय यांचे आजोबा आप्पासाहेब भोसले यांना राजाराम महाराजांनी जमिन इनाम म्हणून दिली होती.  त्यातील एक जमिन आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे विकून बहिणींची लग्ने केली.

*हलाखीच्या परिस्थिती नंतरही खंबीरपणे उभारले * 

आजोबांच्या निधनानंतर उदय यांचे वडील गाव सोडून कोल्हापुरात स्थायिक झाले. लक्ष्मीपुरी मध्ये वास्तव्य करू लागले. पुढे ते उद्यमनगर येथे राहायला गेले. उदय यांचे वडील अण्णासाहेब भोसले हे लक्ष्मीपुरीतील एकेकाळचे प्रसिद्ध चित्रपटगृह प्रभात आणि रॉयल टॉकीजचे मॅनेजर होते. १९७२ साली त्यांचा प्रभात टॉकीजचे बांधकाम सुरु असताना अपघात होऊन मृत्यू झाला. त्यावेळी उदय हे ९ वषार्चे होते. उदय यांच्या आई सुमित्रा अण्णासाहेब भोसले कष्टाची पराकष्टा करून आपल्या मुलांना वाढवले. उदय यांना सहा भावंडे. या भावंडांपैकी उदय हे चौथ्या क्रमांकाचे अपत्य. वडिलांच्या अपघातानंतर भोसले कुटुंबीयांना आप्तेष्टांनी थोडीफार मदत केली. पण थोडक्या मदतीवर आयुष्य चालणारे नव्हते.

*विविध मूतीर्ही विकल्या*

उदय यांनी बालपणापासूनच आपल्या कुटुंबीयांना घर चालवण्यासाठी मदत केली. गंगावेश येथील कुंभार गल्लीमध्ये कावडे यांचा बिझनेस असलेल्या लक्ष्मी अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम भोसले कुटुंबीयांनी हाती घेतले. यातून किरकोळ पैसे मिळायचे. तर उदय भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या मूर्ती दुकानांमध्ये जाऊन विकायचे. एका मूर्तीमागे पाच रुपयांचा नफा होत असे. शाळा शिकत शिकत ही कामे ते करत असत. दरम्यान, दुसऱ्या क्रमांकाची बहिण ललिता हीदेखील महाद्वार रोड निगवेकर प्रज्ञा क्लास येथे नोकरीला लागली. त्यामुळे घर चालण्यास थोडा हातभार लागला.  

*शाळा शिकत असताना कारखान्यात काम*

शाळा शिकत असताना  संजीवनी इंजिनिअर्स या कारखान्यांमध्ये जाऊन काम केले. संजीवनी इंजिनिअर्स या एकाच कारखान्यात हेल्पर म्हणून काम करताना १०५ रुपये पगार होता. शिरोली एमआयडीसी येथे आजही संजीवनी इंजिनिअर्सचे मोठे वर्कशॉप आहे. एकूण १० वर्षे एकाच कारखान्यात सायकलवरून ये-जा सुरु झाली. उदय यांनी हेल्पर मशीनवर काम करता करता ड्रिल मशीनवर काम करायला सुरुवात केली. कारखान्याच्या मालकांचा विश्वास इतका होता की, कारखान्याची किल्ली उदय यांच्याकडे देण्यात आली होती. पुढे हेल्पर ते लेथ मशीन कामगार असा प्रवास घडला. पुढे जाऊन कामगार ते उद्योजक असा परिपूर्ण प्रवास झाला.

दरम्यान, १९९१ साली उदय भोसले विवाह बंधनात अडकले. उदय यांनी लग्न व्हायच्या आधी सहा महिने आधी विचार केला की, आता आपण स्वत:चा कारखाना उभा करायचा. त्यानुसार, उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्स कारखान्याचे मालक उल्हास हसबनीस यांना नव्या कारखान्याची कल्पना सांगितली. उल्हास हसबनीस यांनीही उदय यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.

*कर्ज काढून मशीन घेतले * 

 संजीवनी इंजिनिअर्स सुरुवातीला उद्यमनगर आणि नंतर शिरोली एमआयडीसी येथे स्थापित झाला. उदय भोसले रोज उद्यमनगर ते शिरोली एमआयडीसी असा सायकलवरून प्रवास करत असत. त्यावेळी बसचा प्रवास देखील परवडत नसे. कारखान्याची नोकरी करता करता चहापुड विकण्याचा व्यवसाय देखील त्यांनी केला. उदय हे शिरोली एमआयडीसी येथे चहा विकाणाऱ्या गाड्यांना गद्रे चहापूड पुरवठा करत असत. त्यातून थोडाफार आर्थिक फायदा होत असे.

१९९२ रोजी १६०० रुपये पगार झाला होता, जेव्हा उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्सचे काम बंद करून आपला स्वत:चा व्यवसाय उभारला. विवाहाच्या आधी त्यांना १६००० रुपयांचे सेकंड हॅण्ड लेथ मशीन विकत घेतले. एका को-ऑपरेटिव्ह बँकेकडून १० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. वरील ६ हजार रुपयांची जमवाजमव करून लेथ मशीन खरेदी केले. उद्यमनगरात मित्राची जागा ३०० रुपये भाड्याने घेतली आणि उदय इंडस्ट्रीची स्थापना केली.

*धाडसाने सुरु केला कारखाना*

मशीन खरेदी केल्यानंतर ६ महिन्यात संजीवनी इंजिनिअर्सची नोकरी सोडली. पण त्याआधी नोकरी चालू असतानाचा स्वत : च्या लेथ मशीनवर कामावरून सायंकाळी आल्यानंतर प्रॅकिट्स केली. त्यावेळी उदय यांना आकांक्षा एंटरप्रायझेसचे मालक भाटवडेकर साहेब यांनी मदत केली. उदय यांनी आपल्या कारखान्याला काम मिळावे, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. उदय यांना भाटवडेकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला.

*एकाच कारखान्यात अनेक वर्षे नोकरी*

संजीवनी इंजिनिअर्स येथे मनुग्राफ कारखान्यासाठीची कामे केली जायची. मनुग्राफचे प्रोडक्ट बनवण्यात उदय भोसले यांचा हातखंडा होता. विश्वासू, चोख आणि परफेक्ट काम करणारे उदय भोसले यांची ओळख झाली होती. त्यामुळे मनुग्राफच्या साहेब लोकांशी उदय भोसले यांचे चांगले संबंध होते. उदय यांनी त्यांना काम देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा मनुग्राफने थेट उदय यांना व्हेंडर करून घेतले. तसे पाहता मोठे युनिट असल्याशिवाय कोणतीही कंपनी व्हेंडर करून घेत नाही. पण, उत्तम काम आणि विश्वास या जोरावर उदय सलग पाच वर्षे यांना मनुग्राफचे व्हेंडर होता आले.

*प्रसिद्ध मनुग्राफसाठी काम केलं*
 
मनुग्राफ यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्रिंटिंग मशीन युनिट होते. त्यांचे सर्व मशीन महाराष्ट्रात निर्यात व्हायचे. मनूग्राफचे काम संपुष्टात आल्यानंतर उदय भोसले यांनी प्रवीण सोनार कल्याणी ब्रेक्स या पुण्याच्या कंपनीशी ओळख होऊन संबंध चांगले प्रस्थापित झाले. त्या कंपनीसाठी १० वर्षे काम केले. गाड्यांच्या ब्रेक्स लाईनसर्चे व्हिल्स एंडरचे सॅम्पल बनवून देण्याचे काम त्यांनी केले. मित्रांचा ग्रुप तयार करून प्रोडक्शन सुरु केलं.

*आयटीआयचे विद्यार्थी कामासाठी येऊ लागले*

आयटीआयचे विद्यार्थी अॅप्रेंटिससाठी उदय भोसले यांच्या कारखान्यात येऊ लागले. हे विद्यार्थी शिकता शिकता कामेही करू लागली. संध्याकाळी चारनंतर याच उदय यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि होतकरू बनवले. हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या कंपनींचे मालक बनले आहेत. काही जणांनी कारखाना उभारला आहे.  

वारणा कोडोली येथील प्लामाज, कल्याणी ब्रेक्स, मनुग्राफ सोबत मेनन ऑटोमोबाईल यांचे प्रोडक्ट्स बनवले गेले. कोल्हापुरातील प्रसिद्द घाटगे पाटील, मेनन यांचे थर्ड पार्टी म्हणून उदय काम पाहू लागले. कारखान्यामध्ये जॉब वर्क्स व्हिल सिलेंडर्स, गेट वॉल, व्हॉल गार्ड, स्पेशल बोर्ड्स, प्रीटिंग मशीनचे प्रोडक्ट तयार केले जायचे. वयाच्या ६० व्या वर्षाही स्वत: उदय कारखान्यात काम करतात. अद्यापही उदय इंडस्ट्री हा कारखाना सुरु आहे. जीवात जीव असे पर्यंत कारखाना सुरु ठेवण्याचा उद्योजक उदय भोसले यांचा मानस आहे. 

Happy B'day Dhanush : साई पल्लवी ते राशी खन्नापर्यंत साऊथच्या अभिनेत्रींना धनुषची का आहे भूरळ?


साऊथ स्टार धनुषचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Happy B'day Dhanush) दक्षिणेत तर धनुषला प्रेक्षक चाहत्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. केवळ चाहतेच नाही तर त्याच्यासोबत अभिनय करणाऱ्या महिला सहकलाकार अभिनेत्रींनाहीदेखील त्याची भूरळ आहे. मग ती साई पल्लवी असो वा राशी खन्ना. धनुष किती मेहनती अभिनेता आहे, हे अभिनेत्री भरभरून सांगत असतात. तो सेटवर किती उत्साहाने, जोशपूर्ण काम करतो, आपल्या कामाबाबत किती गंभीर आणि दक्ष असतो, अनेक कौतुकाचे गोडवे अभिनेत्री गात असतात. (Happy B'day Dhanush)

असूर असो वा बॉलिवूडपट 'रांझना' मनाला भिडणारे चित्रपट देण्यात धनुषचा हातखंडा आहे. चित्रपटांतील भावस्पर्शी कथानकामुळे धनुषच्या अभिनयाला जोड मिळते. अनेकजण म्हणतात की, धनुष दिसायला खास नाही. म्हणून तो डल दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बसतो. पण, साऊथच्या प्रेक्षकाला दिसण्याशी काही संबंध नाही. कारण, धनुषकडे सुंदर दात आणि मनमोहक हास्य आहे. या द्वयींवर तो आपल्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांवर प्रभाव टाकतो.

एक प्रतिभावान, कष्टाळू अभिनेता जर प्रेक्षकांच्या समोर असेल तर त्यांना कशाचीच परवा नसते की, तो कसा दिसतो? काही चाहते तर म्हणतात की, त्याचे चित्रपट हिट होणार की नाही हे मला माहिती नसते, पण फक्त त्याच्यासाठी मी त्याचे सिनेमे पाहतो. कारण त्याचे कौशल्य आणि भव्य हास्यासमोर सर्व गोष्टी मागे पडतात. सुंदर तो आहे, जो सुंदर काम करतो. आणखी काही चाहते म्हणतात की, त्याचा चेहरा आकर्षक आहे, नाक, डोळे रेखीव आहेत. तो बॉलिवूडच्या नायकांच्या तुलनेत देखणा दिसतो. त्याच्या गडद कायामुळे तो आणखी उठावदार दिसतो.

वास्तवात, अभिनेत्याचे दिसणे तितकं महत्त्वाचे ठरत नाही. कारण, अगदीच सावळे आणि दिसायलाही फार सुंदर नसलेले अभिनेते प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेतच की! मुळात त्याच्याकडे अभिनय कौशल्य किती आहे, हे प्रेक्षक पाहतात. मग इतर गोष्टी गौण ठरतात.

धनुषने अन्य अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवलेली नाही. तो मुळात जसा दिसतो, तसाच पडद्यावरही दिसतो. दक्षिणेत धनुष एक महान रोल मॉडल आहे. तो सुपरस्टार असूनही कोणत्याही महागड्या वस्तू वापरताना दिसत नाही. कपड्यांचेच उदाहरण घ्या. तो नेहमीच कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

असं म्हटलं जातं की, तो शाकाहारी आहे. त्याला फुटबॉल खेळणं खूप आ‍वडतं. कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा धनुषच आहे. अभिनेता गायक, आणि चित्रपट निर्माता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडलीय. 'व्हाय धीस कोलावेरी डी' या गाण्याला आवाज दिल्यानंतर धनुष प्रकाशझोतात आला होता.

करिअरच्या सुरुवातीला धनुषला पाहून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. सडपातळ, दिसायला गडद आणि त्याच्या चेहऱ्यावर काहींनी हसत टीका केली. पण त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले. यामध्ये 'सुलान' चित्रपटाचे उदाहरण घेता येईल जे, २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'पोलाधवन,' 'पदिकथवन,' 'राऊडी बेबी,' 'अदुकलाम,' 'वाडा चेन्नई,' 'असुरन,' 'थिरूविलेयादल आरंबम,' 'कॅप्टन मिलर,' 'काधाल कोंडेन' चित्रपटांनी त्याला मोठं केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ५८ व्या आणि ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. धनुषने आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी मात्र तो 'सिनेमाचा सर्वस्वी हिरो'चं आहे.


सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...