Friday, December 1, 2023

उदय भोसले - कारखान्यातील हेल्पर ते उद्योजक- तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी




उदय अण्णासाहेब भोसले हे कोल्हापुरातील एका कारखान्यात पाणी भरणे, सफाई करणे अशी छोटी-मोठी काम करत होते. शाळा आणि घरची जबाबदारी पेलवत त्यांनी आयटीआय देखील पूर्ण केले. उदय भोसले हे इथेच थांबले नाहीत. तर स्वत:चा कारखाना काढण्याचे स्वप्नदेखील पूर्ण केले. आज कोल्हापुरातील जुने जाणकार आणि नामवंत उद्योजकांपैकी ते एक आहेत. त्यांचा उद्योजकापर्यंतचा प्रवास कष्टमय तर आहेच पण तरुण उद्योजकांना प्रेरणादायी देखील आहे.
 विद्यापीठ हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उदय यांनी कळंबा आयटीआयमधून टर्नरचे प्रशिक्षण पूर्ण केले. आयटीआय शिकत असताना ते दुसरीकडे कारखान्यात छोटी-मोठी कामेदेखील करत असत.  उदय भोसले हे मुळचे सांगरुळ जवळ येथील आमशी गावचे. उदय यांचे आजोबा आप्पासाहेब भोसले यांना राजाराम महाराजांनी जमिन इनाम म्हणून दिली होती.  त्यातील एक जमिन आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे विकून बहिणींची लग्ने केली.

*हलाखीच्या परिस्थिती नंतरही खंबीरपणे उभारले * 

आजोबांच्या निधनानंतर उदय यांचे वडील गाव सोडून कोल्हापुरात स्थायिक झाले. लक्ष्मीपुरी मध्ये वास्तव्य करू लागले. पुढे ते उद्यमनगर येथे राहायला गेले. उदय यांचे वडील अण्णासाहेब भोसले हे लक्ष्मीपुरीतील एकेकाळचे प्रसिद्ध चित्रपटगृह प्रभात आणि रॉयल टॉकीजचे मॅनेजर होते. १९७२ साली त्यांचा प्रभात टॉकीजचे बांधकाम सुरु असताना अपघात होऊन मृत्यू झाला. त्यावेळी उदय हे ९ वषार्चे होते. उदय यांच्या आई सुमित्रा अण्णासाहेब भोसले कष्टाची पराकष्टा करून आपल्या मुलांना वाढवले. उदय यांना सहा भावंडे. या भावंडांपैकी उदय हे चौथ्या क्रमांकाचे अपत्य. वडिलांच्या अपघातानंतर भोसले कुटुंबीयांना आप्तेष्टांनी थोडीफार मदत केली. पण थोडक्या मदतीवर आयुष्य चालणारे नव्हते.

*विविध मूतीर्ही विकल्या*

उदय यांनी बालपणापासूनच आपल्या कुटुंबीयांना घर चालवण्यासाठी मदत केली. गंगावेश येथील कुंभार गल्लीमध्ये कावडे यांचा बिझनेस असलेल्या लक्ष्मी अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम भोसले कुटुंबीयांनी हाती घेतले. यातून किरकोळ पैसे मिळायचे. तर उदय भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या मूर्ती दुकानांमध्ये जाऊन विकायचे. एका मूर्तीमागे पाच रुपयांचा नफा होत असे. शाळा शिकत शिकत ही कामे ते करत असत. दरम्यान, दुसऱ्या क्रमांकाची बहिण ललिता हीदेखील महाद्वार रोड निगवेकर प्रज्ञा क्लास येथे नोकरीला लागली. त्यामुळे घर चालण्यास थोडा हातभार लागला.  

*शाळा शिकत असताना कारखान्यात काम*

शाळा शिकत असताना  संजीवनी इंजिनिअर्स या कारखान्यांमध्ये जाऊन काम केले. संजीवनी इंजिनिअर्स या एकाच कारखान्यात हेल्पर म्हणून काम करताना १०५ रुपये पगार होता. शिरोली एमआयडीसी येथे आजही संजीवनी इंजिनिअर्सचे मोठे वर्कशॉप आहे. एकूण १० वर्षे एकाच कारखान्यात सायकलवरून ये-जा सुरु झाली. उदय यांनी हेल्पर मशीनवर काम करता करता ड्रिल मशीनवर काम करायला सुरुवात केली. कारखान्याच्या मालकांचा विश्वास इतका होता की, कारखान्याची किल्ली उदय यांच्याकडे देण्यात आली होती. पुढे हेल्पर ते लेथ मशीन कामगार असा प्रवास घडला. पुढे जाऊन कामगार ते उद्योजक असा परिपूर्ण प्रवास झाला.

दरम्यान, १९९१ साली उदय भोसले विवाह बंधनात अडकले. उदय यांनी लग्न व्हायच्या आधी सहा महिने आधी विचार केला की, आता आपण स्वत:चा कारखाना उभा करायचा. त्यानुसार, उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्स कारखान्याचे मालक उल्हास हसबनीस यांना नव्या कारखान्याची कल्पना सांगितली. उल्हास हसबनीस यांनीही उदय यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.

*कर्ज काढून मशीन घेतले * 

 संजीवनी इंजिनिअर्स सुरुवातीला उद्यमनगर आणि नंतर शिरोली एमआयडीसी येथे स्थापित झाला. उदय भोसले रोज उद्यमनगर ते शिरोली एमआयडीसी असा सायकलवरून प्रवास करत असत. त्यावेळी बसचा प्रवास देखील परवडत नसे. कारखान्याची नोकरी करता करता चहापुड विकण्याचा व्यवसाय देखील त्यांनी केला. उदय हे शिरोली एमआयडीसी येथे चहा विकाणाऱ्या गाड्यांना गद्रे चहापूड पुरवठा करत असत. त्यातून थोडाफार आर्थिक फायदा होत असे.

१९९२ रोजी १६०० रुपये पगार झाला होता, जेव्हा उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्सचे काम बंद करून आपला स्वत:चा व्यवसाय उभारला. विवाहाच्या आधी त्यांना १६००० रुपयांचे सेकंड हॅण्ड लेथ मशीन विकत घेतले. एका को-ऑपरेटिव्ह बँकेकडून १० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. वरील ६ हजार रुपयांची जमवाजमव करून लेथ मशीन खरेदी केले. उद्यमनगरात मित्राची जागा ३०० रुपये भाड्याने घेतली आणि उदय इंडस्ट्रीची स्थापना केली.

*धाडसाने सुरु केला कारखाना*

मशीन खरेदी केल्यानंतर ६ महिन्यात संजीवनी इंजिनिअर्सची नोकरी सोडली. पण त्याआधी नोकरी चालू असतानाचा स्वत : च्या लेथ मशीनवर कामावरून सायंकाळी आल्यानंतर प्रॅकिट्स केली. त्यावेळी उदय यांना आकांक्षा एंटरप्रायझेसचे मालक भाटवडेकर साहेब यांनी मदत केली. उदय यांनी आपल्या कारखान्याला काम मिळावे, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. उदय यांना भाटवडेकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला.

*एकाच कारखान्यात अनेक वर्षे नोकरी*

संजीवनी इंजिनिअर्स येथे मनुग्राफ कारखान्यासाठीची कामे केली जायची. मनुग्राफचे प्रोडक्ट बनवण्यात उदय भोसले यांचा हातखंडा होता. विश्वासू, चोख आणि परफेक्ट काम करणारे उदय भोसले यांची ओळख झाली होती. त्यामुळे मनुग्राफच्या साहेब लोकांशी उदय भोसले यांचे चांगले संबंध होते. उदय यांनी त्यांना काम देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा मनुग्राफने थेट उदय यांना व्हेंडर करून घेतले. तसे पाहता मोठे युनिट असल्याशिवाय कोणतीही कंपनी व्हेंडर करून घेत नाही. पण, उत्तम काम आणि विश्वास या जोरावर उदय सलग पाच वर्षे यांना मनुग्राफचे व्हेंडर होता आले.

*प्रसिद्ध मनुग्राफसाठी काम केलं*
 
मनुग्राफ यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्रिंटिंग मशीन युनिट होते. त्यांचे सर्व मशीन महाराष्ट्रात निर्यात व्हायचे. मनूग्राफचे काम संपुष्टात आल्यानंतर उदय भोसले यांनी प्रवीण सोनार कल्याणी ब्रेक्स या पुण्याच्या कंपनीशी ओळख होऊन संबंध चांगले प्रस्थापित झाले. त्या कंपनीसाठी १० वर्षे काम केले. गाड्यांच्या ब्रेक्स लाईनसर्चे व्हिल्स एंडरचे सॅम्पल बनवून देण्याचे काम त्यांनी केले. मित्रांचा ग्रुप तयार करून प्रोडक्शन सुरु केलं.

*आयटीआयचे विद्यार्थी कामासाठी येऊ लागले*

आयटीआयचे विद्यार्थी अॅप्रेंटिससाठी उदय भोसले यांच्या कारखान्यात येऊ लागले. हे विद्यार्थी शिकता शिकता कामेही करू लागली. संध्याकाळी चारनंतर याच उदय यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि होतकरू बनवले. हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या कंपनींचे मालक बनले आहेत. काही जणांनी कारखाना उभारला आहे.  

वारणा कोडोली येथील प्लामाज, कल्याणी ब्रेक्स, मनुग्राफ सोबत मेनन ऑटोमोबाईल यांचे प्रोडक्ट्स बनवले गेले. कोल्हापुरातील प्रसिद्द घाटगे पाटील, मेनन यांचे थर्ड पार्टी म्हणून उदय काम पाहू लागले. कारखान्यामध्ये जॉब वर्क्स व्हिल सिलेंडर्स, गेट वॉल, व्हॉल गार्ड, स्पेशल बोर्ड्स, प्रीटिंग मशीनचे प्रोडक्ट तयार केले जायचे. वयाच्या ६० व्या वर्षाही स्वत: उदय कारखान्यात काम करतात. अद्यापही उदय इंडस्ट्री हा कारखाना सुरु आहे. जीवात जीव असे पर्यंत कारखाना सुरु ठेवण्याचा उद्योजक उदय भोसले यांचा मानस आहे. 

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...