Thursday, January 4, 2024

कारखान्याचे कर्मचारी ते प्रतिष्ठा न बाळगणारा उद्योजक अविनाश चिकणीस

कोल्हापुरातील ख्यातनाम आणि कामाची प्रतिष्ठा न बाळगणारा उद्योजक म्हणून अविनाश चिकणीस यांचे नाव. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आणि कुटुंबात उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ॲविसन इंडस्ट्रीचे सीईओ म्हणून अविनाश यांनी नाल कमावले. गेले ३२ वर्ष ते मशीन शॉपच्या उद्योगात ते कार्यरत आहेत. स्पर्धकांचे आव्हान असताना अविनाश चिकणीस यांनी कॉस्ट, क्वालिटी आणि डिलिव्हरी अशा त्रयी गोष्टींवर भर दिला. त्यामुळे ग्राहकांची विश्वासार्हता जपली गेली. आज १० ते १५ कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असलेली ॲविसन इंडस्ट्री आज शिरोली एमआयडीसी येथे दिमाखात उभी आहे.  


अविनाश गणपतराव चिकणीस यांचे विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. शिक्षण डीएमई. बीई मेकॅनिकल मध्ये पूर्ण झाले. कॅम्पस सिलेक्शनमधून अविनाश यांचे प्रसि‌द्ध मनुग्राफ येथील युनिट २ (कोडोली, कोल्हापूर) येथे नोकरीला लागले. मेकॅनिकल इंडस्ट्रीत आपण स्वतःचे मशीन शॉप उभा करायचा, अशी आशा बाळगून ते काम करत होते. त्यामुळे नोकरी करत असताना प्रोडक्शनमध्ये मशीन विभागातचं ते काम करायचे. पुढे मेनन पिस्टन एमआयडीसी शिरोली येथे काही वर्षे त्यांनी काम केलं.
 
आधीपासूनच उद्योजक होण्याची मनात सुप्त इच्छा  

आपला स्वतःचा उद्योग असावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांनी एमआयडीसी येथे जागा शोधण्यास सुरुवात केली. आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी धाडसाने उद्‌योगात पहिले पाऊल टाकले, यासाठी तीन-तीन शिफ्टमध्ये त्यांना काम करावं लागलं. सुदैवाने 1992 रोजी मेनन पिस्टनला असताना त्यांना शिरोली एमआयडीसीमध्ये एक इंडस्ट्रीयल प्लॉट उपलब्ध झाला. हा प्लॉट पार्टनरशीप मध्ये प्रोफेसर संजय देसाई यांच्यासोबत मिळून खरेदी केला. प्रोफेसर देसाई आणि अविनाश चिकणीस हे जीवश्चकंठश्च मित्र. पण, सर्वच कामाची जबाबदारी अविनाश यांच्याकडे होती. त्यावेळी दुसऱ्या कारखान्यात शिफ्टमध्ये नोकरी करत असताना अविनाश यांना आपला स्वत:चा व्यवसाय उभारणे खूप आव्हानात्मक होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि डीवाय पाटील कॉलेजला 1993 रोजी प्रोफेसर म्हणून रुजू झाले. तरीही उद्‌योजक व्हायचं स्वप्न स्वस्थ बसू देत नहतं. जूनमध्ये प्रोफेसरची नोकरी सोडली आणि पूर्णपणे स्वतःला 1996 मध्ये उद्‌योग व्यवसायात झोकून दिलं.

खूप व्याजदर असतानाही मशीनची खरेदी

सुरुवातीला केवळ चार लेथ मशीन आणि एक ड्रीलिंग होत. जेवढे कर्ज मिळालं, त्यातचं उद्योग उभारला. त्यावेळी व्याजदर २१ टक्के असतानाही कर्ज घेतले आणि नव्या उद्योजकाचा प्रवास सुरु झाला. 1996 रोजी ॲविसन इंडस्ट्री नावाने कारखाना सुरू झाला. अविनाश यांनी स्वतः सकाळपासून रात्रीपर्यंत मशीनवर काम करायला सुरुवात केली. इतक काबाडकष्ट करत असताना फायदा होत नसल्याने असंख्यवेळा विचार आला की, आता कारखाना बंद करूया. पण, कुठेतरी विश्वास होता की, आपल्या प्रयत्नांना एक दिवस नक्की यश मिळणार. त्यामुळे पुढील एक वर्षात अनुभवातून ते उद्योगात सेट झाले. सन 2000 पासून उद्‌योगधंद्यात प्रगती होत गेली.

धाडसाने पहिले मशीन 30 लाखांचे खरेदी केले लावटी एका मशीनची किंमत 25 लाख होती. 2004 मध्ये अविनाश यांनी पहिले व्हीएमसी मशीन आणले, त्याची किंमत 30 लाख होती. पुढे-पुढे उद्योगात स्थिरता आली. कामगारांच पगार वेळेत करणे, सप्लायर्स किंवा कस्टमर्सना वेळेवर माल पोहोचवणे, ग्राहकांशी नातेसंबंध चांगले ठेवणे यामुळे उद्योगात जम बसला.

देश-परदेशात मालाचा पुरवठा

भारतात पुणे, मुंबई, नाशिक येथे मालाचा पुरवठा केला जातो. इटलीमध्ये निर्यात केले जाते. Crompton Greaves ही नाशिकची कंपनी, Knorr-Bremse ही जर्मन मल्टिनॅशनल पुण्यातील कंपनी, डोंबिवलीतील Neles India Pvt. Ltd हीदेखील मल्टिनॅशनल कंपनी, Firefly Pumps Pvt. Ltd (कोल्हापूर), Globalmec international या इटलीच्या कंपनीला माल पुरवठा केला केला जातो.
 
ॲक्युरसी जास्त असणारे बनवले जातात पार्ट्स

क्रिटिकल मशीनींग, कास्टिंगचे काम कारखान्यात तयार केले ॲक्युरसी जास्त असणारे पार्ट्स तयार केले जातात. अविनाश चिकणीस यांचे कौशल्य इतकं प्रबळ आहे की, ग्राहकांना जसा माल हवा आहे, तसा मालाचा पुरवठा केला जातो. ऑटोमोबाई, ऑईल इंजिन, पॉवर सेक्टर, ऑईल ॲण्ड गॅस (वॉल्स), ब्रेकिंग सिस्टीम, हायड्रोलिक्स, फायर प्लँटिंग अशा सगळ्या विविध क्षेत्रातील पार्ट्स कसे बनवायचे, याचे कौशल्य अविनाश यांच्याकडे आहे. ॲल्युमिनिअमपासून कास्ट बँड, स्टेनलेस स्टिलमध्ये काम करण्याचे स्किल त्यांच्याकडे आहे. कोणतेही मटेरिअयल दिलं तर ते बनवून देणं, ही ॲविसन इंडस्ट्रीची खासियत आहे.
 
एखादी वस्तू कमी वेळेत करून देणे, त्याची १०० टक्के गुणवत्ता राखणे आणि वेळेत मालाचा पुरवठा करणे अशा गोष्टींवर ग्राहकांशी दृढ संबंध बनले. अवजड वाहनांना वाहतूक करण्यास काही अडचण असेल तर काही  इमरजन्सीला स्वत:च्या गाडीतूनही माल वेळेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे ग्राहकांना इतर पर्याय शोधावा लागता नाही आणि मार्केटमध्ये ग्राहक अगदी शेवटपर्यंत कायम राहतात.  त्यामुळे स्पर्धकांना देखील स्पर्धा करण्याची जागा उरत नाही.
सध्या ॲविसन इंडस्ट्रीमध्ये ५५ ते ६० कामगार ३ शिफ्टमध्ये काम करतात. शिवाय मॅनेजर, क्लार्क, स्टोअर ऑफिसर अशी मिळून १५ माणसे कारखान्यात कार्यरत आहेत. तीन एचएमसी, पाच वहिएमसी, दोन टर्निंग सेंटर, एक सीएमएम अशा मशिनरी उपलब्ध आहेत. यापैकी सीएमएमची खासियत म्हणजे, यावर कोणतेही प्रोडक्ट तयार होत नाही. याची किंमत ३० ते ४० लाख आहे. पण, जे काही प्रोडक्ट तयार केलं जातं, त्याची गुणवत्ता तपासण्याचे काम या मशीनवर होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ॲविसन इंडस्ट्रीने आपले स्थान बळकट केले आहे.

 सीएमएम या मशीनचा जो रिपोर्ट असतो. उदाहरणार्थ प्रोडक्टवर लिहिलेलं असतं की, सीएमएम रिपोर्ट ॲट १७-१८ डिग्री तापमानावर हे चेक गेले आहे. तोच प्रोडक्ट जर परदेशात जाऊन तपासला तर तरीही १०० टक्के रिझल्ट दाखवणार. सीएमएम रिपोर्ट असणे म्हणजे माल एकदम उत्तम असे म्हणता येईल. खूप मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये सीएमएम मशीन्स असतात. पण अविनाश यांनी आपल्या मध्यम सेटअप असणाऱ्या कारखान्यात सीएमएम मशीन आणले. आता भविष्यात या कारखान्याचा विस्तार करून अडीच ते तीन कोटींची विविध मशीने आणण्याचे प्रस्तावित आहे. 

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...