प्रोफेशनल भरतनाट्यम नृत्यांगना ज्यांनी लहानपणापासूनच डान्स क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं होतं. आज त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. बी कॉममध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या अपेक्षा यांनी एमए भरतनाट्यम अलंकार ही मोठी पदवी मिळवली आणि सुरु झालं डान्सचे करिअर. आपली आवड, आपला छंद पुढे व्यवसाय म्हणून नावारुपास आला. जाणून घेऊया प्रोफेशन भरतनाट्यम डान्सर अपेक्षा निरंजन यांच्याविषयी.
वयाच्या ननव्या वर्षापासून त्यांनी कथ्थक शिकायला सुरुवात केली. इयत्ता चौथीत असताना कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केवी. पण भरतनाट्यम फार आवडायचे. त्यामुळे डॉ. अलका लाजमी (भरतनाट्य गुरु) यांच्याकडे भरतनात्यम शिकायला सुरुवात केली. गुरु डॉ. सुचिता चाफेकर यांच्याकडे एकूण १० वर्षे कोल्हापुरात भरतनात्यमचे प्रशिक्षण घेतले. विवाहानंतर २००३ रोजी मुंबईत शिफ्ट झाल्या. गांधर्व महाविद्यालयातून विशारदची पदवी मिळवली. नालंदा डान्स रिसर्च सेंटरमधून भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केला. भरतनाट्य़म शोज, वर्क्स, क्लास, परफॉर्मन्स अशा सर्व पातळ्यांवर अपेक्षा यांनी कलेचं सादरीकरण केलं आहे.
गुरु पंडित बद्रीनाथ कुलकर्णी (कोल्हापूर), आरती आगरकर (मुंबई), डॉ. अलका लाजमी, डॉ. सुचेता चाफेकर यांच्या प्रशिक्षणाखाली अपेक्षा यांनी भरतनाट्यम शिकले.
अशी उभारली नृत्यांजली संस्था
बहिण सानपाड्याला राहायची. आठवड्यातून एक दिवस दोघी भेटायच्या. भेटीतून डान्स कॅम्प घेण्याचा विचार आला आणि त्याला प्रतिसादही मिळाला. मुलांचे पालक म्हणाले की, डान्स क्लास का घेत नाही? मग सुरूवातीला शाळेच्या विद्यार्थींना शिकवलं गेलं. आणि हळूहळू हा छंद पुढे करिअर बनला. सध्या या संस्थेत १३० विद्यार्थीनी शिकत आहेत.
कोविडमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. परदेशातूनही विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत असतात. १) प्रारंभिक परीक्षा २) प्रवेशिका प्रथम ३) प्रवेशिका पूर्ण ४) मध्यमा प्रथम ५) मध्यमा पूर्ण ६) विशारद प्रथम ७) विशारद अशा ७ परीक्षा असतात. कमीत कमी ७ ते १० वर्षे सातत्याने प्रशिक्षण घेऊन या परीक्षा पूर्ण करता येतात. अडवू (बेसिक स्टेप्स शिकवल्या जातात.) वेगवेगळे अडवू कसे एकत्र आणायचे? अभिनय कसा करायचा, त्यानुसार व्यायाम करवून घेऊन शरीराची ठेवण घडवली जाते. सिंपल पदन्यास असतो आणि नंतर अभिनय शिकवला जातो. शास्त्रोक्त शिक्षण देणं ही त्यांची खासियत आहे. प्रत्येक डान्सच्या मागील कारण भाव समजावून सांगितला जातो.
२०१६ मध्ये Indian culture centre ने अपेक्षा यांना आमंत्रित केलं. ICCR ला कोलंबो, श्रीलंका येथे भरतनाट्यम शो केला. सर्वाधिक ३५ कार्यक्रम पोलंडमध्ये झाले. इतकचं नाही तर भारतीय शास्त्रीय नृत्य याचा प्रचार व प्रसार त्या भाषणातून करतात. इंडियन-पोलिश म्युझिकवर सादरीकरण करणाऱ्या अपेक्षा एकमेव आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच इटलीमध्ये dat festival सादरीकरण केलं. शिवाय तेथील बॅले विद्यार्थ्यांना भरतनाट्यम प्रशिक्षण दिलं आहे. फ्रान्स-पॅरिस, साऊथ कोरियामध्ये, थायलंडमध्ये भारतीय दुतावाससाठी सादरीकरण केलं. जॉर्जिया येथे Movement dance साठी परीक्षक म्हणून हजेरी लावली. physical and Theater dance International festival साठी सादरीकरण आणि वर्कशॉप घेतलं. इंडो-पोलंड रिलेशनशीप टूरच्या वेळीही सादरीकरण केलं.
विद्यार्थ्यांना विविध स्किल्सचे प्रशिक्षण
या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अपेक्षा Thematic सादरीकरण करतात. अनेक ठिकाणी स्पर्धेत वेगळेपण, स्किल दाखवतात. विविध विषय, संगीत, पारंपरिक थीम निवडून नाविन्यता आणली जाते.
नयनम - डोळ्यातून भावना कसा व्यक्त करायच्या? यामध्ये कृष्णा- शिवाच्या भीमवर, कृष्णानुबंध (सत्यभामा, यशोदा, राधा अशा पात्रांसोबत सादरीकरण कसं करायचं? तंजावरचे मराठेराजे ज्यांनी १६, १७, १८ व्या शतकात रचना लिहिल्या, त्यावर आधारित भरतनाट्यमचे सादरीकरण कसं करायंच? अभंगांवर प्रयोग करून विविध अभंग घेवून भाव, शृंगार, वात्सल्य, करूणा सादरीकरण कसं करायचं हे शिकवलं जातं.
परदेशातही नाविन्यता
परदेशात रोमन कॅथॉलिक गाणी वाजवली जातात, त्यावर सादरीकरण, फ्लेमेंको ह्या स्पॅनिश संगीतावर भरतनाट्यमचे सादरीकरण, ट्रॅडिशनल पोलिश फोक संगीतवर सादरीकरण तसेच २००-३०० वर्षापूर्वीच्या गाण्यावर भरतनाट्यमचे सादरीकरण केलं जातं. पोलिश रिफ्यूजी जेव्हा भारतात आले, त्यावेळी त्यांचा जीवनप्रवासदेखील भरतनाट्यम द्वारे सादर केला जातो.
१०० हून अधिक सादरीकरण
अपेक्षा निरंजन यांचे एकूण प्रयोग पाहता १०० हून अधिक आतापर्यंत त्यांनी सादरीकरण केलेले आहे. छंद, आवड हाच त्यांचा व्यवसाय बनला आहे. एक व्यावसायिक नृत्यांगना म्हणून त्यांनी २० वर्षे काम केलं आहे. परदेशात भारताची संस्कृती पोहोचावी, नृत्याचा वारसा अबाधित राहावा म्हणून त्यांचे अविरत काम सुरु आहे.



No comments:
Post a Comment