सुदेश राजुरीकर हे कोल्हापुरातील उद्योजक. बीकॉम पर्यंतचे पदवीचे शिक्षण घेतलेले राजुरीकर यांनी उद्योग करण्याचे ठरवले आणि कल्पना आली ती कोरुगेटेड बॉक्स बनवण्याची. बॉक्स बनवण्याच्या कलेला त्यांनी उद्योगात रूपांतर केले. विविध गिफ्ट देण्यासाठी गिफ्टची आयडिया त्यांना आली. आज 'बॉक्स फॅक्टरी' नावाने त्यांचा कारखान इचलकरंजीमध्ये दिमाखात उभा आहे.
२००६ ला सुरु झाला कोरुगेटेड बॉक्स उद्योग
२००६ साली त्यांनी गिफ्ट देण्यासाठीचे बॉक्स बनवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी वेगवेगळ्या साईजचे बॉक्स बनवून ज्वेलरीच्या शॉप्सना त्यांनी भेट दिली. त्यावेळी ज्वेलरी शॉप्समध्ये त्यांना हवे तसे बॉक्स मिळायचे नाहीत. पण त्यांना हव्या त्या साईजमध्ये विविध डेकोरेटिव्ह बॉक्स राजुरीकर यांनी बनवून दाखवले. आणि व्यापारी, मालकांना ते बॉक्सेस आवडले देखील. त्यानंतर सुरु झाले बॉक्सचे मॅन्युफॅक्चरिंग.
राजुरीकर यांच्या बॉक्स फॅक्टरीमध्ये सध्या नऊ कामगार आहेत. कारखान्यात एकूण तीन मशीन आहेत. प्रिंटिंग करूगेशन लेव्हलचे मशीन आणि बॉक्स फोल्डिंग होतात ते मशीन ज्याला फ्रीजिंग असे म्हटले जाते (साईज प्रमाणे बॉक्सेस फायनल करता येतात.) यासाठी कच्चा माल, कागद, विविध साहित्य लागते. खास प्रकारचा ग्लू (डिंक) आणि वस्तू काळी पडू नये यासाठी केमिकल लागते. विविध वस्तूंसाठी विविध कागद डिझाईन प्रिंटिंग केले जाते. नंतर फायनल बॉक्स तयार होतात. हा सर्वमाल उत्तर भारतातून आणला जातो. सुरुवातीला राजुरीकर यांनी पाच लाख या उद्योगासाठी गुंतवले. ७० ते ८० लाख रुपयात प्रिंटिंग मशीन, दहा ते वीस लाखात क्राईझिंग मशीन विकत घेतलं, त्यामध्ये बॉक्सचा घड्या पाडल्या जातात. तीन ते चार लाखात कॉरुगेशन मशीन घेतलं.
कोरुगेटेड बॉक्समध्ये विविध चांदीच्या वस्तू ठेवण्यासाठी तसेच गिफ्ट म्हणून देण्यासाठी उपयोग केला जातो. डेकोरेटिव्ह, विविध चित्रे, प्रिंट असलेले बॉक्सेस तयार केले गेले, बॉक्सवर लामण दिवा, समईचे चित्र असलेले बॉक्स कव्हर तयार करून ते महाराष्ट्रात वितरित करण्यात आले. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात सांगली या ठिकाणी बॉक्सेसचे वितरण करण्यात आले. २००६ मध्ये सर्वात प्रथम चिपडे सराफ यांना बॉक्स दाखवण्यात आले आणि त्यांना हवे तसे बॉक्सेस तयार करत करून डेव्हलप करण्यात आले. कराड, सातारा, पुणे, मुंबईतील ज्वेलरी शॉप्सना हे बॉक्सेस नेऊन दाखवले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे गुजरात, कर्नाटकातही व्यापाऱ्यांना भेटून बॉक्सेस प्रेझेंट करण्यात आले आणि त्यांच्याकडून ऑर्डर मिळत गेल्या. त्यामुळे २००६ पासूनच ग्राहकांची विश्वासर्हता टिकून राहिली.
चांदीच्या वस्तू काळवंडत नाही
या बॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीची कोणतीही वस्तू काळी पडत नाही. या बॉक्सेसना गणपती उत्सव सणाला अधिक मागणी असते. सण उत्सव आल्यानंतरच आपण चांदीचे वस्तू, दागिने बाहेर काढतो. पण त्या चांदीच्या वस्तू हवामानामुळे काळी पडते. या बॉक्समध्ये या वस्तू ठेवल्यास या वस्तू जशा आहेत तशा राहतात. वस्तू अजिबात काळवंडत नाहीत.
शिवाय बॉक्सवर प्रेझेंट पेपर लावायची गरज भासत नाही. त्यामुळे वेळ वाचतो. शिवाय प्रेझेंट पेपर चे पैसे वाचतात. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे बॉक्स फोल्डिंग होतात. त्यामुळे वस्तू ठेवण्यासाठी खूप कमी जागा लागते. खास करून मुंबईत जागेची वाणवा असल्यामुळे बॉक्सची मागणी फार आहे. प्रेझेंट पेपर, जागा आणि कामगारांचा खर्चदेखील यातून वाचतो. अनेकदा अन्य काही बॉक्स हाताळताना वरील टोपण किंवा झाकण तुटते किंवा फाटते. पण या बॉक्सचा दर्जा इतका उत्तम आहे की कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. बॉक्सला कोणताही वास येत नाही. त्यामुळे उंदीर, पाल, झुरळ या बॉक्स पासून दूर राहतात. कागदाचा स्मेल येऊ नये किंवा पाणी धरण्याची क्षमता कमी व्हावी यासाठी बॉक्स हाय हिटवर वाळवले जातात. ज्यामुळे पावसाळ्यात या बॉक्सेसना ओलावा धरत नाही वा बुरशी लागत नाही.
बॉक्समध्ये समई, अत्तरदाणी, फुलदाणी, चांदीच्या वस्तू, मूर्ती, गुलाबदाणी अशा वस्तू ठेवता येतात. म्हणूनच हे बॉक्सेस बाजारात खूपच प्रसिद्ध झाले. पुणे मुंबईतील मोठे व्यापारी राजुराकर यांनी बनवलेलेच बॉक्स वापरतात. अनेकांनी या बॉक्सेसचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला गेला. मॅन्युफॅक्चरिंग आणि कॉस्ट ही रीजनेबल असल्यामुळे व्यापाऱ्यांशी नाते जोडले गेले आणि ग्राहक कायम राहिले. वर्षाला दोन वर्षाला बॉक्सेसचे डिझाईन बदलले जाते. तशी ही फार खर्चिक बाब आहे. तरीही राजुरीकर बॉक्सेसमध्ये डेव्हलपिंग करतात आणि नाविन्यता आणून मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतात.
*३० प्रकारचे विविध बॉक्सेस*
नव्या बॉक्सचे डिझाईन ग्राहकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. पूर्वी ग्लॉसी लॅमिनेशन केले जात होते. आता मॅट लॅमिनेशनमध्ये त्याचे रूपांतर केले गेले आहे. ३० प्रकारचे विविध बॉक्सेस यामध्ये आहेत. सव्वाशे ते दीडशे प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी हे बॉक्सेस उपलब्ध आहेत त्यामध्ये ट्रे, फोटो फ्रेम, गणपती फ्रेम ठेवता येते. एक खास बाब म्हणजे, मुंबईतील वामन हरी पेठे यांना कुंकवाच्या करंडासाठी बॉक्स हवा होता. राजुरीकर यांनी कुंकवाच्या करंड्याचे साईज घेऊन त्यांना हवा तसा बॉक्स डेव्हलप केला. तो इतका प्रसिद्ध झाला की बाजारामध्येही ते बॉक्सेस आणले गेले. सहा इंच आणि आठ इंच, दहा इंच, बारा, आणि १४ इंच असे चांदीचे वस्तूचे गिफ्ट देण्यासाठी बॉक्सेसही बनवले जातात. लामण दिवा, घंटी, पळी- पंचपात्र, ताम्हण, तांब्या, आरतीचे सर्व वस्तूही एका बॉक्समध्ये बसतील, अशा प्रकारचे बॉक्सेस तयार केले जातात. शिवाय चांदीचे ताट, दोन वाट्या, चमचे बसतील यासाठी खास बॉक्सेस डेव्हलप केले जातात. लग्नासाठी अहेरासाठी सर्व अधिक मागणी आहे त्यामुळे ग्राहकांना हवे तसे बॉक्सेस मिळाल्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद असतो. व्यापाऱ्यांकडून मागणी आल्यानंतर हेव तसे बॉक्सेस बनवून दिले जाते.
ऐन वेळेला हवे तसे बॉक्सेस उपलब्ध करून दिले जाते. कारण, राजुरीकर यांनी त्यांच्या गोडाऊनमध्ये बॉक्सेस रेडी टू स्टॉक केले आहेत. अर्धा किलो वजनाची वस्तू जरी असली तरी ती बॉक्समध्ये उत्तम प्रकारे पॅकिंग करता येते, अशी बॉक्सची खासियत आहे. प्रेजेंटेशन उत्तम, डिझाईन प्रेझेंट पेपर रेडी असते, आणि योग्य साईजमध्ये बॉक्सेस बनवणे, यात राजुरीकरांचा हातखंडा आहे. राजुरीकरांना आपल्या व्यवसायात नाविन्यता आणलीय, म्हणूनच त्यांचा उद्योग बाजारात टिकून आहे, असे म्हणायला हरकत नाही.
*सव्वा रुपयांपासून ८० रुपयापर्यंत बॉक्सेस*
सव्वा रुपयांपासून ८० रुपयापर्यंत बॉक्सेस उपलब्ध आहेत ज्वेलरी, लग्नासाठी, इलेक्शनमध्ये मिठाई देण्यासाठी हे बॉक्स लागतात. त्यांचा मुलगा कुशल राजुरीकर देखील या व्यवसायात आता उतरला आहे. त्याने आपली कल्पकता समोर आणून आपल्या वडिलांच्या साह्याने याच कारखान्यामध्ये अन्नपदार्थांसाठी बॉक्सेस तयार करण्याचे कौशल्य साधले आहे. त्यामध्ये कुल्फीसाठी लागणारे बॉक्सेस, सँडविच, बर्गर, पिझ्झासाठी लागणारे बॉक्स तयार केले. दिवाळीत या बॉक्सना खास मागणी असते. कुशल राजुरीकरने या बॉक्सेसचे डिझाईन स्वतः केले आहे.
*महाराष्ट्रा बाहेर जातो माल*
कराड, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे या ठिकाणी प्रसिद्ध मोठ्या व्यापारांकडे राजुरीकर यांचा माल जातो. बेंगलोर, कर्नाटक, बडोदा, गुजरात, सुरत येथे चांदीचे व्यावसायिक व्यापाऱ्यांकडेही हे बॉक्सेस पुरवले जातात. याठिकाणी डिस्ट्रीब्यूटर नेमले आहेत. त्यांची पत्नी सुजाता राजुरीकर या देखील अकाउंटिंगचे काम पाहतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब या व्यवसायाशी जोडला गेलेला आहे.
- उद्योजक सुदेश राजुरीकर
मो. नं. - 9623446024

%20(1).jpg)



No comments:
Post a Comment