Friday, December 1, 2023

Happy B'day Dhanush : साई पल्लवी ते राशी खन्नापर्यंत साऊथच्या अभिनेत्रींना धनुषची का आहे भूरळ?


साऊथ स्टार धनुषचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Happy B'day Dhanush) दक्षिणेत तर धनुषला प्रेक्षक चाहत्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. केवळ चाहतेच नाही तर त्याच्यासोबत अभिनय करणाऱ्या महिला सहकलाकार अभिनेत्रींनाहीदेखील त्याची भूरळ आहे. मग ती साई पल्लवी असो वा राशी खन्ना. धनुष किती मेहनती अभिनेता आहे, हे अभिनेत्री भरभरून सांगत असतात. तो सेटवर किती उत्साहाने, जोशपूर्ण काम करतो, आपल्या कामाबाबत किती गंभीर आणि दक्ष असतो, अनेक कौतुकाचे गोडवे अभिनेत्री गात असतात. (Happy B'day Dhanush)

असूर असो वा बॉलिवूडपट 'रांझना' मनाला भिडणारे चित्रपट देण्यात धनुषचा हातखंडा आहे. चित्रपटांतील भावस्पर्शी कथानकामुळे धनुषच्या अभिनयाला जोड मिळते. अनेकजण म्हणतात की, धनुष दिसायला खास नाही. म्हणून तो डल दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बसतो. पण, साऊथच्या प्रेक्षकाला दिसण्याशी काही संबंध नाही. कारण, धनुषकडे सुंदर दात आणि मनमोहक हास्य आहे. या द्वयींवर तो आपल्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांवर प्रभाव टाकतो.

एक प्रतिभावान, कष्टाळू अभिनेता जर प्रेक्षकांच्या समोर असेल तर त्यांना कशाचीच परवा नसते की, तो कसा दिसतो? काही चाहते तर म्हणतात की, त्याचे चित्रपट हिट होणार की नाही हे मला माहिती नसते, पण फक्त त्याच्यासाठी मी त्याचे सिनेमे पाहतो. कारण त्याचे कौशल्य आणि भव्य हास्यासमोर सर्व गोष्टी मागे पडतात. सुंदर तो आहे, जो सुंदर काम करतो. आणखी काही चाहते म्हणतात की, त्याचा चेहरा आकर्षक आहे, नाक, डोळे रेखीव आहेत. तो बॉलिवूडच्या नायकांच्या तुलनेत देखणा दिसतो. त्याच्या गडद कायामुळे तो आणखी उठावदार दिसतो.

वास्तवात, अभिनेत्याचे दिसणे तितकं महत्त्वाचे ठरत नाही. कारण, अगदीच सावळे आणि दिसायलाही फार सुंदर नसलेले अभिनेते प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेतच की! मुळात त्याच्याकडे अभिनय कौशल्य किती आहे, हे प्रेक्षक पाहतात. मग इतर गोष्टी गौण ठरतात.

धनुषने अन्य अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवलेली नाही. तो मुळात जसा दिसतो, तसाच पडद्यावरही दिसतो. दक्षिणेत धनुष एक महान रोल मॉडल आहे. तो सुपरस्टार असूनही कोणत्याही महागड्या वस्तू वापरताना दिसत नाही. कपड्यांचेच उदाहरण घ्या. तो नेहमीच कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

असं म्हटलं जातं की, तो शाकाहारी आहे. त्याला फुटबॉल खेळणं खूप आ‍वडतं. कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा धनुषच आहे. अभिनेता गायक, आणि चित्रपट निर्माता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडलीय. 'व्हाय धीस कोलावेरी डी' या गाण्याला आवाज दिल्यानंतर धनुष प्रकाशझोतात आला होता.

करिअरच्या सुरुवातीला धनुषला पाहून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. सडपातळ, दिसायला गडद आणि त्याच्या चेहऱ्यावर काहींनी हसत टीका केली. पण त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले. यामध्ये 'सुलान' चित्रपटाचे उदाहरण घेता येईल जे, २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'पोलाधवन,' 'पदिकथवन,' 'राऊडी बेबी,' 'अदुकलाम,' 'वाडा चेन्नई,' 'असुरन,' 'थिरूविलेयादल आरंबम,' 'कॅप्टन मिलर,' 'काधाल कोंडेन' चित्रपटांनी त्याला मोठं केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ५८ व्या आणि ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. धनुषने आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी मात्र तो 'सिनेमाचा सर्वस्वी हिरो'चं आहे.


Thursday, November 30, 2023

मर्लिन मुनरो : जगाला वेड लावणाऱ्या 'सौंदर्यपरी'ची रहस्यमयी कथा

हॉलिवूडची  सर्वात सुंदर अभिनेत्री आणि सेक्स सिंबल म्हणून ओळखली जाणारी 'मर्लिन मुनरो' हिच्यावर मागील वर्षी बायोपिक येऊन गेला. या बायोपिकचे नाव - 'ब्लॉन्ड' असे होते. या बायोपिकमध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Ana de armas हिने मुनरोची व्यक्तीरेखा साकारली. मर्लिनचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते. तिचे ग्लॅमरस दिसणे सर्वांना आकर्षून घेणारे होते. डाव्या गालावरील काळ्या रंगाचा ब्युटी मार्क मर्लिनच्या सौंदर्यात आणखी भर टाकायचा. मादक डोळे, चकाकणाऱ्या कुरळ्या केसांमुळे मर्लिनचे सौंदर्य आणखी बहरायचे. पण, हे ग्लॅमर फार काळ टिकू शकलं नाही. मर्लिनचा खूप कमी वयात मृत्यू झाला. प्रचंड ग्लॅमर, आजुबाजूला माणसांची गर्दी, विलासी जगणं आणि अनेक अफेअर्स...शेवटी गूढ मृत्यू...अशी एक हॉलिवूडची तारका मर्लिन मनुरो जिच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडू शकले नाही. तिने आत्महत्या केली असे म्हटले जाते, तर काही जण तिचा खून झाल्याचे म्हणतात. पण, अखेर या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत. शेवटी मर्लिनचं सौंदर्य, विलासी जीवन, अफेअर्स आणि मृत्यू केवळ पुस्तकांतून प्रतिबिंबीत झालं.


मर्लिन मुनरोचा जन्म १ जून, १९२६ रोजी झाला. तर औषधांची अधिक मात्रा घेतल्याने ५ ऑगस्ट, १९६२ रोजी तिचा मृत्यू झाला. मर्लिन मुनरो हे जगविख्यात नाव आहे. तिचा जन्म आणि बालपण लॉस एंजेलिसमध्ये गेले. मर्लिन मुनरो हॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. मर्लिनला अनेकांकडून प्रेम मिळालं. पण, तिचं दु:ख न कुणी समजलं न कुणी तिचा आधार बनला. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढावलेल्या मृत्यू यादरम्यान तिच्या जीवनातील काळी बाजू कुणालाच दिसली नाही, असे म्हणायला हरकत नाही.

तिचं नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबाल खेळाडू जो डिमॅगियोशीही जोडलं गेले होते. मुनरोने अनेक लग्ने केली, जी अयशस्वी ठरली.

तमाम सवयी आणि बिनधास्त वागणं आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेचल्या गेलेल्या मर्लिनच्या खरी आयुष्याची कहाणी कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावी. तिचे चरित्र लिहिणाऱ्यांनी तिच्या ग्लॅमरस जीवनाची दुसरी बाजू दाखवली. तिने लिहिलेली पत्रे, कविता आणि रोजनिशी, चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट असे अनेक दस्तावेज 'फ्रॅगमेंट्स: पोएम्स, इंटिमेट नोट्स, लेटर्स बाय मर्लिन मुनरो' नावाने छापण्यात आले. तारुण्यात अनेक पुरुषांशी संबंध, शोषणाचे किस्से आणि प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या मर्लिनचा संदिग्ध मृत्यू जगजाहीर आहे. काही पत्रे, पुस्तकांतून खासगी जीवन सार्वजनिक झाल्याने तिच्या आयुष्यातील अनेक पैलू बाहेर आले.
माणसांची गर्दी सहन व्हायची नाही  

अभिनेत्री म्हणून जगताना ग्लॅमर, चित्रपट, चर्चा आणि बरचं काही अवतीभोवती असतानाही कधी कधी माणसांची गर्दी तिला सहन होत नसे. अभिनेत्री असल्यामुळेच ती आपल्या मनातील गोष्टी कदाचित सार्वजनिकपणे व्यक्त करू शकली नसावी. म्हणूनचं तिने आपल्या लिखाणाचा आधार घेऊन ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला.

मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं- नौरमा जीन बेकर. मर्लिन नावाच्या पुस्तकात नार्मन मेलर म्हणतो- 'एकीकडे अवैधता आणि दुसरीकडे वंशागत विक्षिप्ततेचा इतिहास. तिचे आजोबा मुनरोने आपले शेवटचे आयुष्य एका राजकीय मनोरुग्णांच्या इस्पितळात घालवले होते. तिची आजी अतिशय सुंदर होती. तीदेखील मृत्यू आधी मनोरुग्णांच्या इस्पितळात होती. त्याचप्रकारे तिच्या आईच्या आयुष्य़ातील अधिक काळ मनोरुग्णांसाठी असलेल्या आश्रयस्थानात गेले होते. मर्लिनच्या एका मामाने आत्महत्या केली होती. जेव्हा जेव्हा आईला मनोरुग्ण आश्रयस्थान नेले जायचे. तेव्हा मर्लिनला अनाथालये किंवा पोषणगृहात राहावं लागत असे.' मर्लिनच्या पूर्वायुष्यातील इतिहास तिच्या जगण्याला वेगळा अर्थ देऊ शकला असे म्हणायला हरकत नाही.

सौंदर्यपरी मर्लिन

मर्लिनला अप्रतिम सौंदर्याचे वरदान मिळाले होते. अल्पवयीन असतानाच मर्लिनला समजले होते की, आपल्या सौंदर्याकडे पुरुष आकर्षित होताहेत. 'विलासी सुंदरिया' या हिंदी पुस्तकात म्हटलं गेलं आहे की, तिच्या मृत्यूच्या दोन वर्षापूर्वी तिने लेखक जेक रोजेन्सला सांगितले होते की, सुरुवातीला तिने मॉडेलिंग सुरू केले होते. पुढे हॉलिवूडमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांच्या संपर्कात ती आली. ती एकदा म्हणाली होती की, त्या चित्रपट निर्मात्यांना जे हवंय, हे जर त्या अभिनेत्रीला मान्य नसेल तर तिची जागा घेण्यासाठी ४० जणी तयार असायच्या. तिने यावेळी धक्कादायक माहिती दिली होती की, तिचे अनेक चित्रपट निर्मात्यांशी संबंध आले होते. यापुढेही जाऊन तिने ब्रिटीश पत्रकार डब्ल्यू. जे. वैदरबीसमोर खुलासा केला होता की, स्वत: आपण ठरवू शकत नाही की, कुणाशी संबंध ठेवायचे; नाही तर तुम्ही सिनेतारका कधीच होऊ शकत नाही.  

अनाथालयात जगली

मर्लिनचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अनाथालय आणि बालगृहात गेलं होतं. त्यामुळे तिला खूप कमी शिक्षण घेता आले. तिच्याकडे होतं ते रुप, विलक्षण सौंदर्य. मात्र, तिच्या मानेवर सिनेतारका होण्याचं भूत बसलं होतं. ती त्यासाठी काहीही करायला तयार होती. 

अनेक अफेअर्स केल्यानंतर मर्लिन उदासिन झाली होती. ती प्रेमासाठी काहीही करायला तयार होती. तिला अनेकांनी गाडी, बंगले, विलासी चैनचे आमिष दाखवले. पण, ती कायमस्वरुपी त्या-त्या पुरुषासोबत राहायला तयार नव्हती. तिला हवं होतं ते 'प्रेम.' खरं प्रेम जे तिला आयुष्यात कधीही मिळालं नाही.

मर्लिनचा शेवटचा फोन

त्यादिवशी ती थोडी अस्वस्थच होती. ज्या व्यक्तीला तिने फोन केला, ते तिचे शेवटचे बोलणे होते. त्या व्यक्तीचे नाव लाफोर्ड होते. लाफोर्डने सांगितले होते की, मर्लिनला त्याने रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. पण, जेव्हा त्याने संध्याकाळी मर्लिनला फोन केला, तेव्हा ती चिडचिड करत होती. तिने जेवणासाठी येण्यास नकार दिला. ती उदास वाटत होती. तिच्या स्वरात कंप जाणवत होता.

लाफोर्डदेखील हॉलीवूडशी संबंधित होता. लाफोर्डने पुढे सांगितले- रात्री ८ वाजता पुन्हा मर्लिनला फोन केला, तेव्हाही तिने येण्यास नकार दिला. कापऱ्या आवाजात ती म्हणाली, 'प्रेसिडेंटना गुडबाय सांग आणि तुलादेखील गुडबाय.' पण, लोकांना वाटत होतं की, तो खोटी कहाणी सांगत आहे. मर्लिनला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रेसीडेंट जॉन एफ केनेडी आणि त्यांचे भाऊ यांच्यासोबत सातत्याने पाहिले जात होते. लाफोर्ड आणि केनेडी बंधूंचे चांगले संबंध होते.

'तो' रहस्यमयी मृत्यू

असं म्हटलं जातं की, मर्लिनने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलं होतं. पण, काही जण म्हणतात की हा खून होता. प्रश्न हा होता की, तिने खाल्लेल्या इतक्या झोपेच्या गोळ्या कुठून आल्या? औषधांची बाटली कुठे गायब झाली? ज्या बेडवर तिचा मृतदेह होता, त्यावरचे बेडशीट जरादेखील विस्कटलेले दिसले नाही.

असंही म्हटंलं गेलं की, मर्लिनच्या किडनीमध्ये ड्रग्ज मिळाले नाही. तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत तर तिला इंजेक्शन दिले गेले आहे. एकूणच परिस्थिती संशयित होती. लोकांनी संशयाचे बोट जॉन एफ केनेडी यांच्याकडेही दाखवले. कारण, केनेडी आणि मर्लिनचे संबंध खराब झाले होते आणि ती त्यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेणार होती.

अनेक पत्रकारांनी तिच्या मृत्यूनंतर टेलिफोनचे रेकॉर्ड आणि अन्य माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या हाती काही लागले नाही.

पत्रकाराला मिळाले सिक्रेट पत्रांचे बंडल

एका पत्रकारला मर्लिनच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्रांचे बंडल मिळाले. हे पत्र मर्लिन और केनेडी बंधुंमध्ये एकमेकांना लिहिलेली पत्रे होती.

गुडमनने एक केनेडी आणि मर्लिन यांच्या भोवती फिरणारे पुस्तकही लिहिले. पण, कोणत्याच प्रकाशकाने ते छापण्यास सहमती दर्शवली नाही. मर्लिनच्या आत्महत्येनंतर एक वर्षांनी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली. अखेर ते पुस्तक छापण्यात आलेच. पुस्तकाचे नाव होते 'मर्लिनचा रहस्यमयी मृत्यू'.

Discover Maharshtra : कोकणातील 'शिमगोत्सव', हळव्या माणसांसाठी सोन्याचा क्षण


पुढारी ऑनलाईन डेस्क : तळा शहरातील शिमगोत्सवाला जुनी परंपरा लाभली आहे.  होळ्या म्हणजे चाकरमान्यांसाठी विशेष पर्वणीच असते.गोमू कशी सजली आहे, साडीचा रंग, केसांची रचना, तोंडाची रंगरंगोटी, दागदागिने या सर्वच गोष्टींचे कुतूहल असते. यांशिवाय शंकासुरांची सलामी देखील आकर्षणाचा विषय असतो. माणसांचे जत्थेच्या जत्थे आपल्या गावाकडे रवाना होतात. मोठमोठ्या लक्झरी, कार, गाड्याच्या गाड्या भरून शिमगोत्सवासाठी माणसे कोकणात हजर असतात. मुंबईतून  चाकरमान्यांसाठी तर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्य़ात येते. कामासाठी बाहेर गावी गेलेले लोक वर्षभर शिमग्याची वाट पाहतात. कोकणातील शिमगोत्सव प्रदेशानुसार बदलत राहतो.
https://www.misalpav.com/node/24240

https://www.discovermh.com/shimgotsav-in-konkan/

https://www.bytesofindia.com/newsdetails?
NewsId=4986754141272732872&title=Shimga%20in%20Kokan&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5&NewsTagId=5719070252613386575&BM=False&FW=False&ITG=False

https://www.esakal.com/kokan/konkan-tradition-holi-shimgotsav-unfold-through-documentary-ratnagiri-rjs00

https://www.lokmat.com/marathi-cinema/visit-the-audience-through-the-traditional-shimgotsav-documentary-from-konkan-a603/

https://marathi.popxo.com/article/holi-shimga-festival-in-konkan-in-marathi/
https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/shimga-at-kokan-traditional-dance-with-sankasura-display-of-konkan-culture-at-shimgotsava-662262.html
https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop23a40082-txt-ratnagiri-today-20230208100823

प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी इस्राईलची महिला गुप्तहेर

इस्राईलची गुप्तहेर संस्था 'मोसाद'च्या त्या गुप्त मोहिमेनं साऱ्या जगाला थक्क केलं होतं. महिला गुप्तहेराच्या मदतीनं राबवलेली ही मोहीम नेमकी होती तरी काय?1986मध्ये जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी छापून आली होती. ही बातमी होती इस्राईलच्या अण्विक कार्यक्रमाची. खरंतर इस्राईलचा अण्विक कार्यक्रम अतिशय गोपनीय होता.

तसं असतानाही ही बातमी फुटली होती. इस्राईलसाठी हे धक्कादायक होतं. इस्राईलकडे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त अण्विक हत्यार आहेत, असं या बातमीत म्हटलं होतं.

आणि ही बातमी पुरवणारा व्यक्ती होता मोर्डेखाई वनुनू. एक इस्राईली नागरिक.

वनुनू यांना पकडण्यासाठी इस्राईलने आखलेली हीच ती योजना होय. या योजनेतील मुख्य भूमिका होती एका महिला गुप्तहेराची. तिचं नाव होतं सिंडी.

वनुनू यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि लंडनहून बाहेर इतर कुठल्या तरी देशात घेऊन जायचं, अशी योजना आखण्यात आली.

  • वनुनू यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्यावर इस्राईलमध्ये खटला चालवण्यात आला. आजही वनुनू तुरुंगात आहेत आणि सुटकेच्या आशेवर जगत आहेत.

सिंडीनं वनुनू यांना कसं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि इस्राईलनं ही मोहीम कशी पूर्ण केली, याची ही कथा.

तंत्रज्ञ ते व्हिसलब्लोअर

इस्राईलच्या बिरशेवाजवळील नेगेवे वाळवंटात असलेल्या डिमोना अणू प्रकल्पात 1976 ते 1985 दरम्यान वनुनू हे तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. तिथं ते अणूबाँबसाठी लागणारं प्लूटोनिअम बनवायचं काम करत होते

न्यूक्लिअर विपन्स अँड नॉनप्रोलिफिरेशनः अ रेफरेंस हँडबूक' या पुस्तकानुसार, त्यांनी 'बेन गुरिऑन युनिवर्सिटी'तून तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यावेळी वनुनू यांचं वय 30च्या जवळपास होतं.

त्यानंतर ते पॅलेस्टीनच्या नागरिकांबद्दल संवेदना ठेवणाऱ्या गटांच्या संपर्कात आले, त्यातूनचं ते सुरक्षारक्षकांच्या रडारवर आले.

त्यांना 1985मध्ये नोकरीतून काढून टाकण्यात आलं.नोकरी सोडण्याआधी त्यांनी डिमोना अण्विक प्रकल्प, हायड्रोजन आणि न्युट्रॉन बाँबची जवळपास 60 फोटो गोपनीयपणे घेतली होती. देश सोडताना त्यांनी हे फोटो आणि त्यांच्या निगेटिव्ह सोबत घेतले होते.

ते आधी ऑस्ट्रेलियात पोहचले आणि तिथं त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

त्यानंतर त्यांनी लंडनस्थित संडे टाइम्सचे पत्रकार पीटर हूनम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हे गोपनीय फोटो आणि माहिती पुरवली.

जगात खळबळ उडवणारी बातमी

या माहितीच्या आधारावर 5 ऑक्टोबर 1986ला संडे टाइम्समध्ये 'रीव्हील्ड : द सीक्रेटस् ऑफ इस्राईल न्युक्लिअर आर्सेनल' हे वृत्त प्रसिद्ध झालं. या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली नसती तरच नवल!

'न्यूक्लिअर विपन्स अँड नॉनप्रोलिफिकेशनः अ रेफरेंस हँडबूक'नुसार इस्राईलजवळ फक्त 10 ते 15 अणूबाँब असावेत, असा अमेरिकन गुप्तहेर एजन्सी CIIचा अंदाज होता.

पण वनुनू यांची माहिती काही वेगळच सांगत होती. इस्राईलने प्लुटोनिअम सेपरेशनची यंत्रणा निर्माण केली असून इस्राईलकडे जवळपास 150 ते 200 अण्वस्त्र असावीत, अशी माहिती या वृत्तामुळे जगापुढे आली होती.

20व्या शतकातील घटनांवर द न्यूयॉर्क टाइम्सने 'पॉलिटिकल सेन्सरशिप' हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. या पुस्तकात या संदर्भात माहिती आहे. यात म्हटलं आहे की वनुनू यांनी दावा केला होता की या गौप्यस्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल रिगन यांच्यासमोर इस्राईलचे तत्कालिन पंतप्रधान शिमोन पेरेस कधीही त्यांच्या देशाकडे अण्वस्त्र नसल्याचा बनाव करू शकले नाहीत.

संडे टाइम्सला संपूर्ण माहिती देण्यासाठी वनुनू लंडनला पोहचले होते. पण 1986मध्ये लेख छापून येण्याआधीच त्यांना ब्रिटनमधून बाहेर काढून अटक करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं होतं.

हे योजना बनवली होती इस्राईलची गुप्तहेर एजन्सी मोसादनं!

'पॉलिटीकल सेन्सरशिप' पुस्तकामध्ये ही माहिती आहे. मोसादने काहीही करून त्यांना लंडनहून इटलीमध्ये आणण्यासाठी एका महिला गुप्तहेराला पाठवलं होतं.

वनुनूसोबत जोरजबरदस्ती न करता त्यांना लंडनमधून बाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते स्वतःच लंडनमधून बाहेर पडले, असं चित्र निर्माण करण सोईस्कर होतं. भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेणं आवश्यक होतं.

कॉफीचा कप महाग पडला

पीटर हुनम यांनी 'द वूमन फ्रॉम मोसाद' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात या योजनेची माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकात लिहतात, एक दिवस (24 सप्टेंबर 1986) लंडनच्या रस्त्यावर वनुनू यांना स्वत:मध्ये हरवलेली एक सुंदर मुलगी दिसली. वनुनू यांनी तिला दिलेली कॉफीची ऑफर तिनं लाजत लाजत स्वीकारली. कॉफीवेळी झालेल्या चर्चेत तिनं तिचं नाव सिंडी असल्याचं आणि ती अमेरिकेत ब्यूटिशियन असल्याचं सांगितलं.

पहिल्याच भेटीत ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले. बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनही बनले. पीटर लिहतात, सिंडीनं तिच्या घरचा पत्ता सांगितला नव्हता. पण वनुनू यांनी ते कोणत्या हॉटेलात, कोणत्या बनावट नावाने राहतात हे सगळं सांगून टाकलं होतं.

ब्रिटनमधून गायब झाले, इस्राईलला पोहचले

पीटर लिहितात, वनुनू ब्रिटनमधून गायब झाल्यानंतर तीन आठवड्यांनी न्यूज वीकमध्ये एक बातमी छापून आली होती की वनुनू हे इस्राईलमध्ये आहेत आणि त्यांना 15 दिवसांची कोठडी मिळाली आहे.

वनुनू यांच्या एका मैत्रिणीनं इटलीमध्ये त्यांना यॉटमधून समुद्राच्या सफरीवर जाण्यासाठी तयार केलं होतं. इटली किंवा इतर देशाच्या समुद्री सीमाच्या बाहेर गेल्यानंतर मोसादच्या गुप्तहेरांनी त्यांना अटक करून इस्राईलमध्ये नेल्याचं या वृत्तात म्हटलं होत.

वनुनू यांचं रोम इथून अपहरण करण्यात आल्याची बातमी डिसेंबर 1986मध्ये लॉस एंजेलस् टाइम्सने पूर्व जर्मनीतील एका वृत्त संस्थेच्या हवाल्यानं दिली होती.

पीटर लिहतात की वनुनूची सिंडीवर इतक प्रेम होतं की सिंडी ही मोसाद एजेंट आहे, हे ते मान्यच करत नव्हते.

द संडे टाइम्सने वर्षभरानंतर 1987मध्ये सिंडी कोण आहे, हे सांगणारा एक लेख छापला होता. त्यावरही वनुनू यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला होता.

पण कालांतराने सिंडी ही मोसाद एजेंट असल्याचं आणि त्यांना फसवण्यात आल्याचं त्यांनी स्वीकारलं.

सिंडीची खरी ओळख काय होती?

सिंडीचं खरं नाव शेरिल हैनिन बेनटोव होतं.

सेंट पीटर्सबर्ग टाइम्सने 2004 मध्ये लिहलं होतं की, शेरिल हैनन बेनटोव ही 1978मध्ये इस्राईली सैन्यात भरती झाली होती. त्यानंतर ती मोसादमध्ये दाखल झाली आणि इस्राईलच्या दूतावासांशी संबधित कामं करू लागली.

असं म्हटल जातं की पीटर हुनम यांनी इस्राईलच्या नेतन्या शहरात शेरिलला शोधून काढलं होतं. तिथं ती आपल्या पतीसोबत राहत होती. आपण सिंडी असल्याचं नाकारत ती तिथून निघून गेली. पण पीटर यांनी तिची काही छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केली होती. या घटनेनंतर अनेक वर्षं शेरिल कुणालाही दिसली नाही.

गोर्डन थोमस त्यांच्या 'गीडोन्स स्पाईसः मोसादस् सिक्रेट वॉरिअर्स' या पुस्तकात लिहतात,"1997मध्ये शेरिल हिला ऑरलँडोमध्ये पाहिलं गेलं होतं. इथं संडे टाइम्सच्या एका पत्रकारानं विचारल्यानंतर तिनं वनुनू यांचं अपहरण करण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं होतं."

वनुनू यांना शिक्षा आणि सुटकेची मोहीम

वनुनू यांना 1988ला इस्राईलमध्ये 18 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 13 वर्षं त्यांनी तुरुंगात काढली. 2004मध्ये त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं पण त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले होते.

पण अण्वस्त्रमुक्त जग बनवण्यासाठी त्यांच्या योगदानाचीही प्रशंसा झाली. त्यांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम चालवण्यात आली होती.

वनुनू यांच्या सुटकेसाठी चालवण्यात आलेल्या एका अभियानानुसार 21 एप्रिलला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये राहत होते. तिथं जेरुसलेमच्या एपिस्कोपल बिशपने त्यांना आश्रय दिला होता.

11 नोव्हेंबर 2004 रोजी जवळपास 30 इस्राईली सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण त्याच रात्री त्यांना सोडून देण्यात आलं.

पण इस्राईलने त्यांच्यावर लावलेले निर्बंध आज 32 वर्षांनंतरही तसेच आहेत.

गेल्यावर्षी नॉर्वेने वनुनू यांना ऑस्लोमध्ये आश्रय देण्याची तयारी दर्शवली होती. वनुनू यांची पत्नी ऑस्लोमध्ये राहते.

इस्राईलचा अण्विक कार्यक्रम

इस्राईलने 1950मध्ये फ्रांसच्या मदतीनं नेगवेमध्ये अणू संयत्र बनवलं होतं. जगाला ही यंत्रणा मात्र कपड्यांचा कारखाना वाटायची.

इस्राईल अणू कार्यक्रम तेजीने पुढं चालवत असेल अशी शंका 1958मध्ये यू-2 या हेरगिरी करणाऱ्या विमानांनी वर्तवली होती. 1960मध्ये शेवटी तत्कालीन पंतप्रधान डेविड बेन-गुरियोन यांनी डिमोना हे अण्विक संशोधन केंद्र असल्याचं मान्य केलं.

इस्राईलचा अण्विक कार्यक्रमात किती अग्रेसर आहे, याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी इस्राईलचा दौरा केला होता. पण इथं नेमकं काय सुरू आहे, याचं खरं चित्र कधीच पुढं आलं नाही.

इस्राईलने अण्वस्त्र बनवण्यास सुरुवात केल्याचं 1968मध्ये CIIच्या एका अहवालात म्हटलं होतं. मात्र वनुनू यांच्या गौप्यस्फोटामुळे अमेरिकासहीत अनेक देशांच्या भूवया उंचावल्या.

शिमोन पेरेसने इस्राईलच्या गुप्त अण्विक कार्यक्रमाची सुरुवात केली होती. बेंजामिन नेत्यानाहू यांनी 2016मध्ये नेगवे इथल्या अणु संयंत्राचं नाव बदलून शिमोन पेरेस यांच नाव दिलं जाईल, अशी घोषणा केली होती.

Tuesday, November 28, 2023

इस्त्रो शास्त्रज्ञ ते उद्योजक व्यंकटेश अंदुरकर

- स्वालिया शिकलगार

एका खेडेगावातून आलेले व्यंकटेश गोपाळराव अंदुरकर यांनी इस्त्रो शास्त्रज्ञ ते उद्योजका पयर्ंत मजल मारली. तुळजापूर तालुक्यातील अंदुर (जि. सोलापूर) येथील मुळचे रहिवासी असलेले अंदुरकरांनी इस्रोशी गले लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. हा काय वेडेपणा आहे असे कुणालाही वाटेल. पण, इस्त्रोमधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडण्याचं धाडस अंदुरकरांनी केले आणि उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल केली. आज कोल्हापुरातून ते ग्लॅडिअन्स ऑटोमेशन सिस्टम्स ही प्रसिद्ध कंपनी सांभाळतात.
सध्या अंदुरकर हे कोल्हापुरात स्थायिक आहेत. व्यंकटेश अंदुरकर हे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअर (बेळगाव) मधून त्यांनी शिक्षण घेतले होते. पुढे अंदुरकरांना एमटेकमध्ये (इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कनार्टक राज्य) सुवर्णपदक देखील मिळाले. एमटेकचे शिक्षण घेत असताना अंदुरकर यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) यामध्ये ग्रुप ए क्लास वन ऑफिसर म्हणून निवड झाली. भारताचा पहिला दळणवळण उपग्रह (इन्सॅट २ पीएस) साठी शास्त्रज्ञ म्हणून अंदुरकर काम करू लागले. साडेपाच वर्ष इस्रो मध्ये त्यांनी काम केले.
व्यंकटेश अंदुरकरांचे वडील गोपाळराव अंदुरकर यांचा संबंध अनेक उद्योजकांशी यायचा. ते पाहुन व्यंकटेश अंदुरकरांना नेहमी मनात कुतुहल असायचं की, आपणही स्वतःचा बिझनेस करावा. इस्त्रोचे काम सुरु असताना त्यांना सतत विचार यायचे की, इस्त्रोचा प्रोजेक्ट संपल्यानंतर मला वापस जायचं आणि स्वतःचा उद्योग करायचा. इस्त्रोमधून राजीनामा देणं, हे सहसा कुणीही करत नाहीत. त्यांनी कोल्हापूर हे क्षेत्र निवडलं. जिथे फौंड्री, मेकॅनिकल इंडस्ट्रीज आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज होत्या. पण, इलेक्ट्रानिक्स संबंधित उद्योग नव्हते.
अंदुरकरांनी ग्लॅडिअन्स ऑटोमेशन सिस्टम्सची स्थापना १९९७ रोजी कोल्हापुरात केली. ही कंपनी स्थापन करण्यात व्यंकटेश अंदुरकर यांच्या पत्नी वैष्णवी अंदूरकर यांच मोलाचा वाटा आहे. अंदुरकर यांच्या पत्नीदेखील उच्चशिक्षित आहेत. त्या इलेक्ट्रीकल इंजिनिअर आहेत. त्यांनी पत्नीला इच्छा बोलून दाखवली की, मला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. माझी स्वप्ने वेगळी आहेत. पत्नीच्या पाठिंब्याने त्यांनी उद्योग उभारण्याचा विचार केला. व्यंकटेश अंदुरकरांनी २-३ महिन्यात इस्त्रोमधील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते कोल्हापुरात परतले.
पत्नीची मोलाची साथ
कोल्हापूर विमानतळाजवळ गडमुडशिंगी या गावामध्ये ही कंपनी उभारण्यात आली. हा उद्योग उभारताना, कोणताही अनुभव नव्हता. खिशात इंडस्ट्री उभारण्याइतपत पैसेदेखील नव्हते. उद्योगात अयशस्वी झालो तर काय करायचे, असाही प्रश्न पडला होता. अपयश मिळाले तर ट्युशन घेऊन संसार पुढे नेईन म्हणत वैष्णवी अंदूरकर यांनी व्यंकटेश अंदुरकर यांना साथ दिली. 
ऑटोमेशन सिस्टम्स उद्योग
अंदुरकर यांच्या कंपनीत इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उत्पादने तयार केली जातात. २७ वर्षांपूर्वी अंदुरकरांनी जो विचार केला होता, तशा प्रकारची उत्पादने सहसा भारतात तयार व्हायची नाही. तशी संकल्पना अंदुरकरांनी विचारात आणली. पंचतारांकित हाटेल्समध्ये जे गेस्ट रुम्स असतात, त्यासाठी अंदुरकरांनी एक प्रोडक्ट डिझाईन केला. हे प्रोडक्ट्स पंच आणि सप्त तारांकित हॉटेलच्या गेस्ट रूमचे ऑटोमेशन करतात. रिमोट तसेच पॅनलद्वारे सर्व लाईट्स, एअर कंडिशनर कर्टन्स, मूडलायटिंग तसेच रूममधील इतरही इक्विपमेंट्स या सिस्टमद्वारे ऑपरेट करता येतात. रिमोट किंवा फोनवरून, संगणकावरून कुठूनही ह्या सिस्टम्स ऑपरेट करता येतात.  या सिस्टम्स होम ऑटोमेशनसाठी वापरल्या जातात. या सिस्टम्स घरात बसवल्यावर तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून घरातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स ऑपरेट करू शकता. यामध्ये सातत्याने नाविन्य आणि नवीन नवीन फीचर्स ऍड केले जातात. कस्टमरची जशी गरज आहे त्याप्रमाणे डिझाईन करण्यासाठी सुसज्य प्रयोगशाळा आणि उच्चशिक्षित इंजिनियर्सची टीम आहे. मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सर्व प्रकारच्या मशीन्स आणि सर्व सुविधा कंपनीमध्ये आहेत.
भारतभर आणि परदेशातही निर्यात
आजपर्यंत भारतातल्या २०० हून अधिक पंच आणि सप्ततारांकीत हॉटेलमध्ये या सिस्टम्स लावलेल्या आहेत. यामध्ये ताज, द पार्क, हयात, शेरॅटोन अशा अनेक नामवंत हॉटेल चेन्सचा समावेश आहे परदेशातही या सिस्टम्स निर्यात केल्या जातात.
पहिलाच प्रयत्न ठरला यशस्वी
जेव्हा पहिल्यांदा हा प्रोडक्ट बसवण्यात आला, ते भारतातील पहिल्या क्रमांकाचे ताज हॉटेल (मुंबई) होते. त्यावेळी परदेशी बनावटीच्या काही ऑटोमेशन सिस्टीम ताज हॉटेलने आपल्या १०-१५ खोल्यांमध्ये लावल्या होत्या. या सिस्टीम्सच्या काही समस्या होऊ लागल्या. त्यावेळी ताज हॉटेलने अंदुरकर यांचे प्रोडक्ट स्वीकारले. हा अंदुरकर यांचा पहिलाच प्रोडक्ट (मॅस्ट्रो सिस्टीम) होता. त्या प्रोडक्टची कोणतीही समस्या झाली नाही. आपण करू शकलो, हे पाहून अंदुरकरांना खूप आनंद झाला. मेहनतीचे फळ मिळाले म्हणत अंदुरकरांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले.
कंट्रोल सिस्टम तंत्रज्ञावर आधारित काम
कोल्हापुरातील कंपनीत २५ कमर्चारी काम करतात. येथे तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक काम केले जाते. डिझाईन हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टाॅलेशन, आफ्टर सेल्स सपोर्ट अशा टप्प्यांमध्ये काम केले जाते. साधारणपणे ८ ते ९ तास काम चालते.  डिझाईन टेस्टींग आणि प्रोडक्ट डेव्हलप करणे, ही मोठी प्रकिया असते. ग्राहकांची मागणी तसे प्रोडक्ट तयार केले जातात. उदाहरणाथर्, एसी कंट्रोल करण्याचे सिस्टीम तयार करणे, लाईट्सचे बल्ब कंट्रोल करण्याची सिस्टीम तयार करणे. समजा घरात, ऑफिसमध्ये एसी, बल्ब सारख्या विजेच्या वस्तू सुरु राहिल्या असतील तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणाहून तुम्हाला ही यंत्रे बंद करता येतात. अशी कंट्रोल सिस्टीम तयार करणे. यास कंट्रोल फाॅर  एनिव्हेअर असे म्हटले जाते.
मागील चार-पाच वर्षांत होम अॅटोमेशन तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे विविध ठिकाणांहून यंत्रे नियंत्रित करता येतात. पण, २५-२७ वर्षांपूर्वी हे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नव्हते. तेव्हा अंदुरकर यांनी ही सिस्टीम अंमलात आणली. भारतभर हे प्रोडक्ट्स निर्यात होतात. भारताबाहेर साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, नेपाळ, श्रीलंका अशा ठिकाणी फाईव्ह स्टार आणि सेव्हन स्टार हॉटेलना उपलब्ध करून दिले जातात.
कोरोना काळात तग धरून राहिली कंपनी
कोरोना काळात सवार्त आधी बंद पडणाऱ्या कंपन्या होत्या, त्यामध्ये अंदुरकर यांची कंपनीदेखील होती. कारण सर्व हॉटेल बंद झाले होते. हॉटेल सुरु झाल्यानंतरही पुढील दोन वर्ष खूप आव्हानात्मक गेली. कारण बंद पडलेले हॉटेल पुन्हा सुरु होतील का किंवा नवे हॉटेल उभारतील का अशी चिंता होती. कारण जोपर्यंत हॉटेल सुरु होणार नाहीत, तोपयर्ंत कंपनीला ग्राहक मिळणार नाहीत. हे सवार्त मोठं संकट असतानादेखील पडत्या काळात ही कंपनी तग धरून राहिली. त्यावेळी कंपनीतील कोणत्याही कमर्चाऱ्याला काढण्यात आले नाही. त्यावेळी शेअसर् ट्रेडिंग करून सर्व कमर्चाऱ्यांचे पगार देता आले, सर्व सप्लायसर्चे पैसे देता आले.
भविष्यात आयओटी आधारित (वायरलेस सिस्टीम) प्रोडक्ट तयार करण्यासाठी अंदुरकर प्रयत्न करत आहेत. यासाठी शुभम अंदुरकर हा त्यांचा मुलगाही कंपनीचे काम पाहतो आहे. ऑटोमेशन मध्ये नवे ट्रेंड येत असतात. इंटरनेट आॅफ थिंक (आयओटी) हा एक तंत्रज्ञानाचा भाग आहे. आयओटीवर आधारित प्रोडक्ट आणण्याचा संध्या अंदुरकरांचा प्रयत्न आहे.

रिक्षा चालवली, मजुरी केली; पण स्वतःचा उद्योग उभा केला!




राजेंद्र बाळासाहेब पिसाळ आणि संजय बाळासाहेब पिसाळ हे बंधू कोल्हापूरचे. त्यांचे वडील हे बाळसाहेब पिसाळ हे एका खासगी कापडाच्या दुकानात विक्रेते आणि हिशोबनीस अशी दोन्ही कामं सांभाळाचे. तुटपुंज्या वेतनात आपला सगळा बारदाना सांभाळत नेहरू नगरात भाड्याच्या एका खोलीत रहात होते. घरात अठराविसे दारिद्—य. राजेंद्र आणि संजय यांच्या बालपणीच आई वारली. सावत्र आईला चार अपत्यं. त्यामुळं ह्या दोन्ही बंधूंचा अतोनात छळ सुरू होता. दरम्यान, राजेंद्र हा दुसर्‍या एका कापड दुकानात कामाला जायला लागला. बाल वयातच काम करत करत शिक्षण सुरू झालं.संजयचीही शाळा सुरू होती. राजेंद्रचं मन कापडाच्या दुकानात रमत नव्हतं. आपला स्वतःचा कारखाना असावा, हे त्याचंं स्वप्न होतं. मग त्यानं कापडाचं दुकान सोडलं. दिलबहार तालमी जवळील पाटील इंजिनिअरिंग वर्क्स ह्या कारखान्यात तो नोकरीला लागला. हे वर्ष होतं 1975- 76. काम शिकायचं होतं, म्हणून वर्षभर बिनपगारी राबला. मात्र लेथ मशीन चालवण्यात तो तरबेज झाला. तिथून तो दुसर्‍या मोठ्या कारखान्यात कामाला लागला. इथं त्याला रमहा 500 रुपये वेतन मिळायला लागलं. मोठ्या बंधूंच्या सांगण्यानुसार संजय बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी उद्यमनगरात एका कारखान्यात काम शिकायला गेला. त्याला काम शिकताना दरमहा 60 रुपये वेतन मिळायला लागलं.  वेतन कितीही कमी असलं, तरी काम शिकणं महत्त्वाचं होतं. ते वर्ष होतं 1980. काम शिकत असताना जॉब भरलेले गाडे हमालाप्रमाणे ढकलायला लागले. त्याचे मित्र हे बत होते, पण कोणत्याही कामाची लाज न बाळगता संजयनं सगळं काम शिकून घेतलं.
दरम्यान, आपण रिक्षा घ्यावी असं वडील बाळासाहेब पिसाळ यांच्या मनात आलं. कर्ज काढून एक जुनी रिक्षा घेतली. पण ती घेतल्यानंतर चालवायची इच्छाच संपली. रिक्षा नुसती घेऊन ठेवली. तिचं आता करायचं काय? मग संजय ती चालवायला लागला. काही काळ त्यानं रिक्षा चालवली. आपल्या वडिलांना आयुष्यभर दुसर्‍याच्या दुकानात राबराब राबून काही मिळवलं नाही, म्हणून राजेंद्र आणि संजय यांनी मिळून भांडवल गुंतवून त्यांना कापडाचं एक छोटं दुकान काढून दिलं. पण वर्षभरातच पार बट्ट्याबोळ होऊन दुकान बंद करावं लागलं. सगळी रक्कम कुठं गेली हे त्यांना सांगता आलं नाही. त्यांना कुणीतरी फसवलं असावं.
संजय रिक्षा चालवत होता खरा, पण ‘कारखाना’ काही दोन्ही भावांच्या डोक्यातून जात नव्हता. मग पिसाळ बंधूंनी आत्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले. एक जुनं लेथ मशीन विकत घेतलं. हे लेथ मशीन शिवाजी उद्यम नगरात एक जागा घेऊन तिथं ठेवलं. जागा अर्थात भाड्याचीच होती. एकच मशीन होतं. पण कारखान्याला नाव दिलं ‘विशाल इंडस्ट्रीज’. आपला कारखाना नावाप्रमाणेच विशाल व्हावा, हा त्यामागचा हेतू. मशीनवर करण्यासाठी कामं मिळायला लागली. पण मशीन खूप जुनं होतं. त्याच्यावर काम करायला मर्यादा येत होत्या. त्यामुळं काम कमी मिळत होतं.  उत्पन्न पुरेसं येत नव्हतं.  जागेचं भाडं भागवायलाही  जमेना. मग कालातरानं हेच मशीन घरी आणलं. आता घरी महापालिकेचा परवाना, थ्री फेझ विजेची जोडणी इत्यादी कामे करण्यासाठीही पैसे नव्हते. मग संजयनं एक निर्णय घेतला, पुन्हा रिक्षा चालवण्याचा. मग एका मित्राची रिक्षा भाड्याने आणून चालवायला सुरुवात केली. काहीतरी चलन चालू झालं. मग बाराशे- तेराशे रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली.  दोघा भावांनी स्वतः काम करून खोली उभी केली. नंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली 25 हजार रुपयांचं कर्ज काढलं. नवीन लेथ मशीन, ड्रिल मशीन आणलं. जम बसल्यावर राजेंद्र यानं परक्याच्या कारखान्यातील नोकरी सोडली. त्यानंतर ‘विशाल इंडस्ट्रीज’ हा उद्योग जोमानं सुरू झाला. कामं मिळत गेली, ती वाढत गेली. दोघांनी कारखानदार मित्र जमा केले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यानं उद्योग वाढायला लागला.  त्यानंतर पिसाळ बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही.
घरच्या कारखान्यात भरपूर कामं सुरू होती. त्याच वेळी पिसाळ बंधूंनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत ‘श्री केदारेश्वर इंडस्ट्रीज’ हे कारखान्याचं दुसरं युनिट सुरू केलं. तिथं वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली. प्रत्येक जॉबला अ‍ॅक्युरसी आणि फिनिशिंग आणणारं होनिंग मशीन आणलं. कारखान्यात चार चाकी वाहनांचे ब्रेक सिलेंडर्स, ब्लॉक पिस्टन्स असे विविध प्रकारचे भाग तयार करण्यात यायला लागले. त्यानंतर परदेशात निर्यात केले जाणारे जॉब तयार व्हायला लागले. हे जॉब मोठ्या जहाजाने निर्यात केले जातात, सागराच्या खार्‍या वार्‍यानं त्यांना गंज चढू नये, म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारचे कोटिंग चढवण्यात यायला लागले. ड्रिलिंग, मशिनिंग, होनिंग, फॉस्पेरिंग, ब्लॅकनिंग अशी कामे करण्यात पिसाळ बंधू तरबेज झाले. अनेक प्रकारचे सुटे भाग तयार करण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभी झाली. ‘विशाल इंडस्ट्रीज’ हा घरी सुरू असलेला कारखाना रहिवासी क्षेत्रात होता, त्यामुळं तो रात्री बंद करावा लागायचा. हा कारखानाही मग गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत नेण्यात आला. तिथंही कामं वाढत गेली. ग्राहकांच्या मनात पिसाळ बंधूंच्या अचूकता आणि प्रमाणशीरता याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योग वाढत गेला. आज हा उद्योग ३० लाखाची उलाढाल करतो.हे यश मिळण्यात उद्यम नगरातील ‘रामचंद्र इंजिनिअरिंनग वर्क्स’ च्या प्रफुल्ल डुणुंग यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
विशाल आणि श्री केदारेश्वर इंडस्ट्रीजमध्ये सर्व निर्यात केले जाणारे ऑटोमोबाईल्सचे पार्ट्स तयार होतात. निर्यात उत्पादनाचा दर्जा कायम टिकवून ठेवण्यात पिसाळ बंधू यशस्वी झाले आहेत. आज राजेंद्र पिसाळ    वर्षांचे आहेत. त्यांना दोन मुलगे, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजय पिसाळ हे आज 61 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीचे गतवर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना एक मुलगी, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची मुलेही हा उद्योग सांभाळत आहेत.

नष्ट झालेले आठवे आश्चर्यः गुलाबी - शुभ्र छते

ऋतुपर्ण


कोलोसस ऑफ रोड्स, ग्रेट पिरॅमिड ऑफ गीझ, बॅबिलोनचे हँगिंग गार्डन, ऑलिम्पियातील झ्यूसचा पुतळा, इफिसस येथील आर्टेमिसचे मंदिर, हॅलिकर्नासस येथील समाधी आणि अलेक्झांड्रियाचे दीपगृह अशी जगातील सात प्राचीन आश्चर्ये तसेच, ताजमहाल (आग्रा, भारत), द ग्रेट वॉल (चीन), क्राइस्ट द रिडीमर स्टॅच्यू (रिओ डी जानेरो),माचू पिचू (पेरू), चिचेन इत्झा (युकाटन प्रायद्वीप, मेक्सिको), रोमन कोलोसियम (रोम), पेट्रा (जॉर्डन) ही जगातील सात अर्वाचिन आश्चर्ये आहेत. पण तुम्हांला एक आठवं आश्चर्य माहीत आहे का? हे आठवं आश्चर्य आज अस्तित्वात नाही. मग हसे आठवं आश्चर्य कुठे नष्ट झालं? कसं नष्ट झालं? केव्हा नष्ट झालं? त्याचीच तर ही रहस्यरंजक गोष्ट...
न्यझीलंडमधील रोटोमहाना हे 2200 एकरात विस्तारलेलं विस्तीर्ण असं एक सरोवर आहे. ह्या सरोवराच्या निर्मितीच्या आधी उत्तरेकडील दिशेला प्राचीन काळापासून गुलाबी आणि पांढर्‍या रंगाचे स्तर होते. त्याला छत (पिंक- व्हाईट टेरेसेस) असं म्हटलं जायचं. इथल्या माओरी जमातीच्या पूर्वजांच्या पवित्र जमिनीवर हे हे चकाकणारे स्तर पुरातन काळात निर्माण झाले होते. हे स्तर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांची रीघ लागून राहात असे. ही गुलाबी- शुभ्र छते 10 जून 1886 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर ती नष्ट झाली. जोवर हे स्तर होते, तोवर त्यांची गणना जागतिक आश्चर्यांमध्ये केली जात होती.
हे गुलाबी-शुभ्र स्तर म्हणजे जगातले सर्वात मोठे सिलिकाचे साठे होते. कि क्लोराईड पाणी मिश्रित असलेल्या दोन भू-औष्णिक झर्‍यांमुळे सिलिका-सॅच्युरेटेड स्तर तयार झाले होते.  हे जगप्रसिद्ध झरे हॉट स्प्रिंग्स आणि गीझर्सच्या समूहाचा भाग होते, मुख्यतः पिनॅकल रिज नावाच्या पूर्वेकडील रिजच्या बाजूने हे झरे वहात होते.
रोटोमहाना परिसराला भेट देणार्‍या पहिल्या युरोपियनांपैकी एक अर्न्स्ट डायफेनबॅक हा एक होता. जून 1841 च्या सुरुवातीला न्यूझीलंड कंपनीच्या अभ्यासपाहणीच्या दौर्‍यावर असताना त्यांनी छोटी सरोवरे आणि गुलाबी- शुभ्र स्तरांना काही काळ भेट दिली. त्यांच्या ‘ट्रॅव्हल्स इन न्यूझीलंड’ या पुस्तकातील त्यांच्या भेटीच्या वर्णनामुळे गुलाबी आणि शुभ्र टेरेसेसमध्ये युरोपीयनच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या मनात त्याविषयी रस निर्माण झाला. गुलाबी- शुभ्र छते  हे न्यूझीलंडचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण बनले. तोपर्यंत न्यूझीलंड युरोपीय लोकांसाठी तुलनेने दुर्गम होता आणि जहाजाने जाण्यासाठी अनेक महिने लागत असत. ऑकलंड ते टॉरंगा हा प्रवास सामान्यत: स्टीमरने आणि इतर वाहनांच्या माध्यमातून आणि पायीदेखील हा प्रवास करावा लागे. “पर्यटक सकाळी 11 च्या सुमारास शुभ्र स्तरांवर पोहोचतील, तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहतील, उकळत्या झर्‍यावर शिजवलेले बटाटे आणि कौरा (गोड्या पाण्यातील क्रेफिश) यांचे दुपारचे जेवण घेतील, गुलाबी टेरेसेस ओलांडतील, तेथे स्नान करतील आणि नंतर परत जातील,” असे वर्णन चार्ल्स ब्लॉमफिल्डने केलेले आहे.
गुलाबी आणि पांढरे टेरेस स्प्रिंग्स सुमारे 3,900 फूट अंतरावर होते. शुभ्र स्तर रोटोमहाना सरोवराच्या उत्तर-पूर्व टोकाला होत्या आणि कैवाका वाहिनीच्या प्रवेशद्वारावर पश्चिमेकडून वायव्येकडे त्यांचे तोंड  होते. ते  सुमारे 82 फूट) खाली तलावाच्या काठावर उतरले. गुलाबी टेरेस पश्चिमेकडील किनार्‍यावरील तलावाच्या चार पंचमांश वाटेने पूर्वेकडून आग्नेय दिशेला होते. मध्य आणि वरच्या खोर्‍यांवर ( इंद्रधनुष्य ट्राउटच्या रंगासारखे) गुलाबी दिसणे हे अँटिमनी आणि आर्सेनिक सल्फाइड्समुळे होते. याच  गुलाबी टेरेसमध्ये असलेले सोन्याचे मोठे प्रमाण संशोधकांना साद घालत होते.
हे गुलाबी आणि शुभ्र स्तर  पूर्वी सुमारे 1,000 वर्षे जुने मानले जात होते. पण नव्या संशोधनानुसार ज्या हायड्रोथर्मल सिस्टमने हे स्तर मजबूत बनले, ते 7,000 वर्षांपर्यंत प्राचीन असू शकते. सिलिका पर्जन्यामुळे कालांतराने अनेक पूल आणि पायर्‍या तयार झाल्या. जेव्हा थर्मलचे स्तर गिझरपासून दूर दुसर्‍या दिशेने वळतात, तेव्हा पृष्ठभागावर सिलिका पायर्‍या तयार होतात. हजारो वर्षे पडणार्‍या पावसाचाही ह्या स्तरांच्या निर्मितीवर परिणाम झाला होता. कालांतराने दोन्ही प्रकारची निर्मिती वाढली कारण सिलिकाने भरलेले पाणी त्यांच्यावर सतत कोसळत राहिले.  भूगर्भशास्त्रज्ञ फर्डिनांड फॉन हॉचस्टेटर यांनी ह्या स्तरांना 1859 मध्ये भेट दिली. ह्या स्तरांच्या  निर्मितीसाठी निःसंशयपणे हजारो वर्षे लागली असावीत, असे निरीक्षण हॉचस्टेटर यांनी नोंदवलं.  जेव्हा हे गुलाबी- शुभ्र स्तर अस्तित्वात होते, तेव्हा त्या खोर्‍यात दोन मोठे आणि सहा लहान जलाशय होते. त्यातल्या एका मोठ्या सरोवराचं नाव रोटोमाकारीरी असं होतं.
10 जून 1886 ह्या दिवशी तरावेरा पर्वतावर ज्वालामुखीचा मोठा प्रचंड असा उद्रेक झाला. आणि त्या उद्रेकात हे आठवं आश्चर्य नष्ट होऊन गेलं. सुमारे चाळीस किलोमीटरच्या परिसरात राखेचा थर पसरला. लाव्हा वितळून गुलाबी- शुभ्र स्तर त्याखाली गाडले गेले. खालच्या बाजूला जिथं लाव्हारस पसरला त्या जागी लाव्हा थंड झाल्यावर त्या ठिकाणी  पाणी साठत गेले आणि  रोटोमहाना हा तलाव निर्माण झाला. आता त्या ठिकाणी नव्यानं संशोधन सुरू झालेलं आहे. वितळलेल्या लाव्हा रसाच्या 114 फूट खाली हे गुलाबी- शुभ्र स्तर असावेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. येथे सापडलेल्या राखेच्या संशोधनानुसार हा उद्रेक बेसॉल्टिक स्फोटाची प्रक्रिया होती. 

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...