कोल्हापुरातलं एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब! शशिकला आणि मारुती भोपळे हे दाम्पत्य. मारुती हे बँकेत दफ्तरी. त्यांना तीन मुले. महेश, गणेश आणि योगेश. तसं हे एकत्र कुटुंब. कुटुंबातील सदस्य 14 आहेत. शाळेत शिकता शिकताच स्वतःचा उद्योग असावा, असं स्वप्न महेशनं बाळगलं होतं. 23 जुलै 1980 या दिवशी जन्मलेल्या महेश यांचं शिक्षण 1995 मध्ये दहावी, 1997 मध्ये बारावी पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी कळंबा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आय. टी. आय.) प्रवेश घेतला. दरम्यान 1997 ते 2002 ह्या कालावधीत एका पेट्रोल पंपावर अटेंडंट म्हणून नोकरी केली. 2002 मध्ये आय. टी. आय. पूर्ण झाल्यावर शिरोली औद्योगिक वसाहतीत एका उद्योगात सी. एन. सी. ऑपरेटर म्हणून नोकरी केली नोकरी 2011 पर्यंत केली. हे काम करत असतानाच आपले स्वतःचे मशीन शॉप असावे ही मूळची तीव्र इच्छा अधिकच बळावत गेली. पण धाडस व भांडवल कमी पडत होते.
त्या वेळी त्यांचे मित्र पुढे आले व त्यांनी महेश यांना भागिदारी व्यवसाय सुरू करू या असे सुचवले. महेशने भावांना सोबत घेऊन व्यवसाय सुरू कारावा, असं वडिलांना वाटत होत. बाहेरचे भागीदार घेण्याऐवजी आपल्याच भावंडांना घ्यावं, असं ते म्हणत होते. पण मित्रांनी आरंभापासून साथ दिली होती. त्यांना वार्यावर सोडून भावांना सोबत घेणे हे योग्य वाटत नव्हतं. वडील नाराज होते, पण त्यांनीच 1लाख 16 हजार रुपयांचे भांडवल दिलं. चार भागीदार मिळून श्री एंटरप्राइज नावाची आपली स्वतःची छोटीशी कंपनी महेश यांनी स्थापन केली. पूर्वी पेट्रोल पंपावर कामगार असताना लग्नासाठी कुणी मुलगी देत नव्हतं. पण ते सी. एन. सी. मशीन शिकून तरबेज झाले, कारखान्यात पगार वाढला. त्यानंतर त्यांना सधन कुटुंबातील मुलगी राजलक्ष्मी ही पत्नी म्हणून मिळाली. महेश उद्योजक होण्यात पत्नीची साथ मोलाची मिळाली. मोठी मुलगी राजलक्ष्मी आणि लहान मुलगी महेश्वरी ही आहे.उद्योग तर सुरू झाला. पहिली ऑर्डर ब्रेक डिस्कची श्री कणेरी इंडस्ट्रीज यांनी दिली. त्यांना पहिले बिल सात हजार मिळाले. हळुहळू कामात सुधारणा करून 2018 पर्यंत त्यांचं बिल महिन्याला 40 हजारपर्यंत पोहोचलं. मग त्यांनी मार्च 2018 ला त्यांनी आणखीन एका भागिदाराचा समावेश करून श्री शुभलाभ सी. एन. सी. वर्क्स या नावाने नवीन कंपनी चालू केली. सुरुवातीला प्रत्येकी 4 लाख भांडवल घालून ही कंपनी चालू केली त्या वर्षी त्यांची वार्षिक उलाढाल 19 लाख रुपयांची झाली. महेश हे महिन्याला 1700 डिस्क सप्लाय करत होतो तो 2018 ला डेली 500 ब्रेक डिस्क म्हणजे 1महिन्याला 12 हजार ते 12 हजार 500 पर्यंत वाढवले. तोपर्यंत कोविडचे संकट आले. सर्व काही ठप्प झाले, पण कोरोना काळात सर्व कामगारांना पगार दिला. अजूनही महेश आणि त्यांचे भागीदार वर्षातून एकदा सगळ्या कामगारांना घेऊन सहल काढतात. चार महिन्यात मंडळींनी पुन्हा उभारी घेतली. नंतर बंधू योगेश यालाही सोबत घेतलं. अपार परिश्रम करून भागिदारीत उद्योग यशस्वी करून दाखवायचा अशी जिद्द बाळगली होती. लग्न हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण ठरले. महेश आणि त्यांच्या भागिदारांच्या उद्योागात दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील पार्ट, एस. पी. एम. मधील पार्ट, फास्टनर्स- जसे नट- बोल्ट, शेती लाईन मधील लहान- मोठे विविध पार्ट, गियर बॉक्स मधील पार्ट, आणखीन काही सुट्टे पार्ट, लिफ्ट मधील पार्ट. हे सगळे मिळून महिन्याला चार मशीन्सवर सुमारे 40 हजार पार्ट बनवले जातात. दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील काम मिळवताना भरपूर धावपळ झाली; पण प्रयत्न, चिकाटी व कामावरील एकाग्रता ह्या जोरावर ते मिळालं. गुणवत्तापूर्वक उत्पादन करण्यात सातत्य आहे. लिफ्टमधील पार्ट इटलीला निर्यात होतो, तर नट- बोल्ट नावाचा पार्ट अद्वैत फास्टनर्स मध्ये जातो व तिथून पुढे परदेशात निर्यात होतो.
14 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ----- वार्षिक आर्थिक उलाढाल 45 लाखाची आहे.
महेश यांची मुलगी राजनंदिनी ही सध्या तीन वर्षाचा डिप्लोमा करत आहे. 2027 मध्ये ती बी. ई. शिकत होईल. त्यानंतर ती आणि माझे दोन भाऊ मिळून स्वतंत्र उद्योग सुरू करणार आहेत. आत्ता महेश यांच्या कंपनीत चार सी. एन. सी. मशीन्स, 14 कर्मचारी अशी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या यशात सर्व मित्रपरिवार व त्यांनी जिथे नोकरी केली, तेथील आस्थापनांचे मालक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. त्या सर्व मालकांनी खूप प्रेरणा व काम दिले त्यामुळे आपण येथवर पोहोचलो, असं महेश म्हणतात. आत्ता कंपनीवर कोणतेही कर्ज नाही,वार्षिक आर्थिक उलाढाल 45 लाखाची आहे. फक्त लहानपणी चे मित्र 10 वीचे वर्गमित्र, आय. टी. आय. चे वर्गमित्र आणि व्यवसायिक मित्र, सनदी लेखापाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आपला प्रवास सुरू राहील, आपले 2028 पर्यंत स्वतःच्या जागेत मशीन शॉप सुरू करायचे व सी. एन. सी. मशीनची संख्या 15 करायची हे स्वप्न आहे. घरी असणारं मोठं कुटुंब आणि उद्योग विश्वातलं कुटुंब असा सुखाचा संसार महेश भोपळे करत आहेत.
No comments:
Post a Comment